हॅमर थ्रो मैदानी खेळप्रकारात कोरडे हर्षल राहाता तालुका प्रथम
राहता तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा प्रवारानगर या ठिकाणी दिनांक 10 सप्टेंबर रोजी संपन्न झाल्या या स्पर्धेमध्ये रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला होता या स्पर्धेतील हॅमर थ्रो या खेळ प्रकारामध्ये इयत्ता दहावी मधील कोरडे हर्षल केशव या विद्यार्थ्याने प्रथम क्रमांक मिळवला आग्रे कृष्णा मिनीनाथ या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक मिळवला यामध्ये कोरडे हर्षल केशव हा विद्यार्थी हॅमर थ्रो या खेळ प्रकारात जिल्हा पातळीवर राहता तालुक्याचे नेतृत्व करणार आहे
या विद्यार्थ्यांना विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षक तनपुरे बाळासाहेब, भोये कैलास यांचे मार्गदर्शन लाभले .
या विद्यार्थ्यांचे जनरल बॉडी सदस्य रावसाहेब नाथाजी मस्के पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक वसावे के के सर , स्कूल कमिटीचे ज्येष्ठ सदस्य रावसाहेब पांडुरंग गाढवे पाटील, श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचे संचालक पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष अनिल काका गाढवे पाटील, दादासाहेब गाढवे पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीपभाऊ गाढवे पाटील, गुरुकुल पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष वाल्मीकभाऊ गाढवे पाटील, जयाभाऊ कालेशेठ , रांजणगावचे सरपंच सुनीताताई सोपानकाका कासार, उपसरपंच राजेंद्र पाटील गाढवे व पालकांनी अभिनंदन केले . तसेच एकरूखे ग्रामस्थांनी कौतुक केले आणि जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा