शनिवार, २८ फेब्रुवारी, २०२६

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी यमनाथ निर्मळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार!

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे कर्मचारी यमनाथ निर्मळ यांचा सेवानिवृत्तीनिमित्त भव्य सत्कार!

 प्रामाणिक आणि निस्वार्थ सेवेचा गौरव; सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती

शिर्डी 
 श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे अत्यंत मनमिळावू आणि कर्तव्यदक्ष कर्मचारी यमनाथ निर्मळ हे आपल्या प्रदीर्घ आणि निष्कलंक सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. त्यांच्या या प्रदीर्घ आणि प्रामाणिक सेवेची दखल घेत साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटीच्या वतीने त्यांचा नुकताच एक भव्य आणि दिमाखदार सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. अत्यंत भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना नवनाथ निर्मळ म्हणाले की, "यमनाथ निर्मळ यांनी संस्थेत नेहमीच अत्यंत प्रामाणिकपणे आणि निस्वार्थ भावनेने आपले काम केले. कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा आणि सर्वांशी मिळून-मिसळून राहण्याचा त्यांचा स्वभाव यामुळे त्यांनी सर्वांची मने जिंकली. त्यांची ही स्वच्छ आणि प्रामाणिक कारकीर्द इतर सर्व कर्मचाऱ्यांसाठी कायमच एक आदर्श राहील.
"
सेवानिवृत्त कर्मचारी यमनाथ निर्मळ यांची भावूक प्रतिक्रिया:
सत्काराला उत्तर देताना यमनाथ निर्मळ यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, "माझी ही प्रदीर्घ सेवा केवळ साईबाबांच्या आशीर्वादाने आणि सोसायटीच्या सर्व पदाधिकारी तसेच सहकाऱ्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळेच यशस्वीरित्या पूर्ण होऊ शकली. संस्थेत प्रामाणिकपणे काम करत असताना मला कधीच थकवा जाणवला नाही, कारण इथले वातावरण एका कुटुंबासारखे होते. आज माझ्या निरोप समारंभाला एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहून तुम्ही सर्वानी जो माझा सन्मान केला, त्यामुळे मी खरोखरच भारावून गेलो आहे. संस्थेने आणि इथल्या माणसांनी मला दिलेले हे अलोट प्रेम आणि आदर माझ्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे. मी संस्थेचा आणि तुम्हा सर्वांचा कायम ऋणी राहीन."
हा दिमाखदार सत्कार सोहळा सोसायटीचे चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा. आणि व्हाईस चेअरमन पोपटराव भास्करराव कोते पा. यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
याप्रसंगी सोसायटीचे संचालक महादू बापूसाहेब कांदळकर, कृष्णा नाथा आरणे, भाऊसाहेब चांगदेव कोकाटे पा., संभाजी शिवाजी तुरकणे पा., देविदास विश्वनाथ जगताप, विनोद गोवर्धन कोते पा., मिलिंद यशवंत दुनबळे, तुळशीराम रावसाहेब पवार पा., रवींद्र बाबू गायकवाड, भाऊसाहेब लक्ष्मण लवांडे पा., इक्बाल फकीरमहंमद तांबोळी, सौ. सुनंदा किसन जगताप पा., सौ. लता मधुकर बारसे पा., रंभाजी काशिनाथ गागरे, भाऊसाहेब भानुदास लबडे पा. आदी उपस्थित होते.
तसेच, या कार्यक्रमाला सोसायटीचे सचिव विलास गोरखनाथ वाणी पा., सहसचिव बाबासाहेब शंकर अनर्थे पा., सहाय्यक सहसचिव संभाजी सोपान कोते पा., पत्रकार संजय महाजन यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. शेवटी सर्वांनी यमनाथ निर्मळ यांना त्यांच्या पुढील निरोगी आणि सुखकर वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या.

राहता तालुका विधि सेवा समिती व राहता तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन राहता न्यायालयात मोठ्या उत्साहात साजरा


राहाता तालुका विधी सेवा समिती व राहाता तालुका वकील संघ यांच्या संयुक्त विद्यमाने "मराठी भाषा गौरव दिन" राहाता न्यायालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सत्र न्यायाधिश गुप्ता साहेब होते. तर प्रमुख पाहूणे म्हणून राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कारप्राप्त मुख्याध्यापक सर्जेराव मते  उपस्थित होते. तसेच या समारंभास वरिष्ठ स्तर न्यायाधिश शेख साहेब, जोशी मॅडम  रजपुत साहेब, तट साहेब, तसेच फुलारी साहेब, भरड साहेब, गिरगावकर साहेब हे सर्व उपस्थित होते.
    या प्रसंगी प्रमुख पाहूणे म्हणून बोलतांना सर्जेराव मते म्हणाले की, दरवर्षी 27 फेब्रुवारी हा महाराष्ट्राचे जेष्ठ कवी वि.वि. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म दिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. भाषा म्हणजे जीवंत लोकांचे व तेजस्वीपणाचे लक्षण आहे. भाषा म्हणजे लोकसमुहाला एक बनविण्याचे आणि एकत्र ठेवण्याचे सर्वात प्रभावी साधन आहे. भाषेमध्ये बोलीभाषेलाही महत्व असुन मराठीमध्ये कोकणी, मराठवाडी, वज्हाडी, खान्देशी, अशा विविध बोलीभाषा सामावलेल्या आहेत. जपान, चीन सारख्या देशांनी आपल्या भाषेतूनच प्रगती केलेली पहावयास मिळते. तसेच आपणाकडेही न्यायदान,  व्यावसायिक, या क्षेत्रातही मराठीचा वापर मोठ्या  प्रमाणावर झाल्यास सामान्यांना त्यांचा फायदा होईल. मराठीला पुरातन परंपरा असुन संत,कवी, लेखक, शाहीर, ग्रंथकार, यांनी ती समृध्द केलेली पहावयास मिळते. साता समुद्रापारही मराठी भाषेचा डंका असुन केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. शब्दांचा क्रम, शब्द वापरण्याचे ठिकाण, शब्द उच्चारतानाचे चढ उतार तसेच त्यांचा योग्य वापर केल्यास होणारा अर्थबदल या विषयीचे विविध किस्से सांगुन त्यांनी सर्वांना खिळवून ठेवले. आपण सर्वांनी सर्वच क्षेत्रात मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर केल्यास मराठीला खऱ्या अर्थाने वैभव प्राप्त होईल असेही ते म्हणाले.
    या अगोदर न्यायमुर्ती गुप्ता साहेब यांच्या हस्ते पाहूण्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी वकील संघाचे अध्यक्ष अॅड. शिवाजी चौधरी यांनी पाहूण्यांचा परिचय करुन दिला तर अॅड. अनिल शेजवळ यांनी प्रास्ताविक केले. शेवटी अॅड.  सागर जपे यांनी आभार मानले. या समारंभास सर्व न्यायाधिश, वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सावळी विहीर खुर्द येथे लक्ष्मी आई यात्रा महोत्सव

सावळी विहीर खुर्द येथे लक्ष्मी आई यात्रा महोत्सव
  
    सावळीविहीर विजय खरात

सालाबाद प्रमाणे यंदाही राहाता तालुक्यातील सावळी विहीर खुर्द येथे लक्ष्मी आई यात्रा महोत्सव होणार आहे या ठिकाणी भक्ती आणि श्रद्धा यांचा अलौकिक संगम पहावयास मिळतो ही देवी भक्ताच्या नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते या ठिकाणी मंदीर लगत विद्युत रोषणाई केली जाते तसेच या ठिकाणी मुंबई ,नाशिक ,संभाजी नगर ,अहील्यानगर,सह पंचक्रोशीतील भाविक भक्त देवीच्या दर्शनासाठी येतात सावळीविहीर खुर्द ग्रामदैवत असलेल्या सर्व ग्रामस्थ देवीच्या यात्रेत सहभागी होतात लक्ष्मी आई यात्रा महोत्सव हा होळीच्या दिवशी सोमवार दिनांक 2-3-2026 रोजीआयोजित करण्यात येणार आहे सकाळी लक्ष्मी मातेला अभिषेक करण्यात येणार आहे होम हवन  सायंकाळी काठी मिरवणूक, शोभेची दारू , देवीच्या गाण्यांचा कार्यक्रम सादरीकरण करण्यात येणार आहे विशेष म्हणजे गाण्यांची जुगलबंदी होणार आहे  संभाजी नगर येथील  संतोष शिंदे , भाऊसाहेब शिंदे तसेच शिर्डी येथील किरण बत्तीशे या सोबत नामांकित सुप्रसिद्ध गायक हजेरी लावणार आहे या कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा कमिटी यांनी केले आहे

शुक्रवार, २७ फेब्रुवारी, २०२६

कान्हेगाव रेल्वे ट्रॅक जवळ पादचारी भुयारी मार्गाला मंजुरी - खा.भाऊसाहेब वाकचौरे

कान्हेगाव रेल्वे ट्रॅक जवळ पादचारी भुयारी मार्गाला मंजुरी - खा.भाऊसाहेब वाकचौरे 

मौजे कान्हेगाव येथील हनुमानवाडी परिसरात पादचारी नागरिक, विद्यार्थी व स्थानिक रहिवाशांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या पादचारी भुयारी मार्गाच्या (सबवे) बांधकामास मान्यता देण्यात आली आहे. याबाबत पुणे येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापक अनिल कुमार पाठक यांनी खा.वाकचौरे यांना लेखी पत्राद्वारे उत्तर कळविले आहे. 
गेल्या अनेक दिवसांपासून खा.वाकचौरे याबाबतीत दिल्ली दरबारी पाठपुरावा करत होते. त्यामुळे कान्हेगाव व कोपरगाव रेल्वे स्थानकांदरम्यान रेल्वे किमी ४५०/४-५ या ठिकाणी हा पादचारी भुयारी मार्ग मंजूर करण्यात आला असून रेल्वे रुळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यास मोठी मदत होणार आहे. विशेषतः शेजारीच असणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांसाठी, वृद्ध नागरिक आणि शेतकरी यांना याचा मोठा फायदा होणार आहे. रेल्वे प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार सबवेसाठी आवश्यक असलेले जनरल अरेंजमेंट ड्रॉइंग (GAD) सध्या मंजुरीच्या प्रक्रियेत आहे. ही मंजुरी मिळताच प्रत्यक्ष बांधकामास सुरुवात करण्यात येणार आहे.
दरम्यान खा.भाऊसाहेब वाकचौरे यांनी पुणे विभागाचे रेल्वे अधिकारी, कोपरगाव तहसीलदार आणि रेल्वे मार्गालगतचे रहिवाशी यांची संयुक्त बैठक आपल्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तहसील कार्यालयात लावली होती, त्याचीही दखल घेऊन प्रवासी व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सार्वजनिक जागा खुल्या करून उर्वरित दौंड–मनमाड रेल्वे विभागात कुंपण घालण्याचे कामही युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. या उपाययोजनांमुळे अनधिकृत रेल्वे मार्ग ओलांडण्याच्या दुर्घटना कमी होतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
यामुळे कान्हेगाव-भोजडे ग्रामस्थांना अधिक  फायदा होणार असून भोजडे विकास सोसायटीचे चेअरमन तथा शिवसेनेचे जिल्हा समन्वयक मुकुंद सिनगर यांनी खा.वाकचौरे यांचे जाहीर आभार मानले आहेत. यावेळी सतत पाठपुरावा करणारे कान्हेगाव-वारी येथील शिवसेनेचे जेष्ठ नेते गोरख टेके, तान्हाजी थोरमिसे, तालुका संघटक अशोक कानडे, पत्रकार प्रशांत टेके, सामाजिक कार्यकर्ते अशोक आप्पा काजळे यांच्यासह स्थानिकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला आहे.

गुरुवार, २६ फेब्रुवारी, २०२६

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत-ना.विखे पाटील

औद्योगिक क्षेत्राला अपेक्षित कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत-ना.विखे पाटील

मराठा आरक्षण उपसमितीची  बैठक संपन्न


शिर्डी 
उद्योजकांच्या संघटनांशी संपर्क ठेवून औद्योगिक व सेवा क्षेत्रात मागणी असलेल्या कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम सारथीने सुरू करावेत, यासाठी नामांकीत प्रशिक्षण संस्थाचे मार्गदर्शन घेण्याच्या सूचना  जलसंपदा मंत्री तथा मराठा आरक्षण मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. 

मंत्रालयात डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सारथी संस्थेच्या संचालकांची तसेच शासनाच्या संबंधित विभागातील वरीष्ठ अधिकाऱ्यांची बैठक संपन्न झाली. सदर बैठकीसाठी सारथी संस्थेचे संचालक श्री.मधुकर कोकाटे, श्री.उमाकांत दांगट, संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे व इतर अधिकारी उपस्थित होते. उपसमितीचे अध्यक्षपद स्विकारल्यापासून संपन्न झालेली आजची ही नववी बैठक होती. सारथी संस्थे मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजना उपक्रमांचा सविस्तर आढावा सारथी संस्थेला  उपलब्ध होत असलेला निधी याचा सविस्तर आढावा   मंत्री विखे पाटील यांनी सदर बैठकीमध्ये घेतला. सारथी संस्थेच्या माध्यमातून सुरु असलेल्या उपक्रमांची माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक सुरज मांढरे यांनी सादर केली.

बैठकीमध्ये मार्गदर्शन करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, समाजातील युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्याच्या दृष्टीने कौशल्य प्रशिक्षण उपक्रम सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. सारथी संस्थेने यामध्ये पुढाकार घेतल्यास समाजातील युवक- युवतींना त्याची मोठी मदत होईल. सद्यपरिस्थितीत औद्योगिक तसेच सेवा क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ या कौशल्य विकास कार्यक्रमातून उपलब्ध होवू शकते यासाठी कौशल्य प्रशिक्षणाचे कार्यक्रम नामांकित प्रशिक्षण संस्थांमार्फत राबविण्याच्या दृष्टीने सारथी संस्थेने प्रकल्प अहवाल तयार करण्याच्या सुचना त्यांनी दिल्या.
 सारथी संस्थेचे उपक्रम योजनांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आवश्यकत ते सर्व पाठबळ देण्याबाबत त्यांनी सारथी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आश्वासीत केले.राज्याच्या  मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समितीने पुर्व प्रशिक्षणा करीता  युपीएसी करीता शंभर जागावरून चारशे तर एमपीएसी करीता ४००जागांवरून १हजार जागा निर्माण करण्यास मान्यता दिली असल्याची माहीती मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिली.

राज्य सरकारने सन २०२५-२६  आर्थिक वर्षात ५१५ कोटी रुपयांची तरतूद केली होती. त्यापैकी ४४२ कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला असून, पुरवणी मागण्यां मध्येही ३०० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला  असल्याचे विखे पाटील म्हणाले. सारथी संस्थेमार्फत राज्यात एकूण आठ वसतीगृह उभारण्यात येत असून, यापैकी सहा वसतीगृहांचे काम पूर्ण होत आहेत. या वसतीगृहांमध्ये सहा हजार विद्यार्थ्यांच्या निवासाची व्यवस्था होईल. या वसतीगृहांची काम निर्धारीत वेळेत पूर्ण करुन येत्या शैक्षणिक वर्षापासून ही वसतीगृह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करुन द्यावीत तसेच वसतीगृहांचे व्यवस्थापन नामांकित संस्थां कडून करण्याच्या   सूचना डॉ.विखे पाटील यांनी या बैठकीत दिल्या.

सारथी संस्थेमार्फत सन २०२५-२६ मध्ये एकूण ३४ प्रकारच्या योजना राबवण्यात आल्या आहेत. यासाठी ४८हजार ३८१ मराठा, कुणबी मराठा, मराठा कुणबी समाजातील लक्षीत गटाला एकूण २२२ कोटी रुपये खर्च झाला असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. तसेच स्पर्धा परिक्षा व पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमा मध्ये प्रवेश घेतलेल्या एकूण ११७९ विद्यार्थ्यांनी केंद्रीय लोकसेवा आयोग तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत यश मिळवले आहे. तसेच १६४ देशांतर्गत शिष्यवृत्तीधारक, कौशल्य विकास विभागामार्फत प्रशिक्षीत झालेल्या १०२०९ अशा एकूण ११हजार ९१५ प्रशिक्षार्थी विद्यार्थ्यांना रोजगार उपलब्ध झाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले

राहाता शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे – भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांची आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्याकडे मागणी


राहाता शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व्हावे – भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांची आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांच्याकडे मागणी

राहाता शहर व परिसरातील वाढती लोकसंख्या, ग्रामीण भागातील रुग्णांची वाढती गरज आणि तातडीच्या आरोग्यसेवेचा अभाव लक्षात घेता राहाता येथील ग्रामीण रुग्णालयाचे दर्जोन्नती करून तेथे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय स्थापन करण्यात यावे, अशी ठाम मागणी भाजपाचे नेते डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांची मुंबई येथे भेट घेवुन निवेदनाद्वारे केली आहे. जिल्ह्यातील पाथर्डी, कर्जत, जामखेड, श्रीरामपुर, पारनेर, श्रीगोंदा, कोपरगाव, अकोले, संगमनेर,राजुर इत्यादी तालुक्यात उपजिल्हा रुग्णालये मंजुर झालेली आहे. असे असताना राहाता तालुक्यातच उपजिल्हा रुग्णालय कोणाच्या दबावापोटी होत नाही असा प्रश्नही डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी मंत्र्यांना विचारला. 
डॉ. पिपाडा यांनी नमूद केले की, राहाता तालुका शिर्डी आंतरराष्ट्रीय धार्मिक पर्यटन क्षेत्राशी निगडित असल्यामुळे येथे दररोज मोठ्या प्रमाणावर भाविक व नागरिकांची ये-जा असते. अपघात, आपत्कालीन उपचार, प्रसूती सेवा व विशेष उपचारांसाठी नागरिकांना अहिल्यानगर किंवा इतर ठिकाणी जावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर सक्षम उपजिल्हा रुग्णालयाची तातडीची गरज आहे. जिल्ह्यात इतर ब-याच तालुक्यांमध्ये उपजिल्हा रुग्णालये आहेत. 
उपजिल्हा रुग्णालयात खालील बाबी आवश्यक आहेत त्या पुढील प्रमाणे, रुग्णालय किमान 100 खाटांचे (Beds) असावे व खालील प्रमुख विभाग सुरू करण्यात यावेत :१.आपत्कालीन व ट्रॉमा केअर विभाग- २४x७ आपत्कालीन सेवा,अपघातग्रस्तांसाठी ट्रॉमा बेड, अत्याधुनिक अॅम्ब्युलन्स सेवा २. औषधोपचार (Medicine) विभाग - सर्वसाधारण आजारांचे निदान व उपचार, ICU (किमान 10 खाटांचे) ३.शस्त्रक्रिया (Surgery) विभाग- जनरल सर्जरी OT, लहान-मोठ्या शस्त्रक्रिया सुविधा४.स्त्रीरोग व प्रसूती विभाग (OBGY)-  प्रसूती कक्ष (Labour Room),सिझेरियनसाठी स्वतंत्र OT,मातृ व बाल आरोग्य सेवा ५. बालरोग (Pediatrics) विभाग-नवजात शिशु अतिदक्षता कक्ष (SNCU/NICU),लसीकरण केंद्र ६. अस्थिरोग (Orthopedic) विभाग-फ्रॅक्चर व अपघात उपचार,प्लास्टर रूम ७. भूलतज्ज्ञ (Anesthesia) सेवा, ८. नेत्र, कान-नाक-घसा (ENT) विभाग,९. दंत (Dental) विभाग,१०. क्षयरोग (TB) व संसर्गजन्य रोग विभाग,११. आयुष विभाग (आयुर्वेद/होमिओपॅथी) – ऐच्छिक आवश्यक निदान व सहाय्यक सुविधा- अत्याधुनिक पॅथॉलॉजी लॅब,डिजिटल एक्स-रे,सोनोग्राफी,ECG व 2D Echo,रक्तपेढी / रक्त साठवण केंद्र,औषध वितरण केंद्र (२४ तास),मॉड्युलर ऑपरेशन थिएटर (किमान 2),ऑक्सिजन प्लांट / पाइपलाईन व्यवस्था,शवविच्छेदन कक्ष (Post Mortem Room),स्वच्छता व बायो-मेडिकल वेस्ट व्यवस्थापन
अपेक्षित मनुष्यबळ (किमान) तज्ज्ञ डॉक्टर (Specialists) – 8 ते 10 इतर आवश्यक बाबी २४x७ अॅम्ब्युलन्स (किमान 2),रुग्ण नोंदणीचे संगणकीकरण,रुग्ण मार्गदर्शन कक्ष (Help Desk),दिव्यांगांसाठी सुलभ प्रवेश,पुरेशी पार्किंग व्यवस्था,सुरक्षित पिण्याचे पाणी व प्रतीक्षा कक्ष
डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी आरोग्यमंत्री प्रकाशजी आबिटकर यांना विनंती केली आहे की, राहाता तसेच परिसरातील हजारो नागरिक व भाविकांच्या आरोग्याच्या दृष्टीने या मागणीस तातडीने मान्यता देऊन निधी मंजूर करावा. उपजिल्हा रुग्णालय उभारल्यास स्थानिक नागरिकांना वेळेवर व दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध होईल आणि मोठ्या शहरांवरील ताणही कमी होईल.

मंगळवार, २४ फेब्रुवारी, २०२६

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ४ किलोचा महाकाय ट्यूमर यशस्वीरीत्या काढला - श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड!

श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये ४ किलोचा महाकाय ट्यूमर यशस्वीरीत्या काढला - श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड! 

   शिर्डी :
 श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये एक अतिशय गुंतागुंतीची आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. दिनांक १३ फेब्रुवारी २०२६ रोजी हॉस्पिटलमधील जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे व त्यांच्या टीमने  रुग्णाच्या पोटातून तब्बल चार किलो वजनाचा ट्यूमर सर्जरी करून यशस्वीरीत्या काढून मोठे वैद्यकीय यश संपादन केले आहे. निकिता गायकवाड राहणार कोपरगाव वय 27 ह्या रुग्णाला बाळंतपणानंतर गेल्या काही  दिवसांपासून पोटात तीव्र वेदना व सूज जाणवत होती. त्या तपासणी करिता श्री साईबाबा हॉस्पिटल शिर्डी येथे डॉक्टर अजिंक्य पानगव्हाणे यांच्या कडे आल्या असता तपासणीनंतर  त्यांच्या पोटामध्ये मोठ्या आकाराचा ट्यूमर असल्याचे निदान झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. डॉ. अजिंक्य पानगव्हाणे  व भूलतज्ञ  डॉ निहार जोशी यांच्या कुशल नेतृत्वाखाली श्री साईबाबा हॉस्पिटल मधील वैद्यकीय टीमने अत्यंत कौशल्यपूर्ण पद्धतीने शस्त्रक्रिया पूर्ण केली. या  शस्त्रक्रियेमध्ये  श्रद्धा, सबुरी आणि शस्त्रकौशल्याची सांगड झाल्याचे दिसून येत असून सध्या रुग्णाची प्रकृती पूर्णतः स्थिर असल्याकारणाने व समाधानकारकरीत्या सुधारल्यामुळे डॉक्टरांनी त्यांना नुकताच डिस्चार्ज दिला. आधुनिक तंत्रामुळे शस्त्रक्रिया कमी वेदनादायक, कमी रक्तस्रावाची आणि जलद पुनर्वसनाची ठरली आहे. श्री साईबाबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध आधुनिक वैद्यकीय सुविधा आणि अनुभवी डॉक्टरांमुळे परिसरातील रुग्णांना मोठा आधार व दिलासा मिळत आहे.रुग्णाच्या कुटुंबीयांनी डॉक्टर व संपूर्ण वैद्यकीय टीमचे मनःपूर्वक आभार मानले असून, डॉ. अजिंक्य पानगव्हाणे भूलतज्ञ डॉ निहार जोशी व जनरल सर्जरी विभागातील सर्व कर्मचाऱ्यांचे श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर  साहेब(भा प्र से ) यांनी कौतुक केले.

छत्रपती शिवरायांचे शौर्य आणि संस्कारक्षम कार्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-रवींद्र पवार

छत्रपती शिवरायांचे शौर्य आणि संस्कारक्षम कार्य विद्यार्थ्यांनी आत्मसात करावे-रवींद्र पवार
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशनगर येथे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी झाली, त्यावेळी शिवजयंतीचे औचित्य साधून हिंदुस्थान फिड्स कंपनीचे बारामती कॅटल फीड्स आणि ऍग्रो कंपनी श्रीरामपूर यांनी शाळेतील सर्व180 विद्यार्थ्यांना टिफिन बॅग व टिफिन बॉक्स भेट देऊन शिवरायांच्या कार्याला मानवंदना दिली. शिवजयंतीच्या निमित्ताने शाळेतील मुलांनी छत्रपती शिवरायांची आणि राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा करून सुंदर अशी भाषणे केली. तसेच काही विद्यार्थ्यांनी पोवाडा, गाणी  म्हटली. हिंदुस्तान फीड्स कंपनीचे मार्केटिंग ऑफिसर रवींद्र पवार म्हणाले की छत्रपती शिवरायांचे विचार आपण प्रत्यक्ष अमलात आणले पाहिजे. समाजाचेप्रती आपले काही देणे लागते, या सदभावनेने कंपनीने विद्यार्थ्यांना साहित्याचे वाटप केले. दरवर्षी कंपनी सीएसआर फंडातून शालेय विद्यार्थ्यांना साहित्य देऊन आपले दायित्व सिद्ध करत असते. त्याचप्रमाणे याच कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी आणि शिव मल्हार दूध संकलन केंद्र वाकडीचे संस्थापक  विनोद लहारे यांनी शाळेसाठी 21000 रुपयाची देणगी दिली, त्याचप्रमाणे साई वेदांत पशुखाद्य रामपूरवाडी चे सर्वेसर्वा गणेश आग्रे यांनी शाळेला पाच हजार रुपयाची देणगी देऊन कृतज्ञता व्यक्त केली.

 सदर प्रसंगी शाळेतील विद्यार्थ्यांचे सुंदर असे कार्यक्रम पाहून दत्तगुरू पतसंस्थेचे संस्थापक सोपान काका कासार यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एक हजार रुपये खाऊ साठी दिले. शिवजयंतीचा कार्यक्रम उत्कृष्ट आणि देखणा व्हावा, त्याचप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थिती नसल्याने मिशन आपुलकी अंतर्गत जास्तीत जास्त मदत कशी मिळवून देता येईल यासाठी गणेश कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे पाटील हे नेहमीच सहकार्य करत असतात, त्यांच्या पुढाकारातून  हा कार्यक्रम अतिशय यशस्वी झाला . शाळेतील विविध उपक्रम आणि गुणवत्ता तसेच शाळेच्या विविध अडीअडचणी याबाबत सविस्तर विवेचन शाळेचे मुख्याध्यापक संजय घोलप सर यांनी केले.सदर कार्यक्रमाच्याप्रसंगी हिंदुस्तान फीडसचे सेल्स मॅनेजर पांडुरंग सातपुते, स्टोअर मॅनेजर रामदास कातोरे, स्टोर ऑफिसर स्वानंद जाधव, ग्राहक सेवा विकासअधिकारी किरण गायकवाड ,राहता तालुका अधिकारी शुभम लांडगे उपस्थित होते. गणेशनगर येथील सामाजिक कार्यकर्ते विजयराव सदाफळ आणि एसटी महामंडळाचे आदर्श कर्मचारी राजेंद्र जाधव यांनी शाळेसाठी साऊंड सिस्टिम भेट दिली 
.सदर प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे तसेच सरपंच सुनीताताई कासार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रोहिणी घोगळ, दत्तगुरु पतसंस्थेचे सोपानका कासार ,माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य चौधरी सर, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, जयंत गिरमे ,निकिता परदेशी, अंबिका देसाई ,श्रद्धा राहिंज ,भारती मोहन ,कविता पवार उपस्थित होते

 कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दत्ता गायकवाड 
तर प्रास्ताविक कैलास चिंधे यांनी केले.
 तसेच आभार प्रदर्शन रोशन धनवटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुनिता गागरे, मनीषा निर्मळ, वेरोनिका गायकवाड, सुनील गायकवाड ,सोनल भावसार, भाऊसाहेब सहाणे यांनी विशेष परिश्रम घेतले. गणेशनगर शाळेला नेहमीच उच्चांकी मिशन आपुलकी मिळत असते, त्याबद्दल गट विकास अधिकारी विवेक गुंड,गटशिक्षणाधिकारी राजेश पावसे, विस्ताराधिकारी भाऊसाहेब घोरपडे, विष्णू कांबळे, केंद्रप्रमुख सोमनाथ वैद्य यांनी अभिनंदन केले.

राहाता शहराजवळील श्री.भगवान महावीर स्वामी व श्री सुमतीनाथ जैन मंदिरात मोठा दरोड्याचा प्रयत्न फसला — डॉ. राजेंद्र पिपाडा व अंगरक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला


राहाता शहराजवळील श्री.भगवान महावीर स्वामी व श्री सुमतीनाथ जैन मंदिरात मोठा दरोड्याचा प्रयत्न फसला — डॉ. राजेंद्र पिपाडा व अंगरक्षकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

राहाता येथील श्री. सुमतीनाथ जैन मंदिरामध्ये मोठ्या दरोड्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला असून डॉ. राजेंद्र पिपाडा व त्यांच्या अंगरक्षकांच्या वेळेवर केलेल्या सतर्कतेमुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला आहे. या घटनेची पहाणी करण्यासाठी शिर्डीचे पो.नि.रनजित गलांडे,राहाता पो.नि. नितीन चव्हाण व प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ.ममता पिपाडा,संघपती अनिल पिपाडा,मदनलाल पिपाडा,महावीर पिपाडा,निखील पिपाडा,साहील पिपाडा,महेंद्र पिपाडा, ललित धाडीवाल, निलेश पिपाडा, आदी उपस्थित होते.
मिळालेल्या माहितीनुसार, चार अज्ञात दरोडेखोरांनी मंदिर परिसरात प्रवेश करून मंदिराचा दरवाजा तोडुन दानपेटी चोरुन नेण्याचा प्रयत्न केला. या वेळी उपस्थित असलेल्या अंगरक्षकावर हल्ला करण्याचाही प्रयत्न दरोडेखोरांकडून करण्यात आला. मात्र अंगरक्षकाच्या धाडसी व सतर्क भूमिकेमुळे त्यांचा डाव पूर्णपणे हाणून पाडण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी रात्री तात्काळ जिल्हा पोलिस अधिक्षक श्री.सोमनाथजी घार्गे व अतिरिक्त पोलिस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या तत्परतेमुळे पोलिस यंत्रणा त्वरित सक्रिय झाली आणि घटनास्थळी पोलिसांचा मोठा फौजफाटा दाखल झाला.तपासासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे (LCB) पथकही पाचारण करण्यात आले असून मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन व ठसे तज्ञ यांच्या मदतीने तपासाला वेग देण्यात आला आहे. घटनास्थळी पंचनामा व पुरावे संकलनाची प्रक्रिया सुरू आहे.या सतर्कतेमुळे मंदिरातील मोठे आर्थिक नुकसान तसेच संभाव्य जीवितहानी टळल्याचे प्राथमिक माहितीवरून स्पष्ट होत आहे. परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला असून संशयितांचा शोध घेण्यासाठी व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे.या घटनेमुळे मंदिर परिसरातील सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेण्याची गरज अधोरेखित झाली असून भाविकांमध्येही सतर्कतेचे आवाहन करण्यात येत आहे.
यावेळी अधिक माहिती देताना डॉ.राजेंद्र पिपाडा यांनी नागरिकांना आवाहन केले.आपल्या परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल दिसल्यास तत्काळ पोलिसांना कळवावे.मंदिर व सार्वजनिक ठिकाणी CCTV, सुरक्षा रक्षक व प्रकाशव्यवस्था सक्षम ठेवावी.
अनोळखी व संशयास्पद व्यक्तींवर लक्ष ठेवून स्थानिक प्रशासनाला माहिती द्यावी.
सोशल मीडियावर अप्रमाणित माहिती किंवा अफवा पसरवू नयेत.
पोलिस तपासात नागरिकांनी सक्रिय सहकार्य करावे. स्थानिक पोलिस स्टेशन व आपत्कालीन क्रमांक मोबाईलमध्ये सेव्ह करून ठेवावेत.
डॉ.राजेंद्र पिपाडा यांचे अंगरक्षक शैलेश मोहन भोयर यांनी राहाता पो.स्टे.ला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, अहिल्यानगर पोलिस दलात कार्यरत असून मी पोलीस मुख्यालय अहिल्यानगर येथे नेमणुकीस आहे. मी मागील एक महिण्यापासुन राहाता शहरातील राजेंद्र पिपाडा यांन अंगरक्षक म्हणून कर्तव्यास आहे, दि. 23/02/2026 रोजी मी राजेंद्र पिपाडा यांचे अंगरक्षक कर्तव्य पार पाडीत होतो. मी व राजेंद्र पिपाला असे आम्ही सोबत दिवसभराचे भेटीचे कार्यक्रम करून राजेंद्र पिपाडा यांचे निवासस्थानी रात्री 08/00वा गेलो 4 मी माझ्या आरामाच्या ठिकाणी रुमवर जेवण करून झोपी गेलो, तसेच राजेंद्र पिपाडा हे देखिल त्यांचे कुटुंबाराह रात्री 11/00 व सुमारास झोपी गेले. राजेंद्र पिपाडा यांचे घरामागे श्री सुमतीनाथ जैन मंदिर आहे. तसेच शेजारीच संतोष लोढा यांचे घर आहे. दि.24/02/2026 रोजी रात्री 03/00 सुमारास श्री सुमतीनाथ जैन मंदिर येथे असलेले पुजारी नामे विनायक गजानन देशपांडे यांना संतोष लोढा यांगी फोन केला परंतु त्यांचा फोन बंद लागल्याने त्यांनी राजेंद्र पिपाडा यांना फोन केला की श्री सुमतीनाथ जैन मंदिर येथे  चोर आल्याचे दिसत आहे असे कळविल्याने राजेंद्र पिपाडा यांनी मला फोन करुन कळविले की, तुम्ही श्री सुमतीनाथ जैन मंदिरा जवळ या तेथे काही चोर आलेले आहे. मी देखिल तेथे येतो असे मला कळविल्यानंतर मी लगेच आहे त्या स्थितीत माझ्या जवळील वेपन न घेता सिव्हील कपड्यांवरच तेथे गेलो, तेथे दोन अनोळखी इसम मंदिराचे ओट्यावर व दोन ईसम मंदिराचे मागील बाजुला उभे असल्याचे मला दिसले, त्यावेळी मी समोर उभे असलेल्या ईसमांना "कोण आहे, कोण आहे" असे जोरात ओरडलो त्यातील एका तोंड मधलेल्या ईसमाने त्याचे हातातील असलेला लोखंडी रॉड माझ्या अंगावर उगारला त्यावेळी मी लगेच मागे सरकलो, त्यावेळेस ते सर्व ईसम मागे सरकून उडी मारून मंदिराचे मागील बाजूने पळून गेले. तेव्हा तेथे राजेंद्र पिपाडा हे देखिल आले. त्यानंतर बाहेर ओरात आरडाओरडा चालु असल्याने मंदिर पुजारी यांनी राजेंद्र पिपाडा यांना फोन केला की माझ्या घराची कड़ी बाहेरुन कोणीतरी लावलेली आहे. आम्ही सर्व तथे मंदिराचे नागील पुजारी देशपांडे यांचे रुमजवळ गेलो त्यांचे धराची कड़ी उघडुन त्यांना मंदिराची चावी घेण्यास सांगुन आम्ही मंदिर चेक केले असता मंदिराचे दरवाजाची फळी कटरने उचकून खाली पडलेली दिसली तसेंच आम्ही मंदिराचे कुलूप उघडुन पाहीले असता मंदिराची दानपेटी ही सुस्थितीत असुन इतर कोणत्याही वस्तूचे नुकसान झालेले दिसले नाहीं, तसेच आम्ही बाहेरील परिसर चेक केला असता मंदिरा मागील बाजुस असलेले तार कंपाऊंडची तार कटरने कापलेली दिसुन आली, तेव्हा राहाता पोलीस स्टेशन व शिर्डी पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंभजदार है शासकीय वाहनासह तेथे आले. त्यांनी सर्वानी मंदिराची व परिसराची गहमी केली त्यांना आम्ही झालेल्या घटने बाबत सांगितले, त्यानंतर मी व मंदिराचे पुजारी देशपांडे असे आम्ही राहाता पोलीस स्टेशन येथे वरिल चार अनोळखी चोरांविरुद्ध माझी कायदेशीर फिर्याद आहे. 
वरील प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे.

डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड

डॉ. सुजय विखे पाटील यांची भाजपच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड


लोणी

महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाची घडामोड घडत भाजपने आपल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली आहे. दीर्घ प्रतीक्षेनंतर जाहीर झालेल्या या यादीत अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्याचा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, नगर जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरावी अशी निवड करत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना थेट प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईतून नव्या कार्यकारिणीची घोषणा केली. या घोषणेत डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह इतर दहा जणांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली. विधानसभा, नगरपालिका आणि महानगरपालिका निवडणुकांदरम्यान त्यांनी केलेल्या संघटनात्मक कामाची आणि पक्षविस्तारासाठी घेतलेल्या मेहनतीची दखल या निवडीमधून घेतल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
नगर जिल्ह्यातून थेट राज्य संघटनेत एवढ्या उच्च पदावर वर्णी लागण्याची ही पहिलीच वेळ असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वतः डॉ. विखे पाटील यांनीही या जबाबदारीला संधी मानत राज्यभर पक्षवाढीसाठी अधिक जोमाने काम करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
२०२९ च्या निवडणुकांवर लक्ष
भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने या नव्या कार्यकारिणीला मान्यता देताना २०२९ मधील लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. संघटनात्मक बळकटी, नव्या नेतृत्वाला वाव आणि विविध सामाजिक घटकांपर्यंत पोहोच वाढवणे या उद्दिष्टांवर भर देण्यात आला आहे. नव्या चेहऱ्यांना दिलेली संधी ही आगामी राजकीय रणनीतीचा भाग मानली जात आहे.
प्रदेश उपाध्यक्षपदी निवड झालेली प्रमुख नावे
डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह खालील नेत्यांना प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे: 
गोपीचंद पडळकर, चेतन देशमुख, अतुल कासेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्याय, प्रवीण पोटे आणि अर्चना चाकोरकर.तसेच सरचिटणीस पदावर निरंजन डावखरे, योगेश क्षिरसागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे आणि सुनील राणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. चिटणीस म्हणून प्रशांत ठाकूर, मंगेश चव्हाण, परिणय, वर्षा ढहाळे, संजय जगताप, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी वाघ यांची निवड झाली आहे. कोषाध्यक्षपदी मिहिर कोटेचा, सहकोषाध्यक्ष म्हणून लखानी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य प्रवक्तेपदी नवनाथ बन, युवा मोर्चा अध्यक्षपदी कृष्णराज महाडिक तर महिला मोर्चा अध्यक्षा म्हणून चित्रा वाघ यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
राजकीय समीकरणांमध्ये नवा अध्याय
या नव्या नियुक्त्यांमुळे भाजपच्या राज्य संघटनेत ताजेपणा आणि नवे नेतृत्व समोर आले आहे. जिल्हा ते राज्य असा प्रवास करत नेतृत्वाला मिळालेली संधी ही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी मानली जात आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक शिस्त, विस्तार आणि प्रभावी जनसंपर्क यावर भर देत पक्ष पुढील वाटचाल करणार असल्याचे संकेत या घोषणेतून मिळत आहेत.

सोमवार, २३ फेब्रुवारी, २०२६

ढवळपुरी येथील आदिवासी जमिनीवरील बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश

ढवळपुरी येथील आदिवासी जमिनीवरील बांधकाम प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांचे चौकशीचे आदेश 

दोषींवर कारवाई झाल्याशिवाय गप्प बसणार नाही-ज्ञानेश्वर अहिर
 
लोणी 




  पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील आदिवासी जमिनीवरील बांधकाम प्रकरणी  जिल्हाधिकाऱ्यांनी पारनेर तहसीलदारांना चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या जमिनीवर सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या बांधकामाचे गुड उकलणार आहे.
         सदर आदिवासी जमिनीचे मूळ वारसदार महादू तुकाराम पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करून ढवळपुरी ता. पारनेर येथील सर्वे नंबर ११२०/२/१,११२०/२/२,११२०/२/३,११२०/२/५ ,११२०/२/६ व ११२०/२/७ या गट नंबर मधील आदिवासींच्या जमिनीवर सतलोक आश्रम (मुनिंदर धर्मार्थ ट्रस्ट, हरियाणा) यांच्याकडून अनेक कोटी रुपयाचं बांधकाम  आदिवासी जमिनीवर सुरू असून या  जमिनीच्या मूळ मालकांना भूमिहीन करून त्यांच्यावर अन्याय करण्यात आला असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच आदिवासी जमिनीचे हस्तांतरण करून बेकायदेशीर खरेदीखत करण्यात आले असल्याचाही दावा करण्यात आला आहे. तसेच आदिवासी जमिनीवरील बांधकाम त्वरित थांबवून ही जमीन आदिवासींना परत द्यावी व दोषी असणाऱ्या प्रत्येकावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करून न्याय हक्कासाठी उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला होता. सदर गंभीर प्रकाराची जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेऊन पारनेर तहसीदारांना चौकशीचे आदेश दिले असून त्यात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, महादेव तुकाराम पवार रा. ढवळपुरी ता.पारनेर यांचा संदर्भीय अर्ज आपणाकडे चौकशीसाठी पाठवत असून सदर अर्जातील नमूद मुद्द्याबाबत नियमोचीत कार्यवाही करावी. असा आदेश जिल्हाधिकारींनी दिल्याने या प्रकरणात नेमके काय घडले आहे तसेच आदिवासी जमिनीवर कोट्यावधीचे बांधकाम करणाऱ्या हरियाणा येथील ट्रस्टचा नेमका उद्देश काय आहे. तसेच आदिवासी जमीन हस्तांतर करण्यासाठी कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी मदत केली व बेकायदेशीर खरेदी खत करून जमीन ट्रस्टला देण्यात आली अशा अनेक प्रश्नांची उकल होणार आहे. व आदिवासींना त्यांची जमीन परत मिळेल का ? त्यामुळे आदिवासींच्या जमिनीवर कोट्यावधींचे बांधकाम करणाऱ्या सतलोक आश्रम यांच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकली आहे. 
         दरम्यान एकलव्य आदिवासी सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर अहिरे यांनी म्हटले आहे की,आदिवासी जमिनीवर सुरू असलेल्या कोट्यावधी रुपयांच्या बांधकामाची निपक्षपाती चौकशी झाली पाहिजे व आदिवासींना सदर जमीन परत मिळाली पाहिजे व दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे तरच यापुढील काळात आदिवासींच्या जमिनी वाचतील त्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा करणार आहोत व आरोपींवर कायदेशीर कारवाई होईपर्यंत गप्प बसणार नाही असा इशारा ज्ञानेश्वर अहिरे यांनी दिला आहे त्यामुळे पारनेर येथील आदिवासी प्रकरणात चौकशी होऊन नेमकी काय कारवाई होते याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कोपरगाव येथील डीलर साई सेवा मोटर्स यांच्या वतीने ९ लाख ५० हजार रुपये किमतीचे चार वाहने साई संस्थानला देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आले


श्री साईबाबा संस्‍थान यांना टीव्हीएस मोटर कंपनी चे कोपरगाव येथील ऑथोराईज्ड डिलर साईसेवा मोटर्स यांच्या वतीने एकूण ०९ लाख ५० हजार रुपये किंमतीची चार वाहने देणगी स्वरूपात प्रदान करण्यात आली. या देणगीत TVS APACHE RTX 310, TVS NTORQ 150, TVS ORBITER (EV) व TVS 3 WHEELER CARGO अशा चार वाहनांचा समावेश आहे. या वाहनांचे विधीवत पूजन टीव्हीएस मोटर कंपनी प्रीमियम विभागाचे प्रमुख श्री. विमल सुमली व संस्थानचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, अतुल वाघ, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे उपस्थित होते. तसेच कंपनीच्या वतीने गोपाला सर, मोहक द्वार साई टीव्हीएस कोपरगावचे संचालक वीरेंद्र भांडारकर, 3 व्हीलर विभागाचे सौरभ लादगेकर व विवेक दवे आदी मान्यवर उपस्थित होते.
त्यानंतर श्री साईबाबा संस्‍थान चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते साईसेवा मोटर्स व टीव्हीएस मोटर कंपनीच्या प्रतिनिधींचा सत्कार करण्यात आला.

शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६

राज्यस्तरीय मंदिर प्रीमियर लीगमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार

राज्यस्तरीय मंदिर प्रीमियर लीगमध्ये यशस्वी ठरलेल्या खेळाडूंचा माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सत्कार
शिर्डी
दि. १३ ते १६ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत कोल्हापूर येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय मंदिर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डीच्या क्रिकेट संघाने उल्लेखनीय कामगिरी करत उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली व चतुर्थ क्रमांक पटकावला. तसेच महाराष्ट्रातील सर्व देवस्थानांच्या संघांमध्ये “सर्वांत शिस्तबद्ध संघ” हा मानाचा पुरस्कार (चषक व रु. ५,५५५/- रोख पारितोषिक) संस्थानच्या संघाला प्राप्त झाला.
या उल्लेखनीय यशाबद्दल आज संस्थानचे माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते खेळाडूंचा सत्कार करण्यात आला.
कर्णधार श्री. सुदेश रामदास शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संघातील पुढील खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी बजावली — गणेश रूपचंद जानराव, अतिक दिलदार पठाण, आकाश भानुदास नराडे, अनिल शंकर जगताप, संतोष बाबासाहेब गावडे, बाबासाहेब लहाणु दरके, चंद्रकांत दिलीप जपे, अंबादास नवीन शेजवळ, किरण भगवान मोरे, प्रमोद भानुदास बहे, सुदर्शन अशोक वेर्णेकर, दुश्यंत छत्रराव आहेर व श्याम माधव वायकर.
संघाला मार्गदर्शन क्रीडाशिक्षक श्री. राजेंद्र कोहोकडे सर व डॉ. विक्रम सातपुते सर यांनी केले. तसेच स्पर्धेत सहभागी होण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे साहेब व प्रशासकीय अधिकारी श्री. अतुल वाघ साहेब यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी खेळाडूंना पुढील स्पर्धांसाठी शुभेच्छा देत संस्थानच्या सेवकांनी क्रीडा क्षेत्रातही आदर्श निर्माण केल्याबद्दल कौतुक केले. ही कामगिरी केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून शिस्त, संघटन आणि संस्थानप्रती निष्ठेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

शुक्रवार, २० फेब्रुवारी, २०२६

लोणी खुर्द येथे शिवजयंती उत्साहात साजरी; जयघोषात दुमदुमला परिसर

लोणी खुर्द येथे शिवजयंती उत्साहात साजरी; जयघोषात दुमदुमला परिसर

(राहाता)
 तालुक्यातील लोणी खुर्द येथे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात, भक्तीमय आणि जल्लोषपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. वेताळबाबा चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून व आरतीने कार्यक्रमाची सुरुवात झाली.
यावेळी ग्रामस्थ, युवक-युवती, महिला तसेच मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. “जय जिजाऊ, जय शिवराय”च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. महाराजांच्या पराक्रमाचा आणि त्यांच्या सुराज्य संकल्पाचा जागर करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना शिवजयंतीच्या शुभेच्छा दिल्या. आपल्या मनोगतात त्या म्हणाल्या, “छत्रपती शिवाजी महाराजांनी अठरा पगड जाती-जमातींना एकत्र आणत स्वराज्याची स्थापना केली. माता-भगिनींचा सन्मान, शेतकऱ्यांचे रक्षण आणि रयतेला न्याय देणे हा त्यांच्या राज्यकारभाराचा मूलमंत्र होता. आजच्या पिढीने महाराजांचे शौर्य, स्वाभिमान आणि संघटनशक्ती आत्मसात करून समाजहितासाठी कार्य करणे हीच खरी शिवजयंती ठरेल.”

कार्यक्रमादरम्यान अलीकडेच दिवंगत झालेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना ग्रामस्थांच्या वतीने दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यानंतर पारंपरिक अश्वनृत्याचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले. शिवकालीन वेशभूषेत सादर करण्यात आलेल्या बालकलाकारांच्या देखाव्यांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मा श्री जनार्दन चंद्रभान घोगरे प्रतिष्ठान तसेच ग्रामस्थांचे विशेष सहकार्य लाभले. शिवजयंती निमित्त संपूर्ण गावात उत्साह आणि शिवभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले.

वाहतूक कोंडीत अडकले नगरकर, ट्राफिक मोकळे करण्यासाठी सुजय विखे पाटील मैदानात

वाहतूक कोंडीत अडकले नगरकर, ट्राफिक मोकळे करण्यासाठी सुजय विखे पाटील मैदानात

राहुरी 

अहिल्यानगरकडे येताना राहुरी शनिशिंगणापूर फाट्यावर निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीमुळे काही काळ पूर्णतः ठप्प झालेली वाहतूक पाहून डॉ.सुजय विखे पाटील यांनी स्वतः वाहनातून खाली उतरून स्वतः रस्त्यावर उतरून पुढाकार घेत काही वेळातच वाहतूक सुरळीत केली.

वाहतूक कोंडी परिस्थितीचा आढावा घेतला. महामार्गावरील अडथळे, सुरू असलेली रस्त्याची कामे आणि अवजड वाहनांची वाढती संख्या यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले.
कोंडीत अडकलेल्या प्रवाशांशी संवाद साधत त्यांनी रोजच्या समस्यांची माहिती घेतली. कार्यालयीन वेळेत होणारी विलंब, शाळा–महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना होणारा त्रास, तसेच आपत्कालीन सेवांना अडथळा निर्माण होण्याबाबत नागरिकांनी चिंता व्यक्त केली. यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने पर्यायी मार्ग नियोजन आणि वाहतूक नियंत्रणाची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.
नगर मनमाड मार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामांमुळे वाहतूक व्यवस्थापन ढासळत असल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी कामाचा वेग वाढवण्याबरोबरच सुरक्षित वळणे, स्पष्ट सूचना फलक आणि अतिरिक्त मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. “विकासकामे महत्त्वाची असली तरी नागरिकांच्या दैनंदिन जीवनात अडथळा येऊ नये,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय

मुळा डाव्या उजव्या कालव्याचे २३ फेब्रुवारी पासून आवर्तन 

शेतकर्याची मागणी लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांचा निर्णय 


अहील्यानगर 

मुळा लाभक्षेत्रातील मुळा उजवा व डाव्या कालव्या वरील शेतकऱ्यांची पाण्याची मागणी लक्षात घेवून रब्बी हंगाम 2 साठी  २३ फेब्रुवारी २०२६ पासून आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी विभागाच्या अधिकार्याना दिल्या आहेत.

 सद्य परिस्थितीत उन्हाची तीव्रता वाढल्याने लाभक्षेत्रात पाण्याची पातळी खूपच खालावल्याने  शेतकर्याची पाणी सोडण्याची मागणी मोठ्या प्रमाणात होती. यासंदर्भात आ. मोनिकाताई राजळे, आ.विठ्ठलराव लंघे यांनी जलसंपदा मंत्री विखे पाटील साहेब यांची भेट घेवून रब्बी पिकांची तसेच पिण्याच्या पाण्याची आवश्यकता लक्षात घेवून आवर्तन सोडण्याची विनंती केली होती. 

मंत्री विखे पाटील यांनी धरणातील पाण्याचा उपलब्ध साठा तसेच भविष्यातील पाण्याचे नियोजन विचारात घेवून आवर्तनाचा कालावधी निश्चित करण्याचे अधिकार्यांना सांगितले.

सदर आवर्तनाचा उजवा कालव्या वरील राहुरी, नेवासा, शेवगाव, पाथर्डी या तालुक्यातील लाभक्षेत्रातील शेतकर्यांना  फायदा होणार असून, सदर आवर्तन ४५ दिवसाचे असेल, त्याच्यासाठी धरणातील ५ टीएमसी इतका पाणीसाठा राखीव आहे. या या आवर्तनाचा लाभ अंदाजित २७हजार  हेक्टर क्षेत्राला होईल.

    मुळा डाव्या कालव्यासाठी ४५० एमसीएफटी इतका पाणीसाठा असून आवर्तन २१ दिवस चालणार आहे. त्याचा फायदा अंदाजीत २५००हेक्टर इतके क्षेत्राला होईल.आवर्तनाच्या कालावधीत पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या तसेच शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळेल असे नियोजन अधिकार्यांनी करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.

शेतकरी संपन्न झाला तर भारत सशक्त होईल श्री पांडुरंग सातपुते


शेतकरी संपन्न झाला तर भारत सशक्त होईल
  श्री पांडुरंग सातपुते 
भारतीय शेतकऱ्याने शेती व्यवसाया बरोबरच दुग्ध व्यवसायाकडे लक्ष दिले पाहिजे दुग्ध व्यवसायामुळे शेतकरी संपन्न होईल पर्यायाने भारत सशक्त बनेल असे सांगितले छत्रपती शिवाजी महाराजांच्या 396 व्या जयंती निमित्त महाराजांच्या प्रतिमेचे पूजन  करण्यात आले हिंदुस्तान फीड्स शाखा श्रीरामपूर चे एरिया सेल्स मॅनेजर श्री पांडुरंग सातपुते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे महत्त्व सांगितले. रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेमध्ये हिंदुस्तान फीड्स कंपनी तर्फे विद्यालयातील विद्यार्थ्यांना स्टीफिन व टिफिन बॅग वितरित करण्यात आले याप्रसंगी मार्केटिंग ऑफिसर श्री रवींद्र पवार सर यांनी हिंदुस्तान फीड्स कंपनीचे बनवलेले पशुखाद्य उत्कृष्ट आणि भरपूर दूध देण्यासाठी उपयोगी आहे हे समजावून सांगितले श्री किरण गायकवाड ग्राहक सेवा अधिकारी यांनी हिंदुस्तान फीड्स चे पशुखाद्य अतिशय चांगल्या प्रतीचे आहे आणि ते आपल्या शेतकऱ्यांना स्वावलंबी दुग्ध व्यवसाय करण्यासाठी उपयोगी आहे याबद्दल मार्गदर्शन केले यावेळी धीरज बोरसे यांनी विद्यार्थ्यांना परिस्थितीनुरू प्रत्येक जण आपल्या क्षेत्रात विजय मिळवतो हे पटवून देताना घोडा उंट आणि माकड यांची दाखले देऊन विद्यार्थ्यांना समजावून सांगितले 
 *यावेळी विद्यालयाचे माजी विद्यार्थी वाकडी गावचे सुपुत्र  हिंदुस्तान फीड्स  पशुखाद्य कंपनीचे अधिकृत डीलर  विनोद लहारे यांनी विद्यालयाच्या ऋणातून उतराई म्हणून विद्यालयाला सीसीटीव्ही कॅमेरे बसून देण्याचे आश्वासन दिले  तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला 21 हजार रुपये देणगी दिली*
विद्यार्थ्यांना स्टीफन व स्टीफन बॅग मिळाल्यामुळे चेहऱ्यावरती एक वेगळाच आनंद दिसून आला या कार्यक्रमासाठी सामाजिक कार्यकर्ते सुभाषराव कापसे श्री गणेश साखर कारखान्याचे संचालक अनिल काका गाढवे ,सोपान काका कासार, राजेंद्र जाधव , विजय सदाफळ, मुख्याध्यापक वसावे के के सर उपस्थित होते 
मुख्याध्यापक वसावे सर यांनी या उपक्रमाचे कौतुक करून सर्वांचे आभार मानले

गुरुवार, १९ फेब्रुवारी, २०२६

पानेगांव -मांजरीत अवतरली शिवशाही छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दर्शनासाठी शिवप्रेमींची गर्दी!

पानेगांव -मांजरीत अवतरली शिवशाही 
छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा दर्शनासाठी शिवप्रेमींची गर्दी! 

नेवासा (तालुका प्रतिनिधी) 
नेवासे तालुक्यातील पश्चिमेला तसेच राहुरी तालुक्यातील पुर्व भागातील मुळाथडी परीसरातील पानेगांव मांजरी येथे शिवरायांचा पुतळ्याचे पुजन तसेच दर्शनासाठी राहुरी, श्रीरामपूर ,नेवासे तालुक्यातील शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती.अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांची ३९६ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 
शिवजयंतीच्या पुर्व संध्येला शिवस्मारक समिती तसेच ग्रामस्थांनांनकडून सुशोभीकरण रंगरंगोटी अद्यावत लाईटींग करण्यात आली. सकाळी गोणेगांव रामकृष्ण आश्रमातील हभप भगवान जंगले शास्त्री यांचा हस्ते पुजन शिवरायांची आरती करण्यात आली. 
मांजरी येथील चंद्रागिरी महाराज माध्यमिक विद्यालय तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मांजरी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पानेगांव विद्यार्थ्यांचा वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा वेश परिधान व मावळे शिवकालीन देखावे, घोड्यावर मिरवणूक काढण्यात आली. 
शिवस्मारक समितीच्यावतीने सोनई करजगांव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष संजय जंगले, माजी उपसरपंच रामभाऊ जंगले,डॉ जयवंत गुडधे, सतिश जंगले,माजी सरपंच हौशाबापू जंगले,आमराई उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरज जंगले, उद्योजक सुभाष गुडधे, चैतन्य संस्थेचे अध्यक्ष अनिल जंगले,शिक्षक संघाचे कार्याध्यक्ष संदिप जंगले, डॉ कडूबाळ काकडे,वसंतराव जंगले लक्ष्मीकांत जंगले बाबासाहेब गुडधे संकेत गुडधे,गणेश जंगले, भारत जंगले, आदीं आलेल्या शिवप्रेमींचे स्वागत करुन सन्मान करण्यात आला.यावेळी मांजरी ग्रामपंचायत उपसरपंच कोंडाजी विटनोर, डॉ अमोल विटनोर ,प्रमोद विटनोर,मुळा कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब तुवर,नेवासे नगरपंचायत उपनगराध्यक्ष संजय सुखधान, शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख बाळासाहेब पवार, दिगंबर जाधव,कर्णासाहेब जाधव शिरेगांवचे माजी सरपंच किरण जाधव, रत्नाकर बोर्डे,करजगांवचे उपसरपंच सतिश फुलसौंदर, लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब पाटील,राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेवासा तालुकाध्यक्ष अशोक मोरे, अंमळनेर लोकनियुक्त सरपंच ज्ञानेश्वर आयनर,निंभारीचे पोलीस पाटील संतोष पवार, ज्ञानेश्वर संस्थानचे विश्वस्त कैलास जाधव, वांजूळपोई ग्रामपंचायत सरपंच पती गणेश डोंगरे, मुळाथडी पाणी आरक्षण कृती समितीचे संस्थापक उपाध्यक्ष भाऊसाहेब विटनोर, रासपचे जिल्हाप्रमुख नानासाहेब जुंधारे,पानेगांव ग्रामपंचायत सरपंच निकीता भोसले, उपसरपंच बबनराव जंगले, ग्रामविकास अधिकारी गणेश पाखरे, तंटामुक्ती अध्यक्ष उद्धव चिंधे, पोपटराव पाटील संस्थेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर जंगले उपाध्यक्ष दादासाहेब काकडे, संचालक रमेश गुडधे,पानेगांव संस्थेचे संचालक राजेंद्र जंगले,अशोक गागरे मुळाचे संचालक रंगनाथ जंगले, ज्ञानेश्वर जंगले, संजय वाघमारे, भाऊसाहेब वाघमारे, संत कृपा कन्स्ट्रक्शनचे  सुरेंद्र जंगले, रविंद्र सोनवणे भाऊसाहेब काकडे, नानासाहेब जंगले,लक्ष्मी स्टीलचे संचालक प्रविण जंगले आदीं सह मान्यवर उपस्थित होते.

लोकनेते सुनिलभाऊ गडाख पाटील मित्र मंडळाच्यावतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...