रविवार, १० मे, २०२६

आनंदवन सेवाभावी संस्थेचे पसायदान पुरस्कार जाहीर स्व. सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार सूर्यकांत नेटके यांना जाहीर

आनंदवन सेवाभावी संस्थेचे पसायदान पुरस्कार जाहीर 

स्व. सोपानराव दरंदले पत्रकार रत्न पुरस्कार सूर्यकांत नेटके यांना जाहीर 

नेवासा 
: सोनई येथील पसायदान आनंदवन सेवाभावी संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त देण्यात येणारे 'पसायदान' पुरस्कार पंढरीनाथ महाराज वारकरी संस्थेचे पंढरीनाथ महाराज तांदळे, आरोग्य विषयी जागतिक स्तरावर कार्य असलेले डाॅ. संजय सोनवणे, साई आदर्श संस्थेचे संस्थापक शिवाजीराव कपाळे यांना जाहीर करण्यात आला आहे. जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष स्व. सोपानराव दरंदले यांची स्मृती जागृत रहावी म्हणून सुरु करण्यात आलेला दुसरा 'पत्रकार रत्न पुरस्कार' दैनिक अ‍ॅग्रोवनचे जिल्हा प्रतिनिधी सूर्यकांत नेटके यांना देण्यात येणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव संजय गर्जे व गोविंद महाराज निमसे यांनी दिली.

पसायदान आनंदवन संस्थेच्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवार दि.  १२ मे२०२६  रोजी ध्यानमंदीर प्रांगणात सायंकाळी ६ वाजता नेवासा येथील सद्गुरु नारायणगिरी महाराज आश्रमाचे प्रमुख महंत उध्दव महाराज मंडलिक व शनैश्वर देवस्थान ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी अतुल चोरमारे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण होणार आहे. महिला बचत गटाच्या मार्गदर्शिका सुनीताताई गडाख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. 
विद्यार्थीदशेत विशेष शैक्षणिक गुणवत्ता प्राप्त डाॅ. देवयानी रविंद्र ससाणे, ओंकार नितीन दरंदले व मृदंग वादनात देशपातळीवर बक्षीस घेतलेल्या प्रसाद महाराज तरवडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात येणार आहे. कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष उदय पालवे व उपाध्यक्ष विनायक दरंदले यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...