मंगळवार, २ जून, २०२६

अपघाती निधन झालेल्या आशा कर्मचारी श्रीमती विमल भोसले यांना मदतीचा हात.

अपघाती निधन झालेल्या आशा कर्मचारी श्रीमती विमल भोसले यांना मदतीचा हात.

कोल्हार :     प्राथमिक आरोग्य  केंद्र अंतर्गत  कार्यरत असलेल्या आशा कर्मचारी श्रीमती विमल भोसलेताई यांचे नुकतेचे 23 मे 2026 ला शासकीय सर्व्हेचे काम करत असताना चक्कर येऊन पडल्या त्यांना तातडीने प्रवरा हॉस्पीटल लोनी येथे नेण्यात आले तेथून त्यांना मॅक्स केअर हॉस्पीटल येथे हलविण्यात आले परंतु मॅक्स केअर हॉस्पिटलमध्ये त्यांचे दुसऱ्या दिवशी दुःखद निधन झाले.
त्यांची घरची परीस्थीती अत्यंत गरीबीची असून त्यांना धनंजय व गगन हि दोन मुले व सुवर्णा हि एक मुलगी आहे.
या सर्व गोष्टीचा विचार करून त्यांना शासकिय मदत मिळऊन देण्यासाठी आरोग्य विभाग राहाता प्रयत्नशिल आहे.
श्रीमती विमल भोसले या अनेक वर्षा पासून आशा सेविकेचे काम करत होत्या त्या ज्या संघटनेच्या सदस्य होत्या त्या आशा कर्मचारी संघटना आयटक सलग्न यांच्या वतीने त्यांना आज त्यांच्या घरी जाऊन संघटनेने आर्थिक मदतीचा धनादेश त्यांचा मुलगा धनंजय व मुलगी सुवर्णा यांचे कडे आशा सुपरवायजर सौ रेणुका निर्मळ सौ वर्षा मांडुळे संघटनेचे कार्याध्यक्ष कॉ. सुरेश पानसरे यांच्या हस्ते सुपूर्त केला.
या प्रसंगी आशा कर्मचारी संघटनेच्या राज्य कार्यकारनि सदस्य सौ. ज्योती पंडुरे आयटकच्या राज्य कार्यकारनि सदस्य सौ. जयश्री गुरव उपस्थित होत्या .
या वेळी आशा कर्मचारी सौ. सोनाली शेजुळ शशिकला गायकवाड मंदाकिनी ब्राम्हणे आश्विनी गोसावी मनिषा मुनमूने शोभा शिंदे सविता राजभोज निर्मला राजभोज आदि कर्मचारी उपस्थीत होते.
अहिल्यानगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना आयटक सलग्न हि अहिल्यानगर जिल्ह्यात आशांच्या विविध प्रश्न त्यांचे अडिअडचनी साठी सुख दुःखात सातत्याने सहभागी होत असते.
विमलताईंचे अपघाती निधन हि खुप दुःखद घटना आहे. त्यांना संघटनेने केलेली आर्थिक मदत यानी त्यांचे दुःख भरून निघनार नाही परंतु त्या आपल्या संघटनेच्या सदस्य होत्या तेव्हा त्यांच्या दुःखात अहिल्यानगर जिल्हा आशा कर्मचारी संघटना सहभागी आहे अशी भावना संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड. कॉ. सुधिर टोकेकर यांनी आपल्या भावना कळविल्या आहे.

कोल्हार बु॥ ता.1/6/2026

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील

सावळीविहीर जंक्शनवरील वाहतूक कोंडी तीन दिवसांत संपणार; गुरुपौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू खुली होणार – डॉ. सुजय विखे पाटील  सा...