सोमवार, १७ ऑगस्ट, २०२६

गोर गरीब मुस्लीम विद्यार्थांना स्कुल बॅग वाटप हेच खरे दातृत्व - कॉ. सुरेश पानसरे

गोर गरीब मुस्लीम विद्यार्थांना स्कुल बॅग वाटप हेच खरे दातृत्व - कॉ. सुरेश पानसरे
 कोल्हार बु
 येथिल जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु शाळेतील विद्यार्थी विद्यार्थिनींना शालेय स्कुल बॅग वाटून आपल्या सामाजीक कामाची चुनूक दाखवत विद्यार्थांच्या चेहर्‍यावर आनंद  फुलविण्याचे काम कोल्हार येथील सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र वर्पे यांनी करून उर्दु शाळेतील शालेय गोर गरीब विद्यार्थांना स्कुल बॅग वाटल्या हेच खरे दार्तृत्व आहे असे गौरवोद्गार कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी कॉम्रेड सुरेश पानसरे यांनी आपल्या भाषनात सांगितले.
निमित्त होते सामाजीक कार्यकर्ते राजेंद्र वर्पे यांना मिळालेला भारत समाज भुषन पुरस्कार.
त्या निमीत्त येथील उर्दु शाळेने त्यांचा सन्मान केला त्या वेळेस या शाळेतील गरीब विद्यार्थांना स्कुल बॅग वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला.
सदर कार्यक्रमास मा. ईलियासर परवीन बाजी उर्दु शाळेच्या स्कुल कमेटी सदस्य राज मोहंमद करीम शेख शिक्षण तज्ञ शाळा व्यवस्थापण समिती जिल्हा परिषद प्राथमिक उर्दु केंद्र शाळा कोल्हार भगवती.
तसेच लक्ष्मी फर्निचरचे संचालक मा. प्रसाद दळे इंजी. मोबिन शेख चेअरमन काबुडके भिमशक्ती मित्र मंडळाचे मा. प्रविन लोखंडे आदि मान्यवर उपस्थीत होते.
शेवटी इलीयासर यांनी सर्वांचे आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र!

विखे-पाटील–थोरातांची सहमती एक्स्प्रेस सुसाट! जिल्हा बँकेत ११ जागा बिनविरोध; जामखेडमध्ये विखे–शिंदे एकत्र! अहिल्यानगर :  अहिल्यान...