शुक्रवार, ९ जानेवारी, २०२६

लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री व सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप यांचे वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्का

लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्री व सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप यांचे वतीने नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार :

                 राहाता येथील लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे व्हाइस प्रेसिडेंट ला. डॉ. स्वाधीन गाडेकर हे नुकत्याच झालेल्या राहाता नगरपालिकेच्या निवडणुकीत जनतेतून प्रचंड मताधिक्याने " नगराध्यक्ष " म्हणून त्यांच्या संपूर्ण पॅनलसह निवडून आल्याबद्दल काल बुधवार दिनांक 7 जाने. 2026 रोजी रात्री 8 वाजता के. बीज. रिसॉर्ट लोणी येथे नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवक यांचा सत्कार समारंभ व  स्नेहभोजन संपन्न झाले. या समारंभात लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे वतीने प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर व ला. राजेंद्र फंड यांनी लोकोपयोगी काही सूचना सुचविण्यात आल्या. त्या मान्य करण्याची ग्वाही सन्माननीय नगराध्यक्ष ला. डॉ. स्वाधीन गाडेकर यांनी दिली. 


वेळी सर्व निर्वाचित पदाधिकारी यांनी लायन्स क्लब राहाता सह्याद्री व सह्याद्री ट्रेकिंग ग्रुप राहाता हे राहाता येथे करत असलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. या सत्कार समारंभास लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे सर्व सदस्य तसेच सह्याद्री ट्रेकिंग ग्रूपचे सर्व सदस्य हजर होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

५ हजार रोपे... लाखो श्वासांचे भविष्य!'. श्वासांची गुंतवणूक' उपक्रमातून मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनचा हरित संकल्प; भावी पिढ्यांसाठी निरोगी, हिरव्या आणि समृद्ध भविष्यासाठी समाजाला प्रेरणादायी संदेश

५ हजार रोपे... लाखो श्वासांचे भविष्य! 'श्वासांची गुंतवणूक' उपक्रमातून मनोमय हिलिंग हार्ट फाउंडेशनचा हरित संकल्प; भावी पिढ्यांसाठी नि...