राहाता शहराजवळील श्री.भगवान महावीर स्वामी व श्री सुमतीनाथ जैन मंदिरात मोठा दरोड्याचा प्रयत्न फसला — डॉ. राजेंद्र पिपाडा व अंगरक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
राहाता येथील श्री. सुमतीनाथ जैन मंदिरामध्ये मोठ्या दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून डॉ. राजेंद्र पिपाडा व त्यांच्या अंगरक्षकांच्या वेळेवर केलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची पहाणी करण्यासाठी शिर्डीचे पो.नि.रनजित गलांडे,राहाता पो.नि. नितीन चव्हाण व प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा,संघपती अनिल पिपाडा,मदनलाल पिपाडा,महावीर पिपाडा,निखील पिपाडा,साहील पिपाडा,महेंद्र पिपाडा, ललित धाडीवाल, निलेश पिपाडा, आदी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चार अज्ञात दरोडेखोरांनी मंदिर परिसरात प्रवेश करून मंदिराचा दरवाजा तोडुन दानपेटी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित असलेल्या अंगरक्षकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न दरोडेखोरांकडून करण्यात आला. मात्र अंगरक्षकाच्या धाडसी व सतर्क भूमिकेमुळे त्यांचा डाव पूर्णपणे हाणून पाडण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी रात्री तात्काळ जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.सोमनाथजी घार्गे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या तत्परतेमुळे पोलिस यंत्रणा त्वरित सक्रिय झाली आणि घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला.तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथकही पाचारण करण्यात आले असून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व ठसे तज्ञ यांच्या मदतीने तपासाला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.या सतर्कतेमुळे मंदिरातील मोठे आर्थिक नुकसान तसेच संभाव्य जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित झाली असून भाविकांमध्येही सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी अधिक माहिती देताना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी नागरिकांना आवाहन केले.आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.मंदिर व सार्वजनिक ठिकाणी CCTV, सुरक्षा रक्षक व प्रकाशव्यवस्था सक्षम ठेवावी.
अनोळखी व संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवून स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी.
सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती किंवा अफवा पसरवू नयेत.
पोलिस तपासात नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे. स्थानिक पोलिस स्टेशन व आपत्कालीन क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावेत.
डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे अंगरक्षक शैलेश मोहन भोयर यांनी राहाता पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अहिल्यानगर पोलिस दलात कार्यरत असून मी पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे नेमणुकीस आहे. मी मागील एक महिण्यापासुन राहाता शहरातील राजेंद्र पिपाडा यांन अंगरक्षक म्हणून कर्तव्यास आहे, दि. 23/02/2026 रोजी मी राजेंद्र पिपाडा यांचे अंगरक्षक कर्तव्य पार पाडीत होतो. मी व राजेंद्र पिपाला असे आम्ही सोबत दिवसभराचे भेटीचे कार्यक्रम करून राजेंद्र पिपाडा यांचे निवासस्थानी रात्री 08/00वा गेलो 4 मी माझ्या आरामाच्या ठिकाणी रुमवर जेवण करून झोपी गेलो, तसेच राजेंद्र पिपाडा हे देखिल त्यांचे कुटुंबाराह रात्री 11/00 व सुमारास झोपी गेले. राजेंद्र पिपाडा यांचे घरामागे श्री सुमतीनाथ जैन मंदिर आहे. तसेच शेजारीच संतोष लोढा यांचे घर आहे. दि.24/02/2026 रोजी रात्री 03/00 सुमारास श्री सुमतीनाथ जैन मंदिर येथे असलेले पुजारी नामे विनायक गजानन देशपांडे यांना संतोष लोढा यांगी फोन केला परंतु त्यांचा फोन बंद लागल्याने त्यांनी राजेंद्र पिपाडा यांना फोन केला की श्री सुमतीनाथ जैन मंदिर येथे चोर आल्याचे दिसत आहे असे कळविल्याने राजेंद्र पिपाडा यांनी मला फोन करुन कळविले की, तुम्ही श्री सुमतीनाथ जैन मंदिरा जवळ या तेथे काही चोर आलेले आहे. मी देखिल तेथे येतो असे मला कळविल्यानंतर मी लगेच आहे त्या स्थितीत माझ्या जवळील वेपन न घेता सिव्हील कपड्यांवरच तेथे गेलो, तेथे दोन अनोळखी इसम मंदिराचे ओट्यावर व दोन ईसम मंदिराचे मागील बाजुला उभे असल्याचे मला दिसले, त्यावेळी मी समोर उभे असलेल्या ईसमांना "कोण आहे, कोण आहे" असे जोरात ओरडलो त्यातील एका तोंड मधलेल्या ईसमाने त्याचे हातातील असलेला लोखंडी रॉड माझ्या अंगावर उगारला त्यावेळी मी लगेच मागे सरकलो, त्यावेळेस ते सर्व ईसम मागे सरकून उडी मारून मंदिराचे मागील बाजूने पळून गेले. तेव्हा तेथे राजेंद्र पिपाडा हे देखिल आले. त्यानंतर बाहेर ओरात आरडाओरडा चालु असल्याने मंदिर पुजारी यांनी राजेंद्र पिपाडा यांना फोन केला की माझ्या घराची कड़ी बाहेरुन कोणीतरी लावलेली आहे. आम्ही सर्व तथे मंदिराचे नागील पुजारी देशपांडे यांचे रुमजवळ गेलो त्यांचे धराची कड़ी उघडुन त्यांना मंदिराची चावी घेण्यास सांगुन आम्ही मंदिर चेक केले असता मंदिराचे दरवाजाची फळी कटरने उचकून खाली पडलेली दिसली तसेंच आम्ही मंदिराचे कुलूप उघडुन पाहीले असता मंदिराची दानपेटी ही सुस्थितीत असुन इतर कोणत्याही वस्तूचे नुकसान झालेले दिसले नाहीं, तसेच आम्ही बाहेरील परिसर चेक केला असता मंदिरा मागील बाजुस असलेले तार कंपाऊंडची तार कटरने कापलेली दिसुन आली, तेव्हा राहाता पोलीस स्टेशन व शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंभजदार है शासकीय वाहनासह तेथे आले. त्यांनी सर्वानी मंदिराची व परिसराची गहमी केली त्यांना आम्ही झालेल्या घटने बाबत सांगितले, त्यानंतर मी व मंदिराचे पुजारी देशपांडे असे आम्ही राहाता पोलीस स्टेशन येथे वरिल चार अनोळखी चोरांविरुद्ध माझी कायदेशीर फिर्याद आहे.
वरील प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा