गुरुवार, २५ सप्टेंबर, २०२५

सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने प्रसाद मैड यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर राहुरी येथिल सोनार समाजाचे परखड व्यक्तिमत्व

सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने प्रसाद मैड यांना उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर*
राहुरी येथिल सोनार समाजाचे परखड व्यक्तिमत्व  

गेल्या 32 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात काम करणारे राहुरी येथील प्रसाद भगवान मैड यांची कारकीर्द मुळातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झालेली आहे . विविध जिल्हास्तर व राज्यस्तरीय वृत्तपत्रातून त्यांना पत्रकारितेचा अनुभव आहे . सामाजिक क्षेत्रासह पर्यावरण विज्ञान समाजमनाला भिडणाऱ्या समस्यांचे त्यांनी परखड लिखाण केले आहे . सतर्क खबरबात जिल्ह्याची या न्यूज चॅनेलच्या माध्यमातून सध्या पत्रकारितेत विविधांगी प्रश्नांवर त्यांचा भर आहे .
त्यांचा ह्या कार्याची दखल घेता, सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने नुकताच त्यांना उत्कृष्ट पत्रकार हा पुरस्कार जाहीर झाला आहे* 
या बद्दल अनेक समाज बांधव व इतर समाजातुन तसेच मित्र परिवार यांनी प्रसाद मैड यांचे कौतुक करत अभिनंदन केले*
तसेच सुवर्ण भरारी संस्थेचा संस्थापक अध्यक्षा सारीका ताई नागरे, व प्रसिद्धी प्रमुख रवि माळवे , अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे सदस्य- सोमनाथ आहेर, श्रीपाद बोकंद, यांनी फोन करून प्रसाद मैड यांना शुभेच्छा दील्या,

R. शिर्डी न्यूज
(प्रतिनिधी) साबळे ज्ञानेश्वर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...