काव्यप्रेमीं’चे 16 व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी सा. प्रदीप दाते तर प्रमुख अतिथी सा. राजेंद्र फंड.
सोलापूर,
काव्यप्रेमीच्या
राज्यभरातील साहित्य प्रेमींचा मंच म्हणून ओळखल्या जाणार्या काव्यप्रेमी शिक्षक मंचच्यावतीने १६ व्या राज्यस्तरीय साहित्य संमेलनाचे आयोजन यंदा भंडारा येथे रविवार, २१डिसेंबर रोजी सकाळी ८ ते सायं.६ वाजेपर्यंत ए.के. सेलिब्रेशन हॉल येथे करण्यात आल्याची माहिती राज्याध्याक्ष आनंद घोडके यांनी दिली.
या राज्यस्तरीय संमेलनाच्या अध्यक्षस्थानी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते हे राहणार आहेत. तर उद्धाटन प्रकल्प अधिकारी तथा अभिनेते राजाभाऊ धर्माधिकारी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून लेखक राजेंद्र फंड यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनाचे स्वागताध्यक्ष कवी दीपक सपकाळ हे असणार आहेत. यावेळी राज्याध्यक्ष आनंद घोडके, सचिव कालिदास चवडेकर, कार्याध्यक्ष कृष्णा शिंदे, उपाध्यक्ष प्रमोद बाविस्कर, सहसचिव जया नेरे, वर्षा भांदर्गे,राष्ट्रपाल सावंत, भाऊसाहेब सोनवणे, शाम स्वामी, रामदास देशमुख, नवनाथ खरात उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचे संयोजन काव्यप्रेमी मंचच्या नागपूर विभाग अध्यक्षा कविता कठाणे, भंडारा शाखेच्या अध्यक्षा मंगला डहाके यांनी केले आहे.
या संमेलनात पुस्तक प्रकाशन, पुरस्कार वितरण, पारितोषिक वितरण, गझल तरंग मुशायरा, परिसंवाद, हास्यतुषार, काव्य मैफिल, काव्य संध्या आदि कार्यक्रम होणार आहेत. या संमेलनास सोलापूर, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली येथील काव्यप्रेमींच्या विविध शाखांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या संमेलनाचा काव्यप्रेमींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याध्यक्ष घोडके यांनी केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा