चणेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ.रुपाली खेमनर तर उपाध्यक्षपदी सौ.दामिणी दिघे
नुकत्याच पार पडलेल्या पालक मेळाव्याचे औचीत्य साधुन संगमनेर तालुक्यातील चणेगांव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी सौ.रुपाली खेमनर तर उपाध्यक्षपदी सौ.दामिणी दिघे यांची तसेच सदस्यांमध्ये सौ.वर्षा अवचर, सौ.शिला खेमनर, सौ.कल्याणी ढमक, श्री.रविंद्र खेमनर, श्री.आंबासाहेब लोहाळे, श्री.गणेश पाटोळे, श्री.अमोल पवार, श्री.सचिन भोसले यांची सर्वानुमते निवड करण्यात येवुन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. सदर पालक मेळ्याव्यासाठी मोठ्या प्रमाणात महिला पालकांची उपस्थिती लक्षणीय होती.
पालक मेळाव्या मध्ये शाळेतील गुणवत्ता विषयक, विद्यार्थी पट वाढी संदर्भात, बालवर्ग, शालेय विकास व इतर अनेक गोष्टींवर सखोल चर्चा झाली. त्यातच शालेय व्यवस्थापन समितीचे पुनर्गठन करण्यात आले. व त्यामध्ये महिला वर्गाला प्राधान्य देवुन प्रथमच व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष उपाध्यक्षपदी महिला वर्गांची वर्णी लावण्यात आली. सदर मेळाव्यामध्ये सर्व महिलांनी शाळेची गुणवत्ता व इतर भौतीक सुविधा आणखी दर्जात्मक करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालक वर्गाला ग्वाही दिली. निवड झालेल्या नवीन समितीचे शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीम.संगिता शेलार, श्री.राजेंद्र जोशी, श्री.वाळिबा वाळेकर, श्री.अरुण ढमक, श्री.सुनिल खेमनर आदींनी अभिनंदन करुन पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा