बुधवार, १८ फेब्रुवारी, २०२६

१४ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अध्यक्षपदी साही. प्रा.ज्ञानदेव राऊत तर कविसंमेलन अध्यक्षपदी कवी राजेंद्र फंड यांची निवड

१४ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन अध्यक्षपदी साही. प्रा.ज्ञानदेव राऊत तर कविसंमेलन अध्यक्षपदी कवी राजेंद्र फंड यांची निवड


           १४ वे अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलन हे भारतीय मराठी साहित्यिक व शेतकरी चळवळीच्या वैचारिक, सृजनशील परंपरेतील एक महत्त्वाचे आयोजन आहे,  साहित्य संमेलनाचे प्रमुख उद्देश म्हणजे या संमेलनात शेतकरी व्यथा, शेतीतील समस्यांवर विचार-चर्चा, कृषी चिंतन आणि साहित्यिक सृजनशीलता यावर आधारित कार्यक्रम आयोजित केले जातात. 
असे हे साहित्य संमेलन २१ आणि २२ फेब्रुवारी २०२६ रोजी महाबळेश्वर जवळील  सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या दाभेमोहन या गावी घेण्यात येणार आहे. या अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी सन्मा. प्रा. ज्ञानदेव राऊत यांची तर पहिल्या सत्राच्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदी अहिल्यानगरचे कवी/ साहित्यिक ला.राजेंद्र फंड यांची  पुन्हा तिसऱ्यांदा निवड झाली असल्याची या संमेलनाचे आयोजक तथा शेतकरी संघटनेचे नेते श्री. गंगाधरजी मुटे यांनी जाहीर केले आहे.

             या शेतकरी साहित्य संमेलनामध्ये शेतकरी संघटनेचे अनेक मान्यवर व शेती साहित्यिक यात उदघाटक  म्हणून प्रगतशील शेतकरी मा. किसन शेठ भिलारे, 
प्रमुख पाहुणे : मा. डॉ. सुरेश मोहितकर, माजी प्राचार्य, चंद्रपूर ,सन्माननीय अतिथी : मा. डॉ. तानाजीराव चोरगे, ज्येष्ठ शेती साहित्यिक
स्वागताध्यक्ष : मा. चंद्रलेखा बेलसरे, ज्येष्ठ साहित्यिका आणि उद्योजिका,संयोजक : मा. प्रमोदकुमार बेलसरे, डायरेक्टर, इंडियाना सुक्रो टेक पुणे प्रा. लि.,समन्वयक : मा. राजकुंवर बेलसरे (सातारा),  समारोपीय अध्यक्ष मा. फरझाना इकबाल डांगे, साहित्यिका तथा माजी सदस्य, म. रा. मराठी भाषा साहित्य व संस्कृती मंडळ ,प्रमुख अतिथी : मा. ईंजी. वसंत जोशी, सातारा ,विशेष अतिथी : मा. दिलीप भोयर, शेतकरी नेते, अमरावती    डॉ. हंसराज जाधव (छत्रपती संभाजीनगर), मा. डॉ. कैलास इंगळे (छत्रपती संभाजीनगर), मा. डॉ संजय जगताप (नांदेड), मा. डॉ. पुरूषोत्तम जुन्ने, मा. डॉ. मारोती घुगे (जालना) मा. अ‍ॅड सतीश बोरुळकर, मुंबई हायकोर्ट, मुंबई,   मा. योगिता खांडेभराड, शेतकरी नेत्या, जालना या व महाराष्ट्रातील अनेक नामवंत कवी, गझलकार , परिसंवादाचे अनेक वक्ते उपस्थित राहणार आहेत.

                  त्यांच्या या निवडीबद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, सचिव  सुनील गोसावी, साही. अशोक कानडे, कवयत्री शर्मिला गोसावी, कथाकथनकर श्री. बाळासाहेब देशमुख, कवी सरकार इंगळी, राहाता,डॉ. श्री. मोहन गायकवाड,  नगराध्यक्ष ला. डॉ. स्वाधीन गाडेकर, ला. विनोद गाडेकर, ला. संजय उबाळे, श्री. प्रशांत दरंदले, श्री. गणेश गाडेकर, श्री. अजय गायकवाड, श्री. अन्वर शेख, श्री. महेंद्र आभाळे,सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप व लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...