मंगळवार, २८ ऑक्टोबर, २०२५

ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे प्रकाशन करतांना अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष श्री. मेघराज राजेभोसले, प्रसिद्ध साहित्यिक श्री. सुदाम विश्वे, सहसंपादक श्री. राजेंद्र फंड, सौ. राजश्री फंड व प्रसिद्ध उद्योजिका श्रीमती पूजा जालंदर....


ग्रामसेवा संदेश साहित्यिकांना घडविणारी कार्यशाळा होय : श्री. मेघराज राजेभोसले 
      गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामसेवा संदेश हा दिवाळी अंक प्रकाशित करून साहित्यिकांना घडविणारी कार्यशाळा या अंकाचे संपादक  ग्रामसेवकांचे नेते श्री. एकनाथराव ढाकणे व सहसंपादक साहित्यिक श्री. राजेंद्र फंड हे घेत असल्याचे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष तथा प्रसिद्ध मराठी चित्रपट निर्माते मान. श्री. मेघराज राजेभोसले यांनी आज पुणे येथे  ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक प्रकाशनप्रसंगी काढले. 
        प्रारंभी या दिवाळी अंकाचे सहसंपादक श्री. राजेंद्र फंड यांनी गेल्या पंधरा वर्षांपासून ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक प्रकाशित करून आजपर्यंत 765 साहित्यिकांना लिखाणाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आमच्या दिवाळी अंकात प्रसिद्ध साहित्यिकांच्या साहित्याबरोबरच नवीन साहित्यिकांना ही लिहिते केले जाते याबाबत माहिती दिली.
               यावेळी या दिवाळी अंक प्रकाशन समारंभास प्रसिद्ध साहित्यिक श्री. सुदाम विश्वे,  प्रसिद्ध उद्योजिका श्रीमती पूजा जालंदर या अंकाचे सहसंपादक श्री. राजेंद्र फंड , सौ. राजश्री फंड  हे उपस्थित होते.
         

   आपले मनोगत व्यक्त करतांना ते आणखी म्हणतात की वर्षातून  एक दिवाळी अंक काढण्यासाठी जाहिराती मिळविणे व दर्जेदार साहित्य मिळविणे ही तारेवरची कसरत आहे. परंतु ग्रामसेवा संदेश हा दिवाळी अंक श्री. एकनाथराव ढाकणे व श्री. राजेंद्र फंड हे गेल्या 15 वर्षापासून सतत प्रकाशित करतात. तेही साहित्यिकांकडून कोणतीही फी न घेता .ही अभिनंदनीय गोष्ट आहे. दिवाळी अंक चाळला असता खूप चांगले साहित्य यामध्ये आहे. यापुढेही ही साहित्यसेवा अखंड चालू रहावी हीच सदिच्छा.
            प्रसिद्ध साहित्यिक श्री. सुदाम विश्वे म्हणाले की  अनेक वर्षापासून मी या दिवाळी अंकाचा नियमित साहित्यिक असून या दिवाळी अंकामुळे मला राज्यभर साहित्यिक म्हणून ओळखतात. त्यामुळे मी त्याचा कायम ऋणी आहे. 
                 शेवटी राजश्री फंड यांनी या दिवाळी अंक प्रकाशनास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे आभार मानले.

सोमवार, २७ ऑक्टोबर, २०२५

राहता पीपल्स सहकारी पतसंस्थेचेj व्हा चेअरमन डॉक्टर श्री संतोष मैड तसेच सौ ज्योती संतोष मैड यांच्या हस्ते पतसंस्थेत दीपावलीचे लक्ष्मीपूजन करण्यात आले


राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंस्था राहाता चे सालाबाद प्रमाणे दीपावलीचे लक्ष्मी पुजन या वेळेस संस्थेचे कृतीशील व्हा.चेअरमन व डॉ मेड मल्टी स्पेशियालिटी हॉस्पिटल राहाता चे सर्वेसर्वा सन्माननीय डॉ श्री संतोष मेड आणि त्यांच्या अर्धांगिनी सौ ज्योती संतोष मेड यांच्या शुभ हस्ते सपत्नीक करण्यात आले.पूजा विधी लावर गुरु यांनी पार पाडला.
या प्रसंगी संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी दुःखद कारणामुळे गैरहजर होते.सर्व संचालक मंडळास व्हा चेअरमन संतोष मेड यांच्या हस्ते वार्षिक मिटिंग भत्ता दीपावली निमित्त देण्यात आला.
संस्थेच्या महिला संचालक सौ बेबीताई सदाफळ यांच्या हस्ते सौ ज्योती मेड यांचा सत्कार करण्यात आला.संचालक मंडळाने डॉ संतोष मेड यांचा सत्कार केला.यानंतर आलेल्या सर्व मान्यवरांसाठी नाश्ता व चहा चे नियोजन संस्थेचे कर्तबगार मॅनेजर श्री पुरुषोत्तम गुंजाळ यांनी छान अशी केली.
     यावेळी डॉ संतोष मैड, सौ ज्योती संतोष मेड,पत्रकार राजूभाई पठाण ( संचालक ), सतीश खांबेकर, देविदास सोनटक्के,संजय देवकर, देवराम गाडेकर, संदीप तुपे, मनीषा गोर्डे, बेबीताई सदाफळ, उर्मिला निकाळे, सदाशिव बोठे,रावसाहेब भागवत, विलास साठे, महेंद्र गोर्डे,पुरुषोत्तम गुंजाळ, आश्रफ शेख, रवींद्र वैजापूरकर,साई गणेश गव्हाणे ,रमेशभाऊ निकाळे,आसिफभाई मन्सुरी ,योगेश मखाना,महेश कुलकर्णी,रोहिदास जेजुरकर,अविनाश शिंदे,सुनील नळे व लावर गुरु सह असंख्य मान्यवर उपस्थित होते.

गुरुवार, २३ ऑक्टोबर, २०२५

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे यांचा प्रामाणिकपणा

साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे यांचा प्रामाणिकपणा

शिर्डी 

शिर्डी श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी कर्मचारी सुनील गाढवे साई आश्रम भक्त निवास (१०००) रूम येथे ड्युटी करीत असताना झेरॉक्स दुकानासमोर अज्ञात साई भक्ताचे दोन हजार रुपये सापडले त्यांनी ते प्रामाणिक पणे साई आश्रम भक्तनिवास 1000 रूम सुपरवायझर व संचालक मिलिंद दुनबळे यांच्याकडे जमा केले त्यावेळी धनराज चितळकर सुपरवायझर विक्रम चौधरी उपस्थित होते या प्रामाणिकपणामुळे साई संस्थान एम्पलॉइज सोसायटी चे चेअरमन विठ्ठलराव पवार व व्हाईस चेअरमन पोपटराव कोते व संचालक मंडळ व सचिव विलासराव वाणी व सहसचिव बाबासाहेब अनार्थे व संभाजी कोते संस्थान कर्मचारी व सोसायटी कर्मचारी यांनी त्यांच्या प्रामाणिकपणे मुळे अभिनंदन केले.

राहता पीपल्स सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या सर्व ठेवीदारांना दीपावली निमित्त साखर वाटप करण्यात आली


राहाता पिपल्स नागरी सहकारी पतसंस्था राहाता एक नावाजलेली ए ग्रेड पतसंस्था असून नेहमीच सामाजिक व गरजेचे उपक्रम राबवत असते. आज संस्थेच्या सर्व ठेवीदारांना दीपावली निमित्त साखर वाटप करण्यात आली. या वेळी जेष्ठ संचालक देविदास  सोनटक्के यांनी आज ची साखर वाटप ही संस्थेचे चेअरमन भाऊसाहेब चौधरी यांनी आपल्या वयक्तिक खर्चातून केलेली असल्याचे व दोन दिवसापूर्वी चेअरमन यांची मातोश्री चे निधन झाल्यामुळे ते आज हजर नसल्याचे सांगितले. या वेळी संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ संतोष मैड बोलले कि ठेवीदारांना साखर वाटप करण्याचा कार्यक्रम पुरवणीयोजित मोठा करण्याचा मानस होता व माजी खासदार यांच्या हस्ते करण्याचे होते परंतु काही अपरिहार्य कारणा मुळे कार्यक्रम छोटा करण्यात आला. भाऊसाहेब चौधरी यांनी संस्थेची ठेवी दहा कोटी च्या पुढे पोहचविण्यात मोलाचा वाटा त्याबरोबरच त्यांनी संस्थे तर्फे व मैड हॉस्पिटल तर्फे दीपावली च्या सर्वाना शुभेच्छा दिल्या.घेऊन ठेवीदार, संचालक मंडळ. कर्जदार यांच्याशी चांगले ऋणानुबंध जोपसले असून त्यांची कार्यशैली वैशिष्ठ पूर्ण आहे.मुख्य अतिथी व राष्ट्रपती पुरस्कार विजेते सर्जेराव मते सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले कि संस्थेचे सर्व संचालक मंडळ, चेअरमन, व्हा चेअरमन ग्राउंडफ्लोर वर काम करतात व संस्थेला ठेवीदार तर भेटतात पण चांगले कर्जदार 
नियमित कर्ज भरणारे मिळणे खूप महत्वाचे असते. त्यामुळे संस्थेचे नाव लौकिक वाढून संस्था गतीने योग्य दिशेने मार्गस्थ असते.

त्यानंतर जेष्ठ संचालक सतीश खांबेकर यांनी आभार मानले व सर्व अतिथी व्हा चेअरमन, संचालक मंडळ यांच्या हस्ते सर्व ठेवीदारांना साखर वाटप करण्यात आली व चेअरमन Army मातोश्री साठी श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी डॉ संतोष मैड, मधुकर चौधरी (स्वीय सहाय्यक )शंकर रोकडे (स्वीय सहाय्यक )सर्जेराव मते सर, डॉ महेश गव्हाण, पत्रकार राजूभाई पठाण (

 संचालक ), सतीश खांबेकtर, देविदास सोनटक्के,संजय देवकर, देवराम गाडेकर, संदीप तुपे, मनीषा गोर्डे, बेबीताई सदाफळ, उर्मिला निकाळे, सदाशिव बोठे,रावसाहेब भागवत, विलास साठे, पुरुषोत्तम गुंजाळ, आश्रफ शेख, रवींद्र वैजापूरकर,साई गणेश गव्हाणे व ठेवीदार असंख्य मान्यवर उपस्थित होते.

मंगळवार, २१ ऑक्टोबर, २०२५

यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकटाचे सावट असले तरी शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे राहिलें -मंत्री राधाकृष्ण विखे पाटील


लोणी 

 यंदाच्या दिपावली सणावर नैसर्गिक संकटाच सावट असले तरी,या  मंगलमय पर्वात  नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीशी राज्य सरकार खंबीरपणे उभे राहीले आहे. महायुती सरकार प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यातील शेतकर्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केल्याचे समाधान व्यक्त करून  जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी सर्वाना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

लोकनेते पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यालयात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ.शालीनी विखे पाटील यांच्या शुभहस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले.माजी मंत्री आण्णासाहेब म्हस्के पाटील, आण्णासाहेब भोसले, डॉ.भास्करराव खर्डे, कैलास तांबे, शिवाजीराव जोंधळे, पोपटराव वाणी, किशोर नावंदर, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.सुस्मिता विखे पाटील यांच्यासह सर्व संचालक प्राचार्य उपस्थित होते.

पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यांच्या मुख्य कार्यालयात चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील आणि सौ.धनश्री विखे पाटील यांच्या हस्ते लक्ष्मीपूजन करण्यात आले. ना.राधाकृष्ण विखे पाटील, सौ.शालीनीताई विखे पाटील, कारखान्याचे व्हा.चेअरमन सोपानराव शिरसाठ, कार्यकारी संचालक महेश कोनापुरे यांच्यासह संचालक, अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांच्या कुटूबियांनी दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.

मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की, यंदाच्या वर्षी नैसर्गिक संकटाचे सावट असले तरी, शेतकऱ्यांच्या पाठीशी केंद्र आणि राज्य सरकार खंबीरपणे उभे राहीले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने राज्याला नैसर्गिक संकटात मदत करण्याचा निर्णय घेतला त्याचे आपण स्वागत करतो. केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी लोणी येथील भेटी प्रसंगी राज्याला मदत करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता केली असल्याचे  मंत्री विखे पाटील म्हणाले. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने नैसर्गिक संकटात शेतकर्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची भूमिका घेवून ३ हजार २०० कोटी रुपयांच्या पॅकेजची केवळ घोषणा केली नाही तर, त्याची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. राज्य सरकारने  अन्य पायाभूत सुविधा करीताही ३२ हजार कोटी रुपयांची मदत देण्याचे नियोजनही केले असल्याचे त्यांनी सांगितले.

 अहील्यानगर जिल्ह्यातील  शेतकऱ्यांना महायुती सरकारच्या 
निर्णयाचा लाभ झाला असून, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याचे आदेश प्रशासनास दिले आहेत. प्रशासनाने अधिका-यांनी सतर्कपणे केलेल्या कार्यवाही बद्दल मंत्री विखे पाटील यांनी समाधान व्यक्त करून प्रशासनाच्या सहकार्याने दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीचे पैसे वर्ग होवू शकले.

ऐन दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर नैसर्गिक संकटाला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. परंतू या परीस्थितीवर मात करून आमचा शेतकरी बांधव पुन्हा नव्या उमेदीने उभा राहील आशी अपेक्षा व्यक्त करून, दिपावलीचे मंगल पर्व नवा आशेचा किरण घेवून येणारे असते. संकटावर मात करून नव्या उमेदीने पुढे जाण्यासाठी हा दिपोत्सव निश्चित सर्वांना बळ देईल.


विश्वनेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिवाळीपूर्वी वस्तु सेवाकर कमी करण्याचा ऐतिहासिक निर्णय करून देशातील जनतेला दिलासा दिला. या निर्णयाचा सकारात्मक परीणाम दिवाळी सणात अर्थव्यवस्थेवर झाला. सण उत्सवाच्या निमित्ताने स्थानिक विक्रेत्यांकडून वस्तु खरेदी करण्याच्या त्यांच्या आवाहनाला समाज घटकांनी दिलेला प्रतिसादही बाजारपेठांमध्ये पाहायला मिळाला असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.

रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

प्रकाश चित्ते यांचा शिंदे गटात प्रवेश

प्रकाश चित्ते यांचा शिंदे गटात प्रवेश

 श्रीरामपूरच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप घडण्याचे चिन्ह स्पष्ट दिसत आहे भाजपचे वरिष्ठ आणि प्रभावशाली नेते प्रकाश चित्ते यांनी पक्षाला राम राम ठोकत आज शिवसेना ( एकनाथ शिंदे गट) मध्ये अधिकृत प्रवेश केला आहे मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना नेते,एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा भव्य प्रवेश सोहळा आज दुपारी होणार असल्याची पुष्टी सूत्रांकडून मिळाली आहे श्रीरामपूर तालुक्यात प्रकाश चित्ते यांचा मोठा जनाधार असून त्यांच्या या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात नव्या समीकरणाची निर्मिती होण्याची दाट शक्यता आहे यावेळी तालुका संपर्कप्रमुख जनार्दन लाल पगार सुनील मुथा संजय पांडे राजेंद्र कांबळे माजी नगरसेवक किरण लोनिया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे चित्ते यांच्या प्रवेशामुळे शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे यापूर्वी माजी आमदार भानुदास मुरकुटे, भाऊसाहेब कांबळे आणि सागर बेग, यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता आता प्रकाश चित्ते यांच्या प्रवेशामुळे शिवसेना  ची (शिंदे,गटा, )ची ताकद आणखी मजबूत होणार आहे विशेष म्हणजे या नव्या प्रवेशामुळे आगामी विधानपरिषद निवडणुकीत चार उमेदवारांमधील मत विभागणी वाढण्याची शक्यता असून त्यामुळे काँग्रेसला थेट फायदा होणार नाही  असे राजकीय अभ्यासक बोलत आहे श्रीरामपूर आणि परिसरात गेल्या काही महिन्यापासून शिंदे गटात सातत्याने होत असलेल्या पक्षप्रवेशामुळे या गटाचा जनाधार झपाट्याने वाढताना दिसत आहे भानुदास मुरकुटे, सागर बेग, भाऊसाहेब कांबळे, आणि आत्ता प्रकाश चित्ते यांच्या रूपाने शिंदे गटाने श्रीरामपूरच्या राजकारणात आपले अस्तित्व ठळकपणे अधोरेखित केले आहे आत्तापर्यंत विधानसभा निवडणुकीत दोन नंबरवर,असलेला शिवसेना,शिंदेगट पक्ष आता पहिल्या क्रमांकावर झेपावल्याचे स्पष्ट दिसत आहे श्रीरामपूर आगामी निवडणुकीत अत्यंत रंगतदार होण्याची स्पष्ट चिन्ह दिसत आहे

 राहता,शिर्डी न्यूज 
 साबळे न्यानेश्वर

शिर्डी शहर ओबीसी समाजाने घेतला विकासाचा आणि सन्मानाचा संकल्प

शिर्डी शहर ओबीसी समाजाने घेतला विकासाचा आणि सन्मानाचा संकल्प


शिर्डी:  
शिर्डी शहरातील सर्व ओ.बी. सी. समाजाची शहराच्या इतिहासात पहिल्यांदाच व्यापक बैठक यशस्वीपणे संपन्न झाली..

या ऐतिहासिक बैठकीत शिर्डीच्या ओबीसी समाजाने आपल्या अधिकारांसाठी आणि शहराच्या विकासासाठी ठोस संकल्प व्यक्त केला आहे. सभेत ओबीसी समाजाने आपली एकता आणि सामर्थ्य सिद्ध केले.

सभेत शिर्डीच्या ओबीसी समाजाने शहराच्या विकासात आणि केलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव केला गेला. विशेषतः बाबूजी पुरोहित, सोपान काका वाघचौरे, हिरामण नाना वारुळे, बाळू भाऊ परदेशी यांसारख्या निष्ठावंत व्यक्तींनी शहर आणि समाजासाठी दिलेले योगदान अधोरेखित केले.

सभेत असे स्पष्ट केले गेले की शिर्डीची मतदारसंख्या ३३,००० आहे, त्यातील १६,००० ओबीसी समाजाचे आहेत, आणि या समाजाला निर्णय प्रक्रियेत योग्य स्थान मिळणे अत्यावश्यक आहे. यासाठी समाजाने आपली ताकद आणि एकता ओळखणे गरजेचे आहे.
भविष्याचे नेतृत्व तयार करण्यावर भर दिला गेला, तरुण आणि महिला सहभाग वाढवणे, स्थानिक समस्या सोडवणे, ओबीसी समाजाचा संघटना मजबूत करणे, चिन्ह बनविणे, सर्व समाजाची लोकसंख्या गणना करणे, येत्या शिर्डी नगरपरिषद निवडणुकीत ओबीसी आरक्षित व खुल्या गटातील जागांवर मूळ ओबीसी उमेदवारालाच मतदान करणे, ओबीसी भवन व समाज मंदिर उभारणे, रोजगार निर्मिती करणे, मेळावा आयोजित करणे आणि शहराला नवीन नेतृत्वाचा पर्याय देणे हे प्रस्ताव बहुमताने मंजूर करून यावर विशेष लक्ष केंद्रीत केले गेले. यासाठी कोअर कमिटी तयार करण्याचा निर्णय घेतला गेला, जी समाजाच्या प्रत्येक बैठकीचे आयोजन करेल, अडचणी दूर करेल, आणि जयंती/उत्सव सर्वांनी एकत्रित साजरे करेल.
सभेत उपस्थितांना तीन शपथ घेण्याचे आवाहन केले गेले:
1. घराघरात संपर्क साधणे,
2. मतदानाचा योग्य वापर करून समाजाचा विकास घडवणे,
3. मतदान विक्री नाही तर भागीदारी या तत्त्वावर शिर्डीच्या प्रत्येक निर्णयात सहभाग घेणे.

सभेचा समारोप करताना उपस्थितांना असे आवाहन केले गेले की जर कोणी म्हणालं की तुम्ही अल्पसंख्याक आहात, तर सांगा – “आम्ही १६,००० आहोत. आम्ही अल्प नाही, आम्ही निर्णायक आहोत.”
असे जेष्ठ मार्गदर्शक हिरामण वारुळे यांनी सांगितले ते सभेचे अध्यक्ष स्थानी होते, सूत्रसंचालन, विषय वाचन व प्रास्ताविक ॲड.विक्रांत वाघचौरे यांनी केले तर आभार सुरेश मुळे यांनी मानले,

यामध्ये प्रत्येक समाजातील नेतुत्वाला आपले मनोगत व्यक्त करण्याची संधी मिळाली. या व्यापक बैठकीत अनेक विचार पुढे आले प्रत्येक समाजातील लोकांनी आपल्या समाजातील समस्या मांडल्या.

यावेळी ओबीसी समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक देवराम सजन, किशोर बोरावके, सुनील सोनवणे, दिपक वारुळे, बाळासाहेब लुटे,यशवंत वाघचौरे,पंढरीनाथ शेकडे, प्रभाकर गिते, आदी व्यास पीठावर विराजमान होते.

तर सुधीर शिंदे, भारत शिंदे, प्रमोद नागरे, संदीप रोकडे, कुणाल वारुळे, मंगेश खांबकर, अशोक पवार, गणेश वाघचौरे, सोमराज कावळे, बद्रीनाथ लोखंडे,अजय नागरे,उत्तम सजन, गणेश खैरे, संतोष जाधव, योगेश शिंदे, गणेश सोनवणे, नानासाहेब काटकर, संपत जाधव, रोहित सोळंकी,संजय परदेशी, शेखर सालकर, प्रशांत भालेराव, प्रशांत वाकचौरे, सहदेव बढे, सुनील मांजरेकर, धनंजय साळी, 
बद्रीनाथ वाकचौरे, संदीप बोबडे, रवी कोलकर, अजय वारुळे आदी  सर्व ओबीसी समाजाचे समाज बांधवांनी मनोगत व्यक्त केले,
यावेळी सर्व ओबीसी समाजातील समाजबांधव या ऐतिहासिक बैठकीस मोठया संख्येने उपस्थित होते.

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०२५

Roots of Wings” – A success story celebrating the journey of self-awareness!

“Roots of Wings” – A success story celebrating the journey of self-awareness!



Dr. Pankaj Yelam’s book receives overwhelming response – 10,000 copies purchased by a renowned foundation in Mumbai
Dr. Pankaj Yelam, a well-known counsellor and motivational speaker working through Manomay Healing Heart Foundation, Rahata, has published his inspiring book “Roots of Wings” based on self-development and positive transformation. The book has made a place in the hearts of readers in a short time.
Most notably, within just fifteen days, ten thousand copies of this book have been sold, out of which a renowned foundation in Mumbai has supported this initiative by purchasing as many as 10,000 copies. This is not just a sales figure, but a heartwarming message that shows the increased awareness about self-awareness and mental health in the society.
“Roots of Wings” encourages every reader to connect with their roots and take themselves to greater heights.  Dr. Yelam's thoughts on finding a way out of life's stress, confusion and self-doubt are simple, yet effective. His writings beautifully blend psychology, spirituality and real-life experiences.
The success of this book is not just the author's achievement, but the fruit of the continuous work of 'Manomay Healing Heart Foundation' - which works for mental health and emotional well-being. It is hoped that this effort to spread the message of positivity in the society will give many a new direction.


 “Roots of Wings” — A journey that touches everyone's innermost being
“Hold the roots tight, and let the wings fly — only then will life reach beautiful heights.”

— Dr. Pankaj Yelam

रूट्स ऑफ विंग्स– आत्मजागृतीचा प्रवास साजरा करणारी यशकथा

रूट्स ऑफ विंग्स– आत्मजागृतीचा प्रवास साजरा करणारी यशकथा





डॉ. पंकज येलम यांच्या पुस्तकाला अफाट प्रतिसाद – मुंबईतील नामांकित फाऊंडेशनने विकत घेतल्या १०,००० प्रती
मनोमय हिलींग हार्ट फाऊंडेशन, राहता यांच्या माध्यमातून कार्यरत असलेले सुप्रसिद्ध समुपदेशक आणि मोटिव्हेशनल स्पीकर डॉ. पंकज येलम यांनी आत्मविकास आणि सकारात्मक परिवर्तन यांवर आधारित आपले प्रेरणादायी पुस्तक “रूट्स ऑफ विंग्स” प्रकाशित केले आहे.



 या पुस्तकाने अल्पावधीतच वाचकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे.
सर्वात उल्लेखनीय म्हणजे, फक्त पंधरा दिवसांच्या आत या पुस्तकाच्या दहा हजार प्रतींची विक्री झाली असून, त्यापैकी मुंबईतील एका नामांकित फाऊंडेशनने तब्बल १०,००० प्रती खरेदी करून या उपक्रमाला पाठिंबा दिला आहे. हे केवळ विक्रीचे आकडे नसून, समाजात आत्मजागृती आणि मानसिक आरोग्याबाबत वाढलेली जागरूकता दर्शवणारा एक आनंददायी संदेश आहे.

“रूट्स ऑफ विंग्स” हे पुस्तक प्रत्येक वाचकाला आपल्या मुळांशी जोडून स्वतःला उंच भरारी घेण्यासाठी प्रोत्साहन देते. जीवनातील ताण, गोंधळ आणि आत्मसंशय यांमधून मार्ग काढण्यासाठी डॉ. येलम यांचे विचार साधे, परंतु प्रभावी आहेत. त्यांच्या लेखनात मनोविज्ञान, अध्यात्म आणि वास्तव जीवनातील अनुभव यांचा सुंदर संगम आढळतो.
या पुस्तकाचे यश म्हणजे फक्त लेखकाची उपलब्धी नाही, तर ‘मनोमय हिलींग हार्ट फाऊंडेशन’ च्या सततच्या कार्याचे फळ आहे – जे मानसिक आरोग्य आणि भावनिक कल्याणासाठी कार्यरत आहे. समाजात सकारात्मकतेचा संदेश पसरवण्याच्या या प्रयत्नामुळे अनेकांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.



“रूट्स ऑफ विंग्स” — प्रत्येकाच्या अंतर्मनाला स्पर्श करणारा प्रवास
“मूळांना घट्ट पकडा, आणि पंखांना भरारी द्या — तेव्हाच जीवन सुंदर उंचीवर पोहोचेल.”

— डॉ. पंकज येलम

राहाता सह्याद्रीतर्फे वीटभट्टी मजूर, पुरबाधित क्षेत्रातील आदिवासी व बांधकाम मजुरांना मिठाई वाटप:

 राहाता सह्याद्रीतर्फे वीटभट्टी मजूर, पुरबाधित क्षेत्रातील आदिवासी व बांधकाम मजुरांना मिठाई वाटप

                 


   वंचितांची ही दिवाळी गोड होण्यासाठी  दिवाळीचा पहिला दिवस धनत्रयोदशीच्या दिवशी सकाळी आठ वाजताच  कामगार कामावर जाण्याच्या आधी लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे वतीने पिंपळवाडी येथील वीटभट्टी कामगार, पिंपळवाडी येथील पुरबाधित क्षेत्रातील आदिवासी व बांधकाम कामगार असे 100 कामगारांना दिवाळी  मिठाईचे वाटप त्यांच्या घरी जाऊन कुठल्याही प्रकारचा गाजावाजा न करता आज करण्यात आले . 
                        यानिमित्ताने अचानक येऊन  आपल्या कुटुंबाची दिवाळी गोड केल्याचे  पाहून सर्व कामगारांना आनंद झाला. लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे वतीने आजच्या या उपक्रमाचे प्रायोजक  क्लबचे सदस्य तथा  संचिती एज्युकेशन फाउंडेशन आणि व्हीजन हाउसकीपिंग सोल्युशनचे संचालक ला. अमोल उगले हे होते. प्रारंभी क्लबचे प्रेसिडेंट ला. विनोद गाडेकर यांनी या कामगारांशी संवाद साधून यावर्षीच्या ओल्या दुष्काळाने झालेली हानी पाहता शेतकरी व मजूर यांचे प्रचंड प्रमाणात हाल झाले आहेत. म्हणून लायन्स क्लब ऑफ राहाता सह्याद्रीचे वतीने तुमच्या कुटुंबाची दिवाळी गोड करण्यासाठी आम्ही आलो आहोत. 
          प्रायोजक  ला. अमोल उगले म्हणाले मी एक व्यापारी असून या ओल्या दुष्काळात व्यापारी, शेतकरी व मजुरांचे झालेले हाल मी प्रत्यक्ष पाहिल्याने माझ्या उत्पन्नातील काही भाग या दिवाळीच्या निमित्ताने मी हातावर पोट असणाऱ्या  वीटभट्टी कामगार, आदिवासी व बांधकाम कामगारांची दिवाळी गोड होण्यासाठी एक छोटासा प्रयत्न केला आहे. 
             आजच्या या दिवाळी उपक्रमाचे नियोजन क्लबचे व्हाइस प्रेसिडेंट ला. सुनील धाडगे, ट्रेझरर ला. राजेंद्र फंड, सेक्रेटरी ला. सागर रोकडे, ला. विक्रम देसाई, यांनी केले.

राहाता येथील पूरग्रस्तांना लायन्स क्लबचा मदतीचा हात — सामाजिक बांधिलकीची सुंदर प्रचीती

राहाता येथील पूरग्रस्तांना लायन्स क्लबचा मदतीचा हात — सामाजिक बांधिलकीची सुंदर प्रचीती 



राहाता परिसरातील पूरग्रस्त नागरिकांच्या मदतीसाठी लायन्स क्लब पुणे सुप्रीम व लायन्स क्लब राहाता यांनी एकत्र येत खऱ्या अर्थाने “We Serve” या लायन्सच्या ध्येयवाक्याला न्याय दिला. सप्टेंबर महिन्यात आलेल्या पुरामुळे हवालदिल झालेल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी दोन्ही क्लबच्या माध्यमातून एक सामाजिक जबाबदारीची भावना जोपासत मदतीचा हात पुढे करण्यात आला.

या उपक्रमात डिस्ट्रिक्ट गव्हर्नर लायन राजेश अग्रवाल, लायन रवींद्र गोलार, लायन्स क्लब पुणे सुप्रीमच्या अध्यक्षा लायन सौ. संजना झवर तसेच झोन चेअरमन लायन डॉ. संजय उबाळे यांच्या पुढाकाराने सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांच्या किमतीचे किराणा किट, दिवाळी फराळ, ब्लँकेट व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले. या किटमुळे पूरग्रस्तांना एक महिन्यापुरता दिलासा मिळाला.

या वेळी राहाता नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ यांनी लायन्स क्लब करीत असलेल्या कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले व आगामी सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. सामाजिक कार्यकर्ते लायन दशरथ तुपे यांनी सांगितले की, “लायन्स क्लब राहाता पूर्वी कोल्हापूर व सोलापूर येथील पूरग्रस्तांना देखील मोठ्या प्रमाणावर मदत करून सामाजिक बांधिलकी जपली आहे. हा परंपरेचा वारसा आजही टिकवून ठेवला आहे.”

झोन चेअरमन लायन डॉ. संजय उबाळे, लायन प्रकाश सदाफळ मा. अध्यक्ष लायन दशरथ तुपे आणि कैलास बापू सदाफळ यांच्या उपस्थितीत कॅनाल जवळील वस्ती  तसेच बनकर वस्तीतील एकूण सुमारे २० पुरबाधित कुटुंबांना मदत वितरित करण्यात आली. या सर्व मान्यवरांनी पूरग्रस्तांना दिवाळीच्या शुभेच्छा देत आश्वासन दिले की, “लायन्स क्लब सदैव समाजाच्या सेवेसाठी तत्पर राहील.”
डॉ संजय उबाळे यांनी लायन्स क्लब पुणे सुप्रीम यांनी आमच्या क्लब सोबत पूरग्रस्त यांना भरीव मदत केली  अतिशय छान उपक्रम करणेसाठी एकत्र आले ही आमच्या क्लब साठी अभिमानाची बाब आहे, अशीच मदत गरजू पर्यंत करत राहू अशी भावना व्यक्त केली 

या प्रसंगी माजी अध्यक्ष प्रकाश सदाफळ, अॅक्टिव्हिटी चेअरमन लायन अंजली उबाळे, लायन रतन चौधर सेक्रेटरी ,लायन मिलिंद बनकर, राहुल बनकर,लायन ॲड दिनेश कारले ट्रेजरर,लायन सरला तायडे, लायन किरण वाबळे, ला. स्मिता मुरादे, ला. डॉ मनाली उबाळे, ला. सोहन उबाळे, ला. लता जाधव, ला. आसावरी बेंद्रे, ला. खिजर शाहा आदी उपस्थित होते.


ही कृती फक्त मदतीची नव्हे, तर सामाजिक संवेदनशीलतेची, एकतेची आणि माणुसकीची जाणीव जपणारी प्रेरणादायी उदाहरण ठरली आहे.

पार्वताबाई माधवराव चौधरी यांचे निधन

राहाता पीपल्स नागरी सहकारी पतसंथा राहाता चे चेअरमन श्री भाऊसाहेब माधवराव चौधरी यांच्या मातोश्री पार्वता बाई माधवराव चौधरी राहणार नांदूरखी बुद्रुक यांचे वयाच्या 88 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. प्राचार्य अर्जुन निवृत्ती चौधरी,मा. उपसरपंच नांदूरखी बुद्रुक प्रल्हाद सुदाम चौधरी, जितेंद्र अशोक चौधरी, नवनाथ भीमराज चौधरी यांच्या त्या चुलती होत्या. न्युरो सर्जन डॉ मुकुंद चौधरी हे त्यांचे नातू आहेत.त्यांच्या पश्च्यात दोन मुले, सुना, नातंवंडे, दीर, पुतणे असा मोठा परिवार आहे. नांदूरखी अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आला. भाऊसाहेब चौधरी यांचे नातेवाईक, मित्रपरिवार, सामाजिक, राजकीय, व्यापारी, डॉक्टर्स व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५

चैन्नई येथील साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी १५ किलो वजनाची १८५ ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री अर्पण

शिर्डी
 चैन्नई येथील साईभक्त जितेंद्र उमेडी यांनी श्री साईबाबांच्या चरणी १५ किलो वजनाची १८५ ग्रॅम शुद्ध सोन्याचा मुलामा दिलेली तांब्याची छत्री अर्पण केली.
ही छत्री श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री भिमराज दराडे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली असून, आज ती श्री साईबाबांच्या समाधी मंदिरातील मूर्तीवर प्रतिष्ठापित करण्यात आली. श्री साईबाबांच्या भक्तीभावाचे प्रतीक असलेली ही छत्री आता मंदिराच्या सौंदर्यात भर घालत आहे.



याच साईभक्ताने चेकद्वारे श्री साईबाबा संस्थानला २३ लाख रुपयांची देणगी दिली असल्‍याची माहिती श्री दराडे यांनी दिली.
या निमित्त श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री दराडे यांनी साईभक्त जितेंद्र उमेडी यांचा सत्कार करून त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
श्री दराडे म्हणाले, “साईभक्त जितेंद्र उमेडी यांचे हे दान आणि श्रद्धा भाविकांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या या योगदानातून संस्थानच्या धार्मिक व समाजोपयोगी कार्यांना अधिक बळ मिळेल.”

विठ्ठलाच्या भक्तीत सुद्धा महादेवच पाहायला मिळत असल्याचा संदेश पंडित प्रदीप मिश्रा यांनी चौथ्या दिवशी शिवपुराण कथेत दिला


राहाता 

       “विठ्ठल विठ्ठल चले, आयेंगे त्रिपुरारी” या भजनाच्‍या ठेक्‍यावर लाखो शिवभक्‍तांनी ठेका धरून शिवपुराण कथेमध्‍ये पंढरीच्‍या पांडुरंगाचा धावा केला. विश्‍वातील सर्वात विशाल मंदिर हे पंढरपुरच्‍या पांडुरंगाचे आहे. जिथे कोणीही माथा टेकवू शकतो, चरण स्‍पर्श करु शकतो त्‍या पांडुरंगाच्‍या मस्‍तकावरच शिवलिंग विराजमान आहे. विठ्ठलाच्‍या भक्‍तीत सुध्‍दा महादेवच पाहायला मिळत असल्‍याचा संदेश पंडित प्रदिप मिश्रा यांनी दिला.


       शिवपुराण कथेच्‍या चौथ्‍या दिवशी अस्‍तगाव येथील शिवनगरीत गर्दीने उच्‍चांक मोडला, जिल्‍ह्या बरोबरच राज्यातील विविध भागांमधून मोठ्या संख्‍येने भक्‍त शिवनगरीत दाखल झाले असून, भाविकांचा हा भवसागर विठ्ठल भक्‍तीचा मळा फुलवूत आज शिवआराधणेत तल्‍लीन होवून गेला. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, आ.आशुतोष काळे, आ.किरण लहामटे, माजी मंत्री आण्‍णसाहेब म्‍हस्‍के पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, शिवपुराण कथेचे संयोजक डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍यासह जिल्‍ह्यासह राज्‍यातील अनेक मान्‍यवर याप्रसंगी उपस्थित होते.

       पंडित मिश्रा महाराज यांनी पांडुरंगाचा उल्‍लेख करुन, आषाडी वारीला लाखो भाविक वारीच्‍या माध्‍यमातून पंढरपुरला जातात. भगवान शंकरांनी सुध्‍दा पार्वतीला घेवून, पंढरीची वारी केली, कैलास पर्वतावरुन काशी आणि पंढरी अशी त्‍यांनी केलेली वारी पंढरीत आली. भाविकांच्‍या  गर्दीत पांडुरंगानेच भगवान शंकरांना आपल्‍या डोक्‍यावर बसवून नले असा पौराणीक दाखल देवून आजही विठ्ठलाच्‍या मस्‍तकावर शिवलिंग विराजमान असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

       शंकराची आराधणा करायची असेल तर, अविरत साधणा करावी लागेल. स्‍वच्‍छ शरीराप्रमाणे मनाची शुध्‍दताही ठेवावी लागेल. आत्‍म्‍याची पवित्रता राखली गेली तर, मनाची पवित्रता वाढेल असे स्‍पष्‍ट करुन, पंडित मिश्रा म्‍हणाले की, मनाच्‍या पवित्रतेमुळेच भगवान शंकराची शरणागती होवू शकेल. शिवपुराण कथा ऐकून मन स्‍वच्‍छ होईल.

       पर्वत आणि नदीचे उदहरण देवून पर्वताला सोडून नदी वाहून जाते. याचे कारण पर्वत कठोर आहे. जीवनामध्‍ये पर्वता इतके कठोर वागू नका, नाहीतर लोक तुम्‍हाला सोडून जातील. शिवपुराण कथा लोकांशी चांगले नाते निर्माण करायला शिकवते. आयुष्‍यात तोंडी आणि लेखी अशा दोन परिक्षा माणासांना द्याव्‍या लागतात. लेखी परिक्षेत गुण कमी जास्‍त होवू शकतात. मात्र तोंडी परिक्षेत तुम्‍ही जे बोलता त्‍यावरच गुण ठरत आसतात. महादेवांना प्राप्‍त करायचे असेल तर, मौखीक परिक्षेस उतरावे लागेल. शिवाचा जप सातत्‍याने करावा लागेल.


       शिर्डीमध्‍ये यापुर्वीही अनेक मोठ्या कथा झाल्‍या. अनेक चांगले वक्‍ते  आणि श्रोते आले असतील, त्‍यांना माझे नमन आहे असे सांगून मिश्रा महाराज म्‍हणाले की, कोणत्‍याही कथेला वेळ घालविण्‍यासाठी जावू नका, शिवपुराण कथा सुध्‍दा मनाने एैका, भगवान शंकराशी मनाचा संवाद साधणारी ही एक सेवा आहे. आयुष्‍यात सर्वात विचित्र दान हे कन्‍यादान आहे. वडील आपले सर्व सुख मुलीच्‍या रुपाने दान करतात त्‍याची किंमत समोरच्‍याला किती समजतात हे माहीत नाही. पण वडीलांचे दुख हे फक्‍त  मुलीच समजू शकतात हे उदाहरण देवून पंडित मिश्रा म्‍हणाले की, संसारात सर्वांना बरोबर घेवून चला. कार्तिक महीन्‍यातील हे शिवपुराण खुप पवित्र असे ठरले असल्‍याचा उल्‍लेख त्‍यांनी आवर्जुन केला.

 


कोट –

       सलग चार दिवस शिवपुराण कथेला भाविक मोठ्या संख्‍येने येत आहेत. सुयोग्‍य नियोजनामुळे भाविकांची कुठेही अडचण होवू नये अशी व्‍यवस्था जनसेवा फौंडेशनच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आली आहे. चौथ्‍या   दिवशी गर्दीचा उच्‍चांक मोडल्‍यामुळे आहे तिथेच बसण्‍याचे आवाहन संयोजकांच्‍या वतीने करण्‍यात येत होते. मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील, डॉ.सुजय विखे पाटील यांच्‍यासह सर्व स्‍वयंसेवक भाविकांना बसविण्‍यासाठी नियोजनामध्‍ये सक्रीयपणे पाहायला मिळाले.

पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन!

पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या हस्ते मशिनरीचे पूजन!

 लोणी 
पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना, प्रवरानगर

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्यात पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या हस्ते नव्याने बसविण्यात आलेल्या अत्याधुनिक मशिनरीचे विधिवत पूजन करण्यात आले. याप्रसंगी कारखान्याच्या संचालक मंडळाच्या वतीने पंडित प्रदीपकुमार मिश्रा महाराजांचा सन्मान करण्यात आला.

यादरम्यान कारखान्याचे चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील यांनी पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्या सहकार चळवळीतील योगदानाबद्दल आणि गेल्या अनेक वर्षांतील कारखान्याच्या यशस्वी प्रवासासोबतच नव्याने करण्यात आलेल्या विस्तारीकरणाची माहिती दिली.

यानंतर पंडित प्रदीप मिश्रा महाराज यांनी अधिकारी, कर्मचारी आणि कामगारांशी दिलखुलास संवाद साधत सहकार क्षेत्रातील जनसेवा आणि समर्पणाचे महत्व अधोरेखित केले

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०२५

अध्यात्मिक यज्ञाचा संदर्भ आणि विखें पाटीलंच कौतूक..

अध्यात्मिक यज्ञाचा संदर्भ आणि विखें पाटीलंच कौतूक..


अस्तगाव 
शिर्डीजवळील अस्तगाव शिवारात उभारलेल्या शिवनगरीत  सुरु असलेल्या शिवमहापुराण कथेने सध्या अहिल्यानगर जिल्ह्यांसह विविध ठिकाणांहून येत असलेल्या भक्तांना वेड लावले आहे. पाच दिवस चालणाऱ्या या कथेचे प्रवचन प्रसिद्ध कथाकार सिहोरवाले बाबा अर्थात पंडीत प्रदीप मिश्रा देत आहेत. लाखोंच्या भाविकांच्या उपस्थितीमुळे दररोज गर्दीचा उच्चांक मोडला जात आहे.

या विक्रमी गर्दीच्या नियोजनात विखे परिवाराने दाखवलेले व्यवस्थापन आणि नेतृत्व सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. स्वयंसेवकांचे व्यवस्थापन, भोजन, पार्किंग, बैठक व्यवस्था, पंडाल, माईक सिस्टीम, लाईटिंग या सर्व बाबतीत दाखवलेले उत्कृष्ट नियोजन पाहून स्वतः पंडीत प्रदीप मिश्रा महाराजही भावूक झाले. त्यांनी आपल्या निरूपणादरम्यान दररोज विखे परिवाराच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले आहे.
 

दुसऱ्या दिवशीच्या प्रवचनात पंडीत प्रदीप मिश्रा महाराज म्हणाले, “विखे पाटील परिवाराने कार्तिक महिन्यात शिवमहापुराण कथा आयोजित करून भाविकांना लाखो अध्यात्मिक यज्ञाचे पुण्य मिळवून दिले.” महाराजांच्या या विधानाने संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय निर्माण झाला. हा अध्यात्मिक यज्ञ  प्राचीन भारतातील एक धार्मिक आणि राजकीय यज्ञ मानला जातो. त्या यज्ञाद्वारे राजा आपल्या साम्राज्याचे सार्वभौमत्व सिद्ध करीत असे. महाराजांच्या या संदर्भाने कथेचं आध्यात्मिक अधिष्ठान अधिक भव्य स्वरूपात उभं राहिलं असून भाविकांमध्ये या विधानाची मोठी चर्चा रंगली आहे.

पंडीत प्रदीप मिश्रा यांनी पुढे सांगितले, “विखे पाटील परिवाराच्या चार पिढ्यांना जनतेचा आशीर्वाद लाभला आहे. आज सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली ही कथा यशस्वीरीत्या पार पडत असून, त्यांच्या नियोजनामुळे लाखो भाविकांना दिव्य अनुभव मिळत आहे. महाराजांनी पुढे म्हटले की, धर्म, समाज, राजकारण आणि आयोजन या सर्व क्षेत्रात सुजय विखे पाटील यांनी समतोल साधला आहे. त्यांनी भक्तीभावातून आयोजन करत सर्व भाविकांचं आशीर्वादरूपी प्रेम मिळवलं आहे.

शिर्डी परिसरात लाखोंच्या गर्दीचं नियोजन सुलभतेने करून दाखवल्यामुळे सुजय विखे यांच्या नेतृत्वगुणांची नवी झलक दिसून आली आहे. कथेच्या आयोजनातून विखे परिवाराने समाजातील भक्तिभावाला दिशा दिली असून या आयोजनामुळे शिर्डी परिसरात अभूतपूर्व श्रद्धा आणि शिस्तीचं वातावरण निर्माण झालं आहे. पंडीत प्रदीप मिश्रा महाराजांच्या वाणीतून विखे परिवाराचं कौतुक झाल्यानं ही कथा फक्त आध्यात्मिकच नाही तर सामाजिक आणि व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही एक आदर्श ठरत आहे.

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...