लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट ला. सागर रोकडे, सेक्रेटरी ला. अमोल उगले तर ट्रेझरर पदी ला. सुनील धाडगे यांची निवड.
: अहिल्यानगर जिल्ह्यात सेवेची उच्च गुणवत्ता देणाऱ्या लायन्स क्लबमध्ये राहाता येथील लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंटपदी येथील बांधकाम व्यावसायिक इंजिनिअर ला. सागर रोकडे, सेक्रेटरीपदी ला. अमोल उगले तर ट्रेझरर पदी ला. सुनील धाडगे यांची निवड सर्वानुमते टाळ्यांच्या गजरात करण्यात आली.
दि. 5 जून रोजी घेण्यात आलेल्या लायन्स क्लब राहाता सह्याद्रीच्या खास मिटिंगच्या अध्यक्षस्थानी प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर हे होते. चार्टर प्रेसिडेंट ला. राजेंद्र फंड यांनी नवीन वर्षाच्या पदाधिकारी निवडीबाबत ठराव मांडला. प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर यांनी वरील तीन ही पदाधिकारी यांचे नावाबाबत सूचित केले असता सभागृहातील सर्वांनी एकमताने त्यांच्या निवडीला मान्यता दिली.
नूतन प्रेसिडेंट ला. सागर रोकडे हे सिव्हिल इंजिनिअर असून त्यांची बांधकाम क्षेत्रात एस. आर. कन्स्ट्रक्शन नावाची एक यशस्वी फर्म आहे. सेवाकार्याची त्यांना खूप आवड आहे.
नूतन सेक्रेटरी ला. अमोल उगले हे संचीती इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट अँड व्हिजन हाऊसकीपिंग सोल्युशनचे डायरेक्टर आहे. साईबाबांचे ते खास सेवेकरी असून त्यांच्या सेवाकार्याचा उपयोग लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री यांना निश्चित होईल.
नूतन ट्रेझरर ला. सुनील धाडगे हे क्लबचे फाऊंडर सदस्य असून एक यशस्वी व्यावसायिक आहे. गेल्या सात वर्षांपासून ते दुर्गम, आदिवासी, गरीब विद्यार्थी असलेली जिल्हा परिषदेची शाळेतील शेकडो मुलांना दप्तर वाटप करतात. त्यांचे हे दरवर्षीचे सेवाकार्य लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीसाठी अभिमानास्पद आहे.
हे तीन ही पदाधिकारी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीसाठी या वर्षीचे सेवाकार्याचे आयडॉल ठरतील.
नूतन पदाधिकारी यांचे रिजन चेअरमन ला. ॲड. गोंदकर, ला. सुधीर डागा, प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर, ला. राजेंद्र फंड, ला. डॉ. वैभव मालकर, लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे सर्व सदस्य, सह्याद्री ट्रेकिंग ग्रूपचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा