मंगळवार, १७ फेब्रुवारी, २०२६

संस्कार हे विकत मिळत नाहीत आत्मसात करावे लागतात - रावसाहेब गाढवे पाटील

संस्कार हे विकत मिळत नाहीत आत्मसात करावे लागतात -   
 रावसाहेब गाढवे पाटील 

 संस्कार हे कुठेही कोणत्याही दुकानात मिळत नाहीत ते शालेय जीवनामध्ये आत्मसात करावी लागतात प्रथम गुरु आपले आई वडील आहेत नंतर शाळेतील शिक्षक हेच आपल्यावरती चांगल्या प्रकारचे संस्कार करतात हीच संस्काराची शिदोरी आपल्याला ध्येय साध्य करण्यासाठी उपयोगी पडते असे रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना स्कूल कमिटीचे चेअरमन रावसाहेब पाटील गाढवे यांनी विद्यार्थ्यांना सांगितले 
जीवनात काही करून दाखवायचे असेल तर आपल्यामध्ये जिद्द आणि धमक असायला पाहिजे आपल्या प्रत्येक कार्याला परिश्रमाची जोड देऊन त्यागी वृत्ती आणि समर्पण भावनेने कार्य केले तर ध्येय निश्चित साध्य होते असे गणेश सहकारी कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील यांनी सांगितले विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे सर यांनी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये आपण कितीही यश मिळवले तरी मातृ शाळेला विसरू नये असे आव्हान केले 

हीच मातृशाळा आपल्या जीवनात कायम प्रेरणा देणारी ठरते असे सांगितले राजेंद्र पाटील जाधव यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होवो यासाठी शुभेच्छा दिल्या
 यावेळी भिंगारदे सर, उंडे मॅडम ,तनपुरे सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.कार्यक्रमासाठी ज्येष्ठ सदस्य दादासाहेब गाढवे  पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे पाटील ,वाल्मीकभाऊ गाढवे पाटील ,विजुभाऊ सदाफळ उपस्थित होते
 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली भवर, समृद्धी गाढवे या विद्यार्थिनींनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कैलास भोये ,लव्हारकर सर ,वसावे व्ही आर सर यांनी प्रयत्न केले



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...