रविवार, ७ डिसेंबर, २०२५

साईबाबाच्या पादुका दर्शन सोहळ्याला सध्या उत्तर भारतातील दौऱ्यातही भाविकांकडून अत्यंत उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे


श्री साईबाबांच्या पादुका दर्शन सोहळ्याला विदर्भात मिळालेल्या ऐतिहासिक प्रतिसादानंतर, सध्या उत्तर भारतातील दौऱ्यातही भाविकांकडून अत्यंत उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.
दिनांक ०१ डिसेंबर २०२५ ते १४ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री साईबाबांच्या पादुका दिल्ली, चंदीगड, जालंदर, लखनौ सारख्‍या उत्तर भारतातील प्रमुख शहरांमध्ये दर्शनासाठी नेण्यात येत आहेत.
या सोहळ्याची सुरुवात ०१ डिसेंबर पासून दिल्ली येथुन झाली. त्यानंतर नोएडा व रोहिणी येथे झालेल्या पादुका दर्शनासही हजारो साईभक्तांनी उपस्थित राहून भक्तिभावाने दर्शनाचा लाभ घेतला.
काल ०५ डिसेंबर पादुका चंडीगढ़ येथे पोहोचल्या असता भजन, ढोल-ताशा, टाळ-मृदुंग, फुलांच्या पुष्पवृष्टी, स्वागत मिरवणुका अशा भव्य सोहळ्यात श्रींचे स्वागत करण्यात आले. स्थानिक भाविक, विविध सामाजिक संस्था, महिला मंडळे, युवक संघटना, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी अशा सर्व स्तरातील नागरिकांनी मोठ्या भक्तिभावाने श्रींच्या पादुकांचे दर्शन घेतले.
यापूर्वीच्या विदर्भ दौऱ्यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा येथे जसे उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले तसेच उत्तर भारतातील शहरांतही श्रद्धा आणि भक्तीची प्रचंड उर्जा पाहायला मिळत आहे. 

वयोवृद्ध, दिव्यांग भाविक, अनाथालये व वृद्धाश्रमातील नागरिकांनीही आदरपूर्वक पादुका दर्शनाचा लाभ घेतल्याचे समाधानकारक चित्र दिसून येत आहे.
आता पुढील दिवसांमध्ये पादुकांचा दौरा खालील प्रमुख शहरांत होणार आहे:
जालंधर ०७ डिसेंबर, कुरुक्षेत्र ०८ डिसेंबर, आगरा ०९ व १० डिसेंबर, लखनऊ ११ व १२ डिसेंबर तर बाराबंकी १३ डिसेंबर या सर्व ठिकाणी पादुका दर्शनासाठी स्थानिक स्तरावर मोठ्या प्रमाणात भाविकांचे स्वागत, भजन, कीर्तन, धार्मिक मिरवणुका, सेवा उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन नियोजित आहे.
M
या पार्श्वभूमीवर श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी भाविकांना आवाहन केले आहे की, “ज्या शहरात पादुका दर्शन सोहळा आयोजित करण्यात येत आहे, तेथील सर्व साईभक्तांनी मोठ्या श्रद्धेने या दुर्लभ दर्शनाचा लाभ 
घ्यावा 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...