राहाता शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे – भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांची आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्याकडे मागणी
राहाता शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती गरज आणि तातडीच्या आरोग्यसेवेचा अभाव लक्षात घेता राहाता येथील ग्रामीण रुग्णालयाचे दर्जोन्नती करून तेथे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात यावे, अशी ठाम मागणी भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेवुन निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीरामपुर, पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले, संगमनेर,राजुर इत्यादी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालये मंजुर झालेली आहे. असे असताना राहाता तालुक्यातच उपजिल्हा रुग्णालय कोणाच्या दबावापोटी होत नाही असा प्रश्नही डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मंत्र्यांना विचारला.
डॉ. पिपाडा यांनी नमूद केले की, राहाता तालुका शिर्डी आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन क्षेत्राशी निगडित असल्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची ये-जा असते. अपघात, आपत्कालीन उपचार, प्रसूती सेवा व विशेष उपचारांसाठी नागरिकांना अहिल्यानगर किंवा इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर सक्षम उपजिल्हा रुग्णालयाची तातडीची गरज आहे. जिल्ह्यात इतर ब-याच तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालये आहेत.
उपजिल्हा रुग्णालयात खालील बाबी आवश्यक आहेत त्या पुढील प्रमाणे, रुग्णालय किमान 100 खाटांचे (Beds) असावे व खालील प्रमुख विभाग सुरू करण्यात यावेत :१.आपत्कालीन व ट्रॉमा केअर विभाग- २४x७ आपत्कालीन सेवा,अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा बेड, अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स सेवा २. औषधोपचार (Medicine) विभाग - सर्वसाधारण आजारांचे निदान व उपचार, ICU (किमान 10 खाटांचे) ३.शस्त्रक्रिया (Surgery) विभाग- जनरल सर्जरी OT, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सुविधा४.स्त्रीरोग व प्रसूती विभाग (OBGY)- प्रसूती कक्ष (Labour Room),सिझेरियनसाठी स्वतंत्र OT,मातृ व बाल आरोग्य सेवा ५. बालरोग (Pediatrics) विभाग-नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (SNCU/NICU),लसीकरण केंद्र ६. अस्थिरोग (Orthopedic) विभाग-फ्रॅक्चर व अपघात उपचार,प्लास्टर रूम ७. भूलतज्ज्ञ (Anesthesia) सेवा, ८. नेत्र, कान-नाक-घसा (ENT) विभाग,९. दंत (Dental) विभाग,१०. क्षयरोग (TB) व संसर्गजन्य रोग विभाग,११. आयुष विभाग (आयुर्वेद/होमिओपॅथी) – ऐच्छिक आवश्यक निदान व सहाय्यक सुविधा- अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब,डिजिटल एक्स-रे,सोनोग्राफी,ECG व 2D Echo,रक्तपेढी / रक्त साठवण केंद्र,औषध वितरण केंद्र (२४ तास),मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (किमान 2),ऑक्सिजन प्लांट / पाइपलाईन व्यवस्था,शवविच्छेदन कक्ष (Post Mortem Room),स्वच्छता व बायो-मेडिकल वेस्ट व्यवस्थापन
अपेक्षित मनुष्यबळ (किमान) तज्ज्ञ डॉक्टर (Specialists) – 8 ते 10 इतर आवश्यक बाबी २४x७ अॅम्ब्युलन्स (किमान 2),रुग्ण नोंदणीचे संगणकीकरण,रुग्ण मार्गदर्शन कक्ष (Help Desk),दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश,पुरेशी पार्किंग व्यवस्था,सुरक्षित पिण्याचे पाणी व प्रतीक्षा कक्ष
डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांना विनंती केली आहे की, राहाता तसेच परिसरातील हजारो नागरिक व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मागणीस तातडीने मान्यता देऊन निधी मंजूर करावा. उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास स्थानिक नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल आणि मोठ्या शहरांवरील ताणही कमी होईल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा