सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड:
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त दिनमित्रकार मुकुंदराव पाटील यांचे गांव असणाऱ्या तरवडी येथे घेण्यात येणाऱ्या सुसंकल्प ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी साही. राजेंद्र फंड यांची निवड झाल्याची घोषणा या संमेलनाचे अध्यक्ष साही. सायमन भारस्कर यांनी केली आहे.
साही. राजेंद्र फंड हे शब्दगंध साहित्यिक परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख असून गेल्या 15 वर्षापासून ते " ग्रामसेवा संदेश " हा दिवाळी अंक प्रकाशित करतात. महाराष्ट्रभर त्यांचा दिवाळी अंकामुळे खूप मोठा साहित्यिक परिवार आहे. यांची या वर्षात महाराष्ट्रातील पुणे , कोल्हापूर, सातारा, भंडारा, वडाळा, निमगाव वाघा , श्रीरामपूर, दाभे मोहन, शिर्डी, अहिल्यानगर अशा वेगवेगळ्या जिल्ह्यात व ठिकाणी 4 वेळा संमेलनाध्यक्ष, एक वेळा स्वागताध्यक्ष, 4 वेळा कविसंमेलनाध्यक्ष, एक वेळा विशेष अतिथी, एक वेळा पुस्तक प्रकाशन समारोह अध्यक्ष, 14 व्या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन महाबळेश्वर येथे आयोजक सदस्य होते.
संमेलनाचे अध्यक्षपदी कवी,गितकार बाबासाहेब पवार हे असुन उदघाटक ॲड.देसाई देशमुख.(व्हा.चे.ज्ञा.स.सा.का.) असणार आहे.कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे खासदार भाऊसाहेब वाकचौरे सो., आमदार विठ्ठलराव लंघे पाटील, आदर्श ग्रा.पं.सौंदाळाचे सरपंच शरद पा.अरगडे, , ग्रामीण साहित्यिक भाऊसाहेब सावंत, आला बाबुराव फेम सुरेश कांबळे, वरिष्ठ पत्रकार डॉ.शाम जाधव नाशिक.अब्दुल भय्या शेख.आदी उपस्थित राहणार आहेत.
या एकदिवसीय साहित्य संमेलनात सांस्कृतिक कार्यक्रम, परिसंवाद,कवी संमेलन व पुरस्कार वितरण समारोह आदि कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
साही. राजेंद्र फंड यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे, शिवसेना नेते रामदास गोल्हार, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, संस्थापक सचिव साही. सुनील गोसावी, राज्य संघटक प्राध्या. डॉ. अशोक कानडे, शर्मिला गोसावी, राहाता शाखेचे कवयत्री वैष्णवी निर्मळ , सुमेध ब्राम्हणे, नरेंद्र पवार, शब्दगंध नेवासा शाखेचे दिगंबर गोंधळी, कोपरगांव शाखेचे ऐश्वर्याताई सातभाई, , प्राध्या. संजय दवंगे, पत्रकार हेमचंद्र भवर, विष्णू तांबे, प्राध्या. संजय दरवडे, मेजर रामचंद्र पाठक, कवी संदीप नांगरे, रज्जाक शेख, मच्छिंद्र जाधव, बाळकिसन धूत, पत्रकार सुधीर चव्हाण, लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे प्रेसिडेंट तथा सह्याद्री ट्रेकिंग ग्रूपचे अध्यक्ष ला. विनोद गाडेकर व सर्व टीम, झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे, बाळासाहेब कचरे, लक्ष्मण कचरे, अंबादास कचरे, बाजीराव कचरे, आप्पासाहेब कावरे, रामकृष्ण गरड, राजेंद्र राऊत , शकूर इनामदार आदींनी अभिनंदन केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा