उपप्रादेशिक परिवहन कार्यालय श्रीरामपूर येथे मोटार वाहन निरीक्षक पाटील,मोरे, गोसावी,सूर्यवंशी यांचा दिमाखदार निरोप समारंभ संपन्न
नेवासा (तालुका प्रतिनिधी):-
श्रीरामपूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालय येथे कार्यरत असलेले कर्तव्यदक्ष अधिकारी धर्मराज पाटील यांची मुंबई पश्चिम, योगेश मोरे यांची बोरिवली, सुनिल गोसावी यांची मीरा भाईदर तर विकास सूर्यवंशी यांची उदगीर येथे नुकतीच बदली झाली आहे. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भावुक आणि सत्कारमय निरोप समारंभात उपस्थित सहकारी व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या उत्कृष्ट कार्याचे कौतुक केले.या निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अध्यक्ष उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी यांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना अनंता जोशी यांनी सांगितले की, बदली झालेल्या या अधिकाऱ्यांनी "त्यांच्या कार्यकाळात घेतलेले कठोर निर्णय आणि पारदर्शक कारभारामुळे विभागाच्या कामात मोठी प्रगती झाली. "सत्कार स्वीकारताना हे चार हि अधिकारी भावुक झाले आणि त्यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभवांना उजाळा दिला. तसेच, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
याप्रसंगी मोटार वाहन निरीक्षक विशाल मोरे, गणेश पाटील, विशाल बटूळे, अमर शेवाळे तसेच मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक अशोक वारे, राणी सोनवणे, सागर पुंड, निरंजन परदेशी, सागर ननवरे, निकिता खंडिझोड, गोरक्ष कोरडे यांच्यासह कर्मचारी अमोल मुंडे, दिनेश सोनवणे, विलास नागरे, दर्शन सोनवणे, शैलेंद्र दोंदे, सुनिल शेवरे, संतोष औटे, महाराष्ट्र राज्य चालक मालक प्रतिनिधी संघटनेचे अध्यक्ष संदीप गाडेकर सह विभागातील कर्मचारी नागरिक व चालक मालक प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक राणी सोनवणे यांनी केले तर आभार मोटार वाहन सहाय्यक निरीक्षक सागर पुंड यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा