शुक्रवार, १ मे, २०२६

गाडगेबाबा साहित्य संमेलनात पुरस्कारार्थी यांच्या काढलेल्या टपाल तिकिटाची दखल रिजन पोस्ट ऑफिसने घेतली.

गाडगेबाबा साहित्य संमेलनात पुरस्कारार्थी यांच्या काढलेल्या टपाल तिकिटाची दखल  रिजन पोस्ट ऑफिसने घेतली.
शिर्डी : 
 राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलन दि. 26 एप्रिल रोजी शिर्डी येथे हॉटेल जे. के. पॅलेस येथे मोठ्या उत्साहात पार पडले. या संमेलनात महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून साहित्यिकांनी हजेरी लावली. याचे कारण म्हणजे संमेलनापूर्वी महाराष्ट्रभरातून  शंभरावर वर्तमानपत्राने या संमेलनाचे वार्तांकन केल्याने संपूर्ण महाराष्ट्रभर या संमेलनाचा प्रचार प्रसार झाला.
           या संमेलनात दोन कवी संमेलने, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विभिन्न क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या व्यक्तींना राष्ट्रसंत डेबूजी संत गाडगेबाबा सन्मान पुरस्कार तसेच साहित्य, समाजरत्न , शिक्षकरत्न, कविरत्न, ग्रामसेवारत्न, उद्योगरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.  या पुरस्काराचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साही. राजेंद्र फंड यांच्या संकल्पनेतून पुरस्कारार्थी यांना गाडगेबाबा मूर्ती, सन्मान चिन्ह यासोबत पुरस्कारार्थी यांचे भारतीय पोस्ट विभागाच्या सौजन्याने माय स्टँप अंतर्गत पुरस्कारार्थीचे खास टपाल तिकीट काढण्यात आले. यामुळे या पुरस्काराचे हे वेगळे आकर्षण होते. त्यामुळे याची चर्चा वर्तमानपत्रे, व्हॉटस् ऍप, फेसबुक द्वारे मोठ्या प्रमाणात झाली. एकाच वेळी माय स्टँप अंतर्गत 28 व्यक्तींचे टपाल तिकीट काढून त्याचे भारतीय डाक विभागाचे इन्स्पेक्टर श्री. अनंत सोनवणे व योगेश शेजवळ यांच्या उपस्थितीत त्या टपाल तिकिटांचे समारंभपूर्वक  विमोचन करण्यात आले.
                 याची वर्तमानपत्रामधील बातमी राहाता, कोपरगांव येथील पोस्ट ऑफिसमधून पुणे रिजन ऑफिस ( डायरेक्टरेट ऑफ  पोस्ट ऑफिस) मधील उच्चस्तरीय डी. पी. एस.ऑफिसर 
श्री. अभिजित बनसोडे सो. व उच्चस्तरीय पी.एम. जी. ऑफिसर श्रीम. प्रीती अग्रवाल मॅडम यांना बातमीचे कात्रण गेले. त्यांनी राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व उपक्रमाची माहिती तसेच ज्यांचे सन्मानपूर्वक टपाल तिकीट काढण्यात आले त्या सर्वांची माहिती मागवली. तसेच या संमेलनाचे आयोजक संमेलनाध्यक्ष तथा डेबूजी प्रतिष्ठाणचे संस्थापक श्री. राजेंद्र फंड, अध्यक्ष श्री. सुनील निकम, कवी सरकार वाचनालयाचे अध्यक्ष श्री. कवी सरकार, आयोजक श्री. माधवराव देसाई, श्री. सुधाकर वाघ, श्री. अनिल देसाई, श्री. विलासराव रोकडे, सौ. राजश्री फंड यांचे पोस्ट विभागाचा हा उपक्रम आकर्षक पद्धतीने राबविल्याबद्दल अभिनंदन केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...