श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने सन २०२६ या वर्षासाठीच्या श्री साईबाबा दैनंदिनी व दिनदर्शिकेचे प्रकाशन संस्थानचे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर (भा.प्र.से.) यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थानचे उप मुख्यकार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
दरवर्षीप्रमाणे साईभक्तांच्या मागणीनुसार मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलुगू, तमिळ या भाषांमध्ये श्री साईबाबा दैनंदिनी आणि दिनदर्शिका प्रकाशित करण्यात आल्या आहेत. सन २०२६ साठीची ही आवृत्ती आकर्षक, दर्जेदार असून श्री साईबाबांच्या पवित्र दर्शनस्थळांचे छायाचित्रे व प्रेरणादायी विचारांचा समावेश यात करण्यात आला आहे.
ही साई दैनंदिनी व दिनदर्शिका संस्थानच्या प्रकाशन विभागामार्फत विक्रीसाठी उपलब्ध असून तसेच संस्थानच्या संकेतस्थळावरून (online.sai.org.in) ऑनलाईन खरेदी करता येईल. देशभरातील साईभक्तांसाठी पोस्टाद्वारे पाठविण्याची सोय देखील उपलब्ध आहे. यामध्ये, श्री साईबाबा दैनंदिनी (मोठी) रुपये ९०, श्री साईबाबा दैनंदिनी (लहान) रुपये १५/-, एक पानाचे कॅलेंडर (मोठे) रुपये २०/-, वॉल कॅलेंडर (६ पाने) रुपये २०/-, डेस्क कॅलेंडर (७ पाने) रुपये ४०/-,कार कॅलेंडर (७ पाने) रुपये ०५/-, छोटा डेस्क कॅलेंडर (१८५ पाने) रुपये ७५/-, डिलक्स वॉल कॅलेंडर (८ पाने) रुपये २१०/- आदी समावेश आहे.
तरी इच्छुक साईभक्तांनी या सुविधेचा लाभ घ्यावा व अधिक माहितीसाठी संस्थानचे संकेतस्थळ www.sai.org.in अथवा online.sai.org.in येथे भेट द्यावी असे अवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा