विद्यार्थ्यांनी उच्च उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवावे
विकास देशमुख
राहाता
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सारखीच असते त्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपण व्यापक स्वरूपात केला पाहिजे. उच्च ध्येय ठेवून यशाच शिखर गाठले पाहिजे. जो बुद्धिमत्तेचा वापर करून उच्च ध्येय गाठील त्याला विविध संधी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राप्त होतील .ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. शिक्षण कमी असताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी 742 शाखा स्थापन केल्या ,शिक्षणाचे जाळे महाराष्ट्रामध्ये पसरवले. आजच्या जगात गुणवत्ते शिवाय पर्याय नाही. रयत शिक्षण संस्थेने हजारो आयएस अधिकारी, व्यापारी ,अभियंते घडविले. आपण डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट साध्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांच्या कार्याचे विश्लेषणही केले .जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय, उद्दिष्ट, चिकाटी ठेवा, आत्मविश्वास वाढवा, यश निश्चित मिळेल असे सांगितले
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नारायणराव कार्ले पाटील होते आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य मोठे आहे. त्या कार्याला प्रेरित होऊन का.ल. शिंदे पाटलांनी या संकुलाची स्थापना केली .ग्रामीण भागातील शिक्षणा विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली . आज शिक्षणाची संकल्पना बदललेली आहे ,बदलत्या शिक्षणापद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी बदलले पाहिजे . संस्कारित जीवन घडविण्यासाठी थोरामोठांचा आदर केला पाहिजे. शहरातील शैक्षणिक सोयीप्रमाणेच ग्रामीण भागातही शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असे सांगितले .
रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अहिल्यानगरचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी रयत शिक्षण संस्था ही त्यातून निर्माण झालेली शिक्षण संस्था आहे .कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब जनतेसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आज आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे असे सांगितले .
संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी आपल्या मनोगत मध्ये विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. आपल्या देशातील संस्कृतीचा अभ्यास परकीय विद्यार्थी येऊन करतात .आपणही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आजची समाजाची दशा बदलण्यासाठी दिशा निश्चित केली पाहिजे .कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविली त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. स्पर्धेच्या युगात रयतचे विद्यार्थी मागे पडणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी केले त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा इतिहास, शारदा संकुलाची वाटचाल ,कर्मवीर भाऊराव यांचे कार्य व पाहुण्यांचा परिचय करून दिला .याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम. याप्रसंगी सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी ,सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे ,उपप्राचार्य अशोक बोरसे ,पर्यवेक्षक देशमुख, पर्यवेक्षीका शिला संसारे, कुणाल बनकर, डांगे एल एम ,साहेबराव निधाने, सर्जेराव मते, रामभाऊ गमे, डॉ. पी.जी. गुंजाळ ,प्रा. शरद गमे, प्रा. बाळासाहेब दिघे, प्रा. रणजीत पाटील, विवेक गाडेकर ,राजकुमार साळवे, संजय खंदारे प्राध्यापिका सिंधू तनपुरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश आहेर व सोनाली थोरात यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ यांनी मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा