राष्ट्रीय डेबूजी संत गाडगेबाबा पुरस्कार जाहीर
डेबूजी प्रतिष्ठान व कवी सरकार वाचनालय इंगळी कोल्हापूर यांचे वतीने शिर्डी येथे दि. 26 एप्रिल रोजी 28 वे राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साही . राजेंद्र फंड हे असणार आहेत. डेबूजी प्रतिष्ठान व कवी सरकार इंगळी यांच्या वतीने राष्ट्रीय डेबूजी संत गाडगेबाबा सन्मान पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुनील निकम यांनी केली आहे. या पुरस्कारांमध्ये गाडगेबाबा यांच्या दशसूत्रीवर आधारित जनतेस सेवा देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान होणार आहे.
यामध्ये एक लाख कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया मोफत केल्याबद्दल राहाता येथील डॉ. पांडुरंग गुंजाळ, महाराष्ट्रात तळागाळात फिरून परीट समाजाचे संघटन वाढविल्याबद्दल नॅशनल धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री. एकनाथराव बोरसे, परीट समाजाच्या विविध मागण्या शासनदरबारी उत्कृष्टपणे सादर करत असल्याबद्दल नागपूरचे डी.डी. सोनटक्के, भारुडाच्या सहाय्याने महाराष्ट्रभर शासकीय उपक्रमाची व गाडगेबाबा यांचे संदेशाची जनजागृती करत असलेले राष्ट्रीय भारुडकार हमीद सय्यद, दरवर्षी आदिवासींची दिवाळी गोड व्हावी म्हणून
नक्षलवादी एरियात जाऊन पोलिस विभागाच्या सहकार्याने कपडे, मिठाई, आकाश कंदील आणि प्रोटीनयुक्त आहार वाटणारे पुणे येथील संस्कार प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. मोहन गायकवाड, शिर्डी येथे साई बाल सेवा अनाथालयांच्या माध्यमातून निराधारांचे पालनपोषण करणारे श्री. गणेश दळवी, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत असलेले नाशिक येथील राष्ट्रीय हॉलीबॉल पंच श्री मनोज म्हस्के, रेशीमगाठी वधुवर मंडळाचे माध्यमातून दरवर्षी शेकडो लग्न जमण्यास मदत करत असलेले पुणे येथील श्री. अनिल हुपरीकर, चित्रकलेच्या माध्यमातून नावाजलेले श्रीरामपूर येथील पत्रकार श्री. रवी भागवत व आयुष्यभर गाडगेबाबा यांच्या वेशात कीर्तन करणारे संभाजीनगर येथील राष्ट्रीय कीर्तनकार कै. खंडोजी गायकवाड यांना मरणोत्तर पुरस्कार, गाडगेबाबा यांच्यावर प्रबंध सादर केल्याबद्दल नॅशनल धोबी महासंघाच्या राष्ट्रीय महिला अध्यक्षा सौ . रजनी लुंगसे यांना साहित्यरत्न, परीट समाजातील महिलांच्या प्रश्नाला वाचा फोडणाऱ्या अमरावतीच्या सुषमा अमृतकर यांना समाजभूषण, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर उत्कृष्ट शेतीअवजारे बनविणारे पाथरे येथील विलास रोकडे यांना उद्योगरत्न, ज्यांच्या नावे सहा भारतीय पेटंट असलेले प्रोफे. डॉ. प्रसाद बाविस्कर यांना शिक्षकरत्न, पशुपालन आणि गाडगेबाबा यांच्या जीवनावर लेखन करणारे पंढरपूर येथील डॉ. उद्धव रसाळे यांना साहित्यरत्न , व ग्रामसेवेत उत्तम कामगिरी करणारे ग्रामसेवकांचे नेते डॉ . एकनाथराव ढाकणे यांना ग्रामसेवारत्न असे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत. या पुरस्कारांमध्ये पोस्ट विभागाच्या वतीने काढले जाणारे माय स्टँप अंतर्गत टपाल तिकीट, गाडगेबाबांची मूर्ती व सन्मान करण्यात येणार
आहे.
या संमेलनात उद्घाटन सत्र, टपाल तिकिटाचे अनावरण, पुरस्कार वितरण समारोह, कविसंमेलन, कथाकथन इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.
या संमेलनाचे आयोजन डेबूजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. सुनील निकम, कवी सरकार कोल्हापूर, श्री. माधवराव देसाई पुणे, श्री., श्री. सुधाकरराव वाघ, श्री. अनिल देसाई, सौ. राजश्री फंड या करीत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा