मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 5 ऑक्टोंबर 2025 रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत असून माजी,, केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण


लोनी 
केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा रविवार दि.५ ऑक्टोबर २०२५ रोजी अहिल्यानगरच्या दौऱ्यावर येत असून, सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि ग्रामीण विकासाचे अर्ध्वयू माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण आणि पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे लोकार्पण त्यांच्या शुभहस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आले असल्याची माहिती डॉ.विखे पाटील कारखान्याचे चेअरमन डॉ.सुजय विखे पाटील यांनी दिली.

यासंदर्भात माहिती देताना डॉ.विखे पाटील म्हणाले की, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा हे सहकाराच्या भूमीत लोणी येथे दुसऱ्यांदा येत असून, यापूर्वी सहकार मंत्रालयाची धूरा त्यांच्याकडे आल्यानंतर राज्यातील पहिल्या सहकार परिषदेसाठी त्यांना निमंत्रीत करण्यात आले होते. लोणी येथील विविध कार्यक्रमांना त्यांना पुन्हा निमंत्रीत करण्यात आले असून, प्रवरा परिवाराची विनंती मान्य करुन त्यांनी दोन्ही कार्यक्रमांना येण्याचे मान्य केले आहे. या कार्यक्रमास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार,केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले केंद्रीय सहकार राज्य मंत्री मुरलीधर मोहोळ  पर्यावरण तथा पशुसंवर्धन विकास मंत्री पंकजा मुंडे, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्यासह अन्य मंत्री तसेच महायुतीचे 
लोक प्रतिनिधी उपस्थित राहाणार आहेत.

प्रवरानगर येथे दुपारी १२ वाजता अमित शहा यांचे आगमन होणार असून, कारखान्याच्या विस्तारीत प्रकल्पाचे उद्घाटन त्यांच्या उपस्थितीत संपन्न होईल. त्यानंतर सर्व मान्यवर लोणी गावात येवून पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील आणि माजी केंद्रीय मंत्री पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करतील. गावातीलच बाजारतळावर दुपारी १ वाजता सर्व मान्यवरांचे सभास्थळी आगमन होणार असून, या सभेस केंद्रीय मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मान्यवर मार्गदर्शन करतील. केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या स्वागताची जय्यत तयारी प्रवरा परिवाराच्या वतीने सुरु करण्यात आली असून, लोणी गावातील बाजारतळावर भव्य सभामंडपही उभारण्यात आला आहे.

मराठी तरुणाईच्या हृदयाची धडधड वाढवणारं गाणं “गुलाबी तुझी साडी” आज मोठ्या थाटामाटात रिलीज लोणी

मराठी तरुणाईच्या हृदयाची धडधड वाढवणारं गाणं “गुलाबी तुझी साडी” आज मोठ्या थाटामाटात रिलीज 
लोणी 

या गाण्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे –निर्मितीपासून ते एडिटिंग आणि कॅमेरामनपर्यंत सर्व जबाबदाऱ्या खांद्यावर घेतलेल्या आबा निर्मळ यांचा हा हटके प्रयोग आहे. एकट्याने इतक्या भूमिका निभावून त्यांनी वेगळीच छाप सोडली आहे.
निर्माता डायरेक्टर : प्रमोद पंडित
निर्माते : आबा निर्मळ
 सहनिर्माते : ज्ञानदेव शिंदे
गीतकार : आबा निर्मळ
 एडिटर : आबा निर्मळ
कॅमेरामन : आबा निर्मळ
कलाकारांची फौज :
प्रमोद पंडित, ज्ञानदेव शिंदे, मराठी चित्रपटसृष्टीतील दमदार अभिनेत्री रेणुका शहाणे, तसेच सविता विधाते आणि नरसिंह टाक.
या गाण्याच्या तालावर गुलाबी साडीची झलक दिसताच प्रेक्षकांची नजर थांबलीच राहणार – असा विश्वास संपूर्ण टीमनं व्यक्त केला आहे.
 म्हणजेच, “गुलाबी तुझी साडी” हे केवळ गाणं नाही, तर तरुणाईसाठी गुलाबी स्वप्नांचा जल्लोष ठरणार आहे!
 सत्यशोध वार्ता चे रिपोर्टर ज्ञानेश्वर साबळे यांनी सर्वांचे अभिनंदन करत व शुभेच्छा दिल्या 
मराठी संगीतविश्वात पुन्हा एकदा नवा सोहळा घडला आहे. “गुलाबी तुझी साडी” हे नवं कोरं गाणं आज प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे आणि या गाण्याची चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे.
या गाण्याचं वैशिष्ट्य म्हणजे –
डायरेक्टर प्रमोद पंडित, जे दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित आहेत, यांनी हे गाणं दिग्दर्शित करून आपल्या कलेची नवी छाप सोडली आहे.
तर सहनिर्माते ज्ञानदेव शिंदे यांचा यापूर्वी “SP खाणे नई क्रांती” या चित्रपटाचा निर्माता म्हणून मोठा अनुभव आहे.
निर्माते आबा निर्मळ, जे एका खाजगी कंपनीत नोकरी करत असूनही आपल्या कला-प्रीतीमुळे संगीतसृष्टीत पाऊल टाकलं आहे. त्यांनीच या गाण्याचं सॉंग, एडिटिंग आणि कॅमेरा हाताळत एक वेगळा विक्रम केला आहे.

R. शिर्डी न्यूज.. 
  (प्रतिनिधी) साबळे ज्ञानेश्वर

नारायणगाव पुणे येथील रहिवाशी साईभक्त श्रीमती साधना सुनील कसबे यांनी यांनी श्री साई चरणी १२३ 440 ग्रॅम वजनाचे सोन्याचे कडे अर्पण केले


श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. आज दिनांक ३० सप्‍टेंबर २०२५ रोजी नारायणगाव, पुणे येथील रहिवाशी साईभक्‍त श्रीमती साधना सुनिल कसबे यांनी श्री साईचरणी १२३.४४० ग्रॅम वजनाचे आकर्षक नक्षीकाम असलेले सोन्‍याचे कडे अर्पण केले याची किंमत १३ लाख १२ हजार ५३८  रुपये असून हे सुंदर नक्षिकाम असलेले कडे श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द करण्‍यात आले. त्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार साईभक्‍तांचा सत्‍कार केला.

गुहावटीवरून ज्योत आणणाऱ्या युवकांची अध्यात्मिक भावना मोठी-डॉ विखे पाटील

गुहावटीवरून ज्योत आणणाऱ्या युवकांची अध्यात्मिक भावना मोठी-डॉ विखे पाटील 

एकरूखे 
गुवाहाटी (आसाम) येथून तब्बल ३,४०० किलोमीटर अंतर पायी  ज्योत आणणाऱ्या वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचा माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी एकरूखे येथे झालेल्या स्वागत सोहळ्यात गौरव केला. “हा पराक्रम अभूतपूर्व असून या उपक्रमागची   अध्यात्मिक भावना मोठी असल्याचे या युवकांनी सिद्ध केले आहे,असल्याचे भाविकांशी संवाद साधताना सांगितले.

एकरूखे (ता. राहाता) येथे वज्रेश्वरी प्रतिष्ठान आयोजित मशाल पदयात्रेचे आगमन होताच ग्रामस्थ व भाविकांनी उत्साहात स्वागत केले. या वेळी माजी खासदार डॉ. सुजय दादा विखे पाटील यांनी मनोभावे दर्शन घेऊन पदयात्रेत सहभागी झालेल्या युवकांचा विशेष गौरव केला. त्यावेळी ते बोलत होते 


डॉ विखे भाविकांशी संवाद साधत म्हणाले  की, नेते मोठे नसतात, अनेक येतात-जातात परंतु कार्यकर्त्यांच्या जिद्दीमुळेच खरी ओळख निर्माण होते. विखे पाटील कुटुंबाची ओळख टिकून आहे कारण अशा कार्यकर्त्यांचा मजबूत पाया मागे उभा आहे.

पदयात्रेचा कठीण प्रवास, दरम्यान आलेल्या अडचणी, मुसळधार पावसाच्या संकटांनंतरही युवकांनी हा पराक्रम साध्य केला याबद्दल त्यांनी मनापासून कौतुक केले. हा पराक्रम फक्त वज्रेश्वरी मातेसह देवतेच्या कृपेने आणि युवकांच्या चिकाटीने शक्य झाला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक गावाने या युवकांचा आदर्श घेतला तर अनेक प्रश्न सुटतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी डॉ. विखे पाटील यांनी अलीकडील पुरामुळे बाधित शेतकऱ्यांचा उल्लेख करत, लवकरच शासनाचे अनुदान त्यांच्या खात्यात जमा केले जाईल. राजकारणासाठी मत मागणारे अनेक येतात, पण संकटाच्या काळात खऱ्या अर्थाने सोबत उभे राहणे ही विखे पाटील कुटुंबाची परंपरा आहे,” असे आश्वासन दिले.

कार्यक्रमा दरम्यान ट्रस्टतर्फे डॉ. सुजय  विखे पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच गुवाहाटी येथून मशाल ज्योत घेऊन आलेल्या वज्रेश्वरी प्रतिष्ठानच्या युवकांचा सन्मानही त्यांच्या हस्ते संपन्न झाला.

या सोहळ्याला भाविक, ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहून वज्रेश्वरी मातेसमोर भावपूर्ण दर्शन घेतले.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने नुकतीच लॉन्च झालेली महिंद्रा ev 9 इलेक्ट्रिक कार कंपनीतर्फे श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण

शिर्डी :
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत येत असतात. अनेक भाविक आपली श्रद्धा आणि भक्तिभाव विविध प्रकारच्या दानाद्वारे श्री साईबाबा संस्थानकडे अर्पण करीत असतात.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या उत्पादनातील नव्याने लॉन्च झालेली वाहने संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्याची परंपरा जपली आहे. त्याच परंपरेनुसार नुकतीच लॉन्च झालेली महिंद्रा EV9 इलेक्ट्रिक कार कंपनीतर्फे श्री साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण करण्यात आली आहे.

आज या गाडीचे पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडिलकर, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे सीएफओ श्री. राजीव गोयल आणि एरिया सेल्स मॅनेजर श्री. गणेश उसकुले यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी संस्थानचे वाहन विभाग प्रमुख श्री. अतुल वाघ व जनसंपर्क अधिकारी श्री. दीपक लोखंडे उपस्थित होते. पूजनानंतर कंपनीच्या प्रतिनिधींच्या हस्ते मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडिलकर यांनी कारची चावी स्वीकारली. यानंतर संस्थानच्या वतीने कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

सुमारे ₹28 लाख किंमतीची EV9 इलेक्ट्रिक कार संस्थानला देणगी स्वरूपात प्राप्त झाली आहे. यापूर्वीही महिंद्रा अँड महिंद्राने 16 प्रवासी वाहने, 2 दुचाकी, 2 ट्रॅक्टर आणि 3 मालवाहतूक वाहने अशी एकूण 23 वाहने संस्थानला देणगी स्वरूपात अर्पण केलेली आहेत.


सोमवार, २९ सप्टेंबर, २०२५

पिंपरी ,राहता, शिर्डी, परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व जलसंधारण मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दिले अधिकाऱ्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश

पिंपरी ,राहता,  शिर्डी, परिसरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांचे नुकसान जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी व जलसंधारण मंत्री श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांनी दिले अधिकाऱ्यांना तातडीने  पंचनामे करण्याचे आदेश

 लोणी 
 परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या नुसकानग्रस्त पिकांचे पंचनामे तातडीने करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यात यावा अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या तसेच शासन स्तरावर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले या पाहणी दौऱ्यात संबंधित विभागाचे अधिकारी स्थानिक पदाधिकारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते अशी माहिती डॉ ,विकास निर्मळ यांनी दिली

R. शिर्डी न्यूज

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या 1st Quarter Awards सोहळ्यात डॉ. संजय उबाळे यांना “Best Zone Chairperson Award” ने गौरवन्यायत आले

लायन्स इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 च्या 1st Quarter Awards सोहळ्यात डॉ. संजय उबाळे यांना “Best Zone Chairperson Award” ने गौरवन्यायत आले 

लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234D2 तर्फे आयोजित भव्य 1st Quarter Awards सोहळा अत्यंत उत्साहात व दिमाखात पार पडला. या कार्यक्रमात झोन चेअरमन डॉ. संजय उबाळे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्य, उत्कृष्ट संघटनशक्ती आणि समाजाभिमुख उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल “Best Zone Chairperson Award” ने सन्मानित करण्यात आले.


हा भव्य पुरस्कार सोहळा डिस्ट्रिक्ट गव्हर्नर मा. लायन राजेशजी अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. अहिल्यानगर, पुणे, नाशिक, मालेगाव, मनमाड आदी ठिकाणांहून सुमारे ४०० हून अधिक लायन्स सभासद मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवली.

कार्यक्रमास लायन्स इंटरनॅशनलचे अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यामध्ये –

मा. लायन राजेशजी अग्रवाल (डिस्ट्रिक्ट गव्हर्नर)

मा. लायन राजेंद्र गोयल (Convener)

मा. लायन विजयजी सरडा (Multiple Council Chairman)

मा. लायन राजुभाई मुच्छाल (ID Endorsed)

मा. लायन गिरीशभाऊ मालपाणी (Past Multiple Council Chairman)

मा. लायन श्रेयस दीक्षित (1st Vice District Governor)



तसेच लायन रवींद्र गोल्हार, लायन रवींद्र सातपुते, लायन सलिल कारखानीस, लायन आर. के. शाह, लायन सुनीताभाभी मालपाणी, लायन राजेश कोठावदे, लायन धनंजय धुमाळ आदी मान्यवर विशेष उपस्थित होते.

समाजकार्यात आघाडीवर असलेल्या क्लबचा गौरव

मागील तीन महिन्यांमध्ये उल्लेखनीय समाजकार्य करणाऱ्या विविध क्लब्स व त्यांच्या पदाधिकाऱ्यांचा देखील सत्कार करण्यात आला. 

लायन्स क्लब संगमनेर SAFFRON SAFFIRE – प्रेसिडेंट लायन कल्याण कासाट व त्यांच्या टीमचा गौरव.

लायन्स क्लब कोपरगाव – प्रेसिडेंट लायन अक्षय गिरमे व त्यांच्या टीमचा सन्मान.

तसेच लायन्स क्लब श्रीरामपूर आणि लायन्स क्लब राहाता यांच्या पदाधिकाऱ्यांना विशेष सन्मानित करण्यात आले.


सर्व सन्मानित क्लब्सना आकर्षक ट्रॉफी व डिस्ट्रिक्ट पिन प्रदान करण्यात आल्या.

डॉ. संजय उबाळे यांचे मनोगत

“हा सन्मान केवळ माझा नाही, तर माझ्या संपूर्ण झोनचा आहे. माझ्या झोनमधील प्रत्येक क्लब प्रेसिडेंट, सेक्रेटरी, ट्रेझरर तसेच लायन्स सदस्यांच्या अथक मेहनतीने, एकसंघ कार्यामुळे आणि कॅबिनेट ऑफिसर्सच्या सहकार्यामुळे हा मान मला मिळाला आहे. हा पुरस्कार म्हणजे आपल्या सर्वांच्या सेवाभावाचा सन्मान आहे,” असे डॉ. संजय उबाळे यांनी मनोगतात सांगितले.

तसेच त्यांनी पुढे आवाहन केले – “आपण सेवाभावाने कार्य करण्याचा संकल्प घेतला आहे. पुढेही एकत्र राहून, समाजातील गरजू घटकांपर्यंत सेवा पोहचवूया आणि लायन्स क्लबचे नाव अधिक उज्ज्वल करू

कार्यक्रमाची वातावरण अत्यंत प्रेरणादायी व उत्साहपूर्ण होते. टाळ्यांचा कडकडाट, सन्मानचिन्हांचे वितरण आणि उपस्थित मान्यवरांची भाषणे यामुळे सोहळ्याला विशेष उंची लाभली.
लायन्स क्लब राहता चे मा. अध्यक्ष लायन प्रकाश सदाफळ,लायन pravin गुलाटी  कॅबिनेट  ऑफिसर,लायन दर्शन वैद्य डिस्ट्रिक्ट लिओ प्रेसिडेंट 
लायन राजेंद्र बांगर उपाध्यक्ष,लायन रतन चौधरी सेक्रेटरी, लायन दिनेश कारले ट्रेजरर, ॲड गोरखभाऊ दंडवते 
लायन अंजली उबाळे मेंबरशिप चेअरमन, लायन दीपक दंडवते एल सी एफ कॉर्डिनेटर लायन स्मिता मुरादे डायरेक्ट, लायन सोहन उबाळे, लायन. खिजर शहा, संजय भनगे,
रवींद्र जोशी, डॉ विजय म्हस्के,रवी धस,सचिन सदाफळ,विजय धनवटे, डॉ . राजेश्री गाडेकर, डॉ.राहुल चोळके,सत्यवान कोल्हे,संतोष भडांगे,संदीप भीगारदिवे, गायकवाड साहेब, गायकवाड सिस्टर,सुरेश गायकवाड  अनाप मॅडम यांनी अभिनंदन केले

प्रवरा नदीकाठच्या गावांना, परतीच्या पावसाचा फटका,

प्रवरा नदीकाठच्या गावांना, परतीच्या पावसाचा फटका, 

, लोणी प्रतिनिधी 
,चनेगाव ,तालुका संगमनेर ,जिल्हा अहिल्यानगर, शिंदे घोगरे वस्ती ,येथील शेतकरी , ज्ञानदेव नरहरी शिंदे ,यांच्या ,शेतातील ,उभे पीक ,व गोठ्यामधील, जनावरे ,पाण्यामध्ये, ताटकळुन ,उभे आहे ,घरामध्ये ,व घराच्या ,पूर्ण अंगणात ,गुडघ्या इतके, पाणी झाले आहे,  त्या, कुटुंबाला, घरातून बाहेर ,येण्याची ,मोठी कसरत करावी लागत आहे त्यांच्या जनावरांचा चारा व घरातील काही, वस्तू पाण्यात अक्षरशा ,वाहून गेल्या, या स्थानिक शेतकरी कुटुंबाला घरातून येणे अवघड झाले आहे अशा परिस्थितीत जलमय प्राण्यांची भीती वाढली आहे बातमीची सत्यता पत्रकार न्युज रिपोर्टर ,ज्ञानेश्वर साबळे, अभिनेते  ,प्रमोद पंडित यावेळी घटनास्थळी पाहणी, करताना नागरिकांनी परतीच्या पावसाने नुकसान भरपाई चे पंचनामे तातडीने करावे व मदत कार्य लवकरात लवकर करावे पावसामुळे शेतकऱ्यांचे फक्त आर्थिकच नव्हे तर मानसिक मनस्थिती ची हानी झाली आहे

रविवार, २८ सप्टेंबर, २०२५

अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी शिर्डी येथे अधिकाऱ्यासमवेत तातडीची बैठक


शिर्डी


जिल्ह्यातील जलसंपदा, जलसंधारण, पाटबंधारे व बांधकाम विभागाचे ओढे - नाले, चाऱ्या, तलाव, कालवे, बंधारे व  रस्ते व पूल यावर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले आहे. यामुळे पाण्याला अटकाव होऊन पूरपरिस्थिती निर्माण होते. हे अतिक्रमण तात्काळ हटविण्यासाठी युद्धपातळीवर मोहीम राबवा, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले.


अहिल्यानगर जिल्ह्यात होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डी येथे तातडीची बैठक घेतली. आज दिवसभरात  मंत्री विखे पाटील यांनी शिर्डी मतदार संघातील विविध गावात झालेल्या नुकसानीची पाहाणी केली.जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांच्याकडून त्यांनी जिल्ह्यातील परीस्थीतीची माहीती घेवून उपाय योजना करण्याच्या सूचना दिल्या.

सांयकाळी उशिरा शिर्डी संस्थांनच्या सभागृहात वरीष्ठ अधिकार्या समवेत त्यांनी बैठक घेतली.या बैठकीला साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, उपविभागीय अधिकारी माणिक आहेर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता बाळासाहेब शेट्ये, कार्यकारी अभियंता सोनल शहाणे, सायली पाटील, प्रदिप हापसे, स्वप्निल काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे, राहाता तहसीलदार अमोल मोरे, तालुका कृषी अधिकारी आबासाहेब भोरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री डॉ. विखे पाटील म्हणाले, जलसंपदा व जलसंधारण विभागाने जिल्ह्यातील पाणीसाठ्यांवरील अतिक्रमण हटविण्यासाठी समन्वयातून कृती आराखडा तयार करावा, ओढे- नाले चाऱ्यांची व्यवस्थित मोजमाप करून अतिक्रमण हटविण्यात यावे. 

पाथर्डी व शेवगाव दोन्ही तालुके मिळून अंदाजे १ लाख हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. जामखेड ६० हेक्टर क्षेत्र  व राहाता तालुक्यात अंदाजे ४० हजार हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे. जिल्हा प्रशासन सतर्क असल्याने मनुष्यहानी कमी झाली आहे. जिल्हा प्रशासनाच्या तत्परमुळे हजारो लोकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात यश आले आहे. जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा, साई आश्रम अशा ठिकाणी पुरग्रस्तांना तात्पुरता निवारा देण्यात आला आहे. प्रशासन, स्वयंसेवी संस्था व स्थानिक नागरिकांच्या माध्यमातून पुरग्रस्तांना सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत. पुरग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या सुविधांवर लक्ष ठेवण्याचे काम प्रशासनाने करावे, अशा सूचना ही त्यांनी यावेळी केल्या. 

शिर्डीत २०२० व २२ मध्ये झालेल्या अतिवृष्टीवर धडा घेऊन मोठ्या प्रमाणात नागरी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. त्यामुळे कालच्या पावसात शिर्डीत कमी नुकसान झाले. नगरपालिका प्रशासनाने तत्परतेने मदतकार्य राबविले. 

शिर्डी, लोणी महामार्गावरील बासपासवर असलेले गतीरोधक तात्काळ हटविण्यात यावे. महावितरणचे डीपी पाण्यात गेल्या तरीही वीजपुरवठा खंडित करण्यात आला नाही. ट्रान्सफॉर्मर पाण्याच्या प्रवाहात येत असतील तर तात्काळ वीज पुरवठा खंडीत करण्याची कार्यवाही करावी. कृषी व महसूल विभागाने सरसकट पंचनामे करावेत, अशा सूचनाही पालकमंत्र्यांनी केल्या. आरोग्य विषयक उपाययोजनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये प्रथमच दुर्बीण द्वारे बिन टाक्याची शस्त्रक्रिया संपन्न

श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये प्रथमच दुर्बीण द्वारे बिन टाक्याची शस्त्रक्रिया संपन्न 
 

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये  दुर्बीणद्वारे बिन टाक्याची  इंडॉस्कोपी स्पाइन सर्जरी न्यूरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर भूलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे यांच्या न्यूरो सर्जरी टीमने केली. 
दुर्गादास राठोड रा. शिर्डी  जिम मध्ये व्यायाम करत असताना त्यावेळी त्यांनी भारी वजन उचलण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पाठीच्या मणक्याची गादी सरकली यातून त्यांना तीव्र वेदना सुरू झाल्या या  वेदने पोटी त्यांना डावा पाय पूर्ण तोडून टाकावा असे वाटत होते अशा असह्य वेदना होत असताना त्यांनी साईबाबा सुपर हॉस्पिटलमध्ये न्यूरो सर्जन डॉ. प्रसाद उंबरकर यांची भेट घेतली डॉक्टरांनी त्यांना सर्जरी करावी असे सांगितले परंतु मणक्याचे ऑपरेशन करणे हे त्यांना भीतीदायक वाटत होते त्यांनी डॉक्टरांना विनंती करून ऑपरेशन मध्ये कमीत कमी जखम कशी होईल यासाठी प्रयत्न करावे असे सांगितले डॉ. प्रसाद उंबरकर यांनी यासाठी साईबाबा हॉस्पिटल मध्ये प्रथमच दुर्बीण द्वारे सदर रुग्णाचे ऑपरेशन करवायचे ठरवले यासाठी त्यांना भूलतज्ञ डॉ. संतोष सुरवसे जनरल सर्जन डॉ. अजिंक्य पानगव्हाणे यांचे मोलाचे सहकार्य लाभले यातून त्यांनी श्री साईबाबा हॉस्पिटल मध्ये प्रथमच अशा प्रकारची बिन टाक्याची शस्त्रक्रिया दुर्बिन द्वारे संपन्न केली शस्त्रक्रिया संपन्न झाल्यानंतर रुग्ण अगदी भूलेतून बाहेर आल्या आल्या चालायला लागला त्याची असह्य वेदनेतून सुटका झाली त्यामुळे त्यांनी आनंद व्यक्त करून डॉक्टरांचे व श्री साईबाबा संस्थानच्या श्री साईबाबा हॉस्पिटल मधील न्यूरो ओटी टीमचे मनःपूर्वक आभार मानले सदरील सर्जरी ही महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मोफत करण्यात आली या यशस्वी शस्त्रक्रियेबद्दल न्यूरो ओटी टीमचे श्री साईबाबा संस्थानचे  मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर भा. प्र. से., उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे आदींनी अभिनंदन केले.

राहाता तालुक्यासह गणेश परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान

राहाता तालुक्यासह गणेश परिसरात शनिवारी झालेल्या पावसाने प्रचंड नुकसान 
   राहाता तालुक्यातील गणेश परिसरासह रांजणगाव ,जळगाव, चितळी, एकरुखे, साकुरी,शिर्डी, अस्तगाव सह अनेक गावात शनिवारी रात्री पासून कडकडाटासह ढग फुटी सदृश पाऊस झाला असून ओढे - नाले क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ओसंडून वाहत होते , यामधे राहाता साकुरी रस्त्याने देखील जाणे येणे बंद झाले आहे 
 तसेच राहाता चितळी रोडवरील एकरुखे येथील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे जवळील सर्व गावांचा संपर्क तुटला तसेच परिसरातील ओढ्यानासुद्धा पाणी मोठ्या प्रमाणात आल्यामुळे एकरुखे परिसरातील शेतकऱ्यांचे जाणे- येणे बंद झाले आहे . दूध डेअरी ला न घालता ते घरी ठेवावे लागले त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे तसेच गणेश परिसरातील काढण्यासाठी आलेले सोयाबीन,कपाशी तसेच जनावराचा चारा इतर पिकांचे नुकसान झाले असून या, पिकांमध्ये पाणी साचल्यामुळे यांना तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे या परिसरात अजूनही काही ओढे वाहत असल्यामुळे वाड्या वस्त्यांवरील नागरिकांचा, गावाशी संपर्क होऊ शकला नाही, तसेच शासनाने राहाता तालुक्यातील सर्व गावांचे व गणेश परिसर त्यामध्ये गावतळ्याचे कडेचे शेतकरी यांच्या पिकांचे प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात यावा,ही सर्व शेतकरी करत आहे याकडे प्रशासनाने तात्काळ लक्ष द्यावे.

मुळाथडी परीसरात शनिवारी रात्रभरच्या पाऊसाने झोडपले. मुळानदीत मुळाधरणातून २५हजाराचा विसर्ग, ओढे नाले दुथडी

मुळाथडी परीसरात शनिवारी रात्रभरच्या पाऊसाने झोडपले. 
मुळानदीत मुळाधरणातून २५हजाराचा विसर्ग, ओढे नाले दुथडी  

पानेगांव (वार्ताहर):- 
नेवासा तालुक्यातील पश्चिम भागातील मुळाथडी परीसरातील खुपटी, गोणेगांव,निंभारी, अंमळनेर ,करजगांव, वाटापूर, तामसवाडी ,पानेगांव, शिरेगांव ,खेडलेपरमानंद, लांडेवाडी, गणेशवाडी, उंबरे, ब्राह्मणी, वळण मानोरी, मांजरी सह सोनई परीसरात शनिवारी रात्रीपासून विजेचा कडकडाटासह ढगफुटी सदृश पाऊस प्रचंड पाऊसाने झोडपले. पाच दिवसांचा विश्रांतीनंतर शनिवारी रात्रीच्या पाऊसाने सर्वच रेकॉर्ड मोडत काढीत चौफेर झोडपल्याने नदी ओढे नाले क्षमतेपेक्षा अधिक प्रमाणात ओसंडून वाहत होते. 

त्यामुळे मुळाधरणातुन मुळानदी पात्रात सुरुवातीला पाच हजार क्युसचने नंतर मुळाधरणात वरुन येणारी आवक पाहून पाटबंधारे विभागाने विसर्ग पंचवीस हजार क्युसचने मुळानदी पात्रात सोडण्यात आला त्याच बरोबर देवनदी आलेला पुर त्यामुळे नदी पात्र धोक्याचा बाहेर वाहत आहे. खेडलेपरमानंद - वळण पुलावरून पाणी असल्याने संपर्क तुटला त्याच बरोबर. वाटापूर -तामसवाडी पुलावरुन पाणी असल्याने वाहतूक बंद करण्यात आली.  सोनई कडे करजगांव,शिरेगांव खेडलेपरमानंद जाणारे रस्ते बंद झाले पुन्हा  शेतकऱ्यांचे होत्याचं नव्हतं झालं.
शेतामध्ये असणारे बाजरी, ऊस, कपाशी, ऊस, मका,घास मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून येथे असणाऱ्या ओढा कडेचा जमिनी हि वाहून गेल्या असून ओढे नाले तुडुंब भरून वाहत आहे.


 प्रतिक्रिया- महायुती सरकार वाट कुणाची पाहता शासन दरबारी पाऊसाची नोंद झाली असून प्रचंड नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे. लोकप्रतीनिधी,प्रशासनाने यांनी फोटोसेशन न करता पंजाब सरकार ज्या पद्धतीने मदत केली त्याच पद्धतीने शेतकऱ्यांना मदत देवून तात्काळ कर्जमाफी करण्यात यावी - चंद्रकांत जगताप -सरपंच तामसवाडी 


 प्रतिक्रिया- मुळाथडी परीसरात झालेला प्रचंड पाऊसाने शेतकऱ्यांचे पिकांचे नुकसान झाले असून  प्रशासनाने एकरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ शेतकऱ्यांना देण्यात यावी-संजय जंगले मा. सरपंच पानेगांव

शनिवार, २७ सप्टेंबर, २०२५

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला

जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकपदाचा पदभार स्वीकारला

नेवासा (तालुका प्रतिनिधी):-

दि. २७सप्टेंबर – देशभरातील श्रद्धास्थान असलेल्या जगप्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थानच्या प्रशासनात मोठा बदल झाला आहे. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी आज शनिवारी, दि. २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शनिशिंगणापूर येथे प्रत्यक्ष येऊन प्रशासक पदाचा पदभार  स्वीकारला.
यावेळी नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आमदार विठ्ठलराव लंघे, तसेच भाजपा व शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते. देवस्थानाच्या अतिथीगृहात आमदार लंघे यांनी जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांचे  स्वागत केले.
राज्य सरकारने दिनांक २२ सप्टेंबर २०२५ रोजी काढलेल्या आदेशानुसार, शनिशिंगणापूर देवस्थानचा विश्वस्त मंडळ बरखास्त करत, २०१८ चा देवस्थान व्यवस्थापन कायदा लागू केला असून, त्याअंतर्गत तात्पुरता प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लवकरच नव्या विश्वस्त मंडळाची नेमणूक केली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले. पदभार स्वीकाऱ्यापूर्वी डॉ. पंकज आशिया यांनी उदासी महाराज मठात अभिषेक केला आणि शनी चौथर्‍यावर जाऊन शनीदेवाचे दर्शन घेतले. यानंतर त्यांनी भाविकांच्या श्रद्धेला योग्य न्याय देण्यासाठी पारदर्शक व भक्ताभिमुख प्रशासन उभारण्याचे आश्वासन दिले. यावेळी बोलताना आमदार विठ्ठलराव लंघे म्हणाले, “देवस्थान प्रशासनाने भाविकांच्या सोयीसुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्यावे. शासन लवकरच नवीन विश्वस्त मंडळाची स्थापना करणार असून, त्यात स्वतंत्र अधिकारी नेमण्याची कार्यवाही देखील केली जाईल. प्रशासन भाविकाभिमुख राहील याची खात्री दिली जाईल.”यावेळी आ.लंघे पुढे म्हणाले देवस्थानचा मागील कारभार जो झाला तो सोडून  पुढे स्वच्छ कारभार कसा होईल याकडे लक्ष दयावे.यावेळी त्यांनी नेवासा तालुक्यातील जनतेच्या वतीने प्रशासक म्हणून जिल्हाधिकारी डॉ. आशिया यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी शनिशिंगणापूर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात आले. त्यांनी अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याने आपण सत्कार स्वीकारणार नाही असे सांगत शनिशिंगणापूर देवस्थानच्या कारभार अतिशय चोख पार केला जाईल असे सांगितले. मागील गैरकारभार आरोपा बाबत बोलताना ते म्हणाले येथून पुढे देवस्थानच्या कारभारात भाविकांचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम केले 

जाईल.

 जिल्हाचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील व आ. विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या मार्गदर्शना खाली शासनाच्या वतीने देवस्थान मध्ये भाविकांसाठी सोई सुविधा करण्यासाठी काम केले जाईल. सध्या अतीपावसाने अहिल्यानगर जिल्हात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आपण सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणार आहोत असे यावेळी बोलताना ते म्हणाले. यावेळी त्यांनी देवस्थान मधील कार्यालयात जाऊन देवस्थानचे कार्यालयीन अधीक्षक वाघ यांच्या कडून पदभार घेत  फाईलवर स्वाक्षरी करून कारभार स्वीकारला.यानंतर शनिशिंगणापूर तलाठी यांनी शासनाचा सीलचा शिक्का मारला.
कार्यक्रमाच्या शेवटी भाजपाचे युवा नेते ऋषिकेश शेटे यांनी मागील प्रशासनावर सडकून टीका केली. तर आभार प्रदर्शन मराठा महासंघाचे संभाजी दहातोंडे यांनी केले.यावेळी नेवासा तालुक्यातील सर्व महायुतीचे कार्यकर्ते व शनी भक्त मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते.
शनिशिंगणापूर देवस्थानच्या नवीन अध्यायाला सुरुवात झाल्याने, भाविकांच्या अपेक्षा उंचावल्या असून पारदर्शक, कार्यक्षम आणि भक्ताभिमुख कारभाराकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

चौकट -मराठा महासंघाच्या वतीने संभाजी दहातोंडे यांनी कार्यकारी अधिकारी गैरहजर असल्याबाबत त्यांचे निलंबन करावे असे बोलताना सांगितलं.

चौकट -मी दोन दिवस आजारी रजा टाकून पुणे येथे संचेती हॉस्पिटल येथे आरोग्य तपासणी साठी आलो असल्याने देवस्थानचे कार्यालय अधीक्षक वाघ यांना पदभार देण्याचे काम सांगितले आहे.
-जि. के दरंदले माजी कार्यकारी अधिकारी शनिशिंगणापूर देवस्थान

विद्यार्थ्यांनी उच्च उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवावेविकास देशमुख

विद्यार्थ्यांनी उच्च उद्दिष्ट आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवावे
विकास देशमुख
 
    राहाता 
रयत शिक्षण संस्थेच्या शारदा शैक्षणिक संकुलामध्ये रयत शिक्षण संस्थेचे थोर संस्थापक डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांची 138 वी जयंती सोहळा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला रयत शिक्षण संस्थेचे सचिव विकास देशमुख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते .त्यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता सारखीच असते त्या बुद्धिमत्तेचा उपयोग आपण व्यापक स्वरूपात केला पाहिजे.  उच्च ध्येय ठेवून यशाच शिखर गाठले पाहिजे. जो बुद्धिमत्तेचा वापर करून उच्च ध्येय गाठील त्याला विविध संधी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून प्राप्त होतील .ग्रामीण भागापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचवण्याचे काम कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केले. शिक्षण कमी असताना कर्मवीर भाऊराव पाटलांनी 742 शाखा स्थापन केल्या ,शिक्षणाचे जाळे महाराष्ट्रामध्ये पसरवले. आजच्या जगात गुणवत्ते शिवाय पर्याय नाही. रयत शिक्षण संस्थेने हजारो आयएस अधिकारी, व्यापारी ,अभियंते घडविले. आपण डोळ्यासमोर ठेवलेले उद्दिष्ट साध्य केले पाहिजे. त्याचप्रमाणे त्यांनी लक्ष्मीबाई भाऊराव पाटलांच्या कार्याचे विश्लेषणही केले .जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ध्येय, उद्दिष्ट, चिकाटी ठेवा, आत्मविश्वास वाढवा, यश निश्चित मिळेल असे सांगितले             
    कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी नारायणराव कार्ले पाटील होते आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये त्यांनी कर्मवीर भाऊराव पाटील यांचे कार्य मोठे आहे. त्या कार्याला प्रेरित होऊन का.ल. शिंदे पाटलांनी या संकुलाची स्थापना केली .ग्रामीण भागातील शिक्षणा विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली . आज शिक्षणाची संकल्पना बदललेली आहे ,बदलत्या शिक्षणापद्धतीमध्ये विद्यार्थ्यांनी बदलले पाहिजे . संस्कारित जीवन घडविण्यासाठी थोरामोठांचा आदर केला पाहिजे. शहरातील  शैक्षणिक सोयीप्रमाणेच ग्रामीण भागातही शिक्षणाच्या सोयी उपलब्ध झाल्या पाहिजे असे सांगितले .
        
 रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभाग अहिल्यानगरचे विभागीय अधिकारी नवनाथ बोडखे यांनी रयत शिक्षण संस्था ही त्यातून निर्माण झालेली शिक्षण संस्था आहे .कर्मवीर भाऊराव पाटलांनी गोरगरीब जनतेसाठी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली आज आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था म्हणून संस्थेचा नावलौकिक आहे असे सांगितले .
       संकुलाचे अध्यक्ष रमेश शिंदे यांनी आपल्या मनोगत मध्ये विद्यार्थ्यांनी आपली संस्कृती जपली पाहिजे. आपल्या देशातील संस्कृतीचा अभ्यास परकीय विद्यार्थी येऊन करतात .आपणही त्याचा अभ्यास केला पाहिजे. आजची समाजाची दशा बदलण्यासाठी दिशा निश्चित केली पाहिजे .कर्मवीर भाऊराव पाटलांनी शिक्षणाची ज्ञानगंगा ग्रामीण भागापर्यंत पोहोचविली त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी घेतला पाहिजे. स्पर्धेच्या युगात रयतचे विद्यार्थी मागे पडणार नाही असा आत्मविश्वास व्यक्त केला.        कार्यक्रमाचे प्रास्ताविक संकुलाचे प्राचार्य अनिल बनसोडे यांनी केले त्यांनी रयत शिक्षण संस्थेचा इतिहास, शारदा संकुलाची वाटचाल ,कर्मवीर भाऊराव यांचे कार्य व पाहुण्यांचा परिचय करून दिला .याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रम.  याप्रसंगी सहाय्यक विभागीय अधिकारी बाबासाहेब नाईकवाडी ,सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोद तोरणे ,उपप्राचार्य अशोक बोरसे ,पर्यवेक्षक देशमुख, पर्यवेक्षीका शिला संसारे, कुणाल बनकर, डांगे एल एम ,साहेबराव निधाने, सर्जेराव मते, रामभाऊ गमे, डॉ. पी.जी. गुंजाळ ,प्रा. शरद गमे, प्रा. बाळासाहेब दिघे, प्रा. रणजीत पाटील, विवेक गाडेकर ,राजकुमार साळवे, संजय खंदारे प्राध्यापिका सिंधू तनपुरे आदी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.रमेश आहेर व सोनाली थोरात यांनी केले व आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका हेमलता गुंजाळ यांनी मानले.

अहिल्यानगर- छत्रपती संभाजी नगर अपघातातील मृतांची संख्या वाढल्यावर दुरुस्ती करणार का?- देसरडा

अहिल्यानगर- छत्रपती संभाजी नगर  अपघातातील मृतांची संख्या वाढल्यावर दुरुस्ती करणार का?- देसरडा 

 नेवासा (तालुका प्रतिनिधी)

 घोडेगांव राज्य महामार्गावर येथील दुरुस्ती व्हावी यासाठी येथे बस स्थानका समोर शनिवार दि.२७ सकाळी १०:३०ते ११ वाजे पर्यंत रास्ता रोको आंदोलन समस्त ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. यावेळी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा यांनी महामार्गावर अपघातांची,मृतांची काही टार्गेट आहे का? 

ते पुर्ण झाल्याशिवाय कामाला सुरुवात केली जाणार नाही का? असा संतप्त सवाल केला. महामार्गावरून अधिकारी जात नाही का? त्यांना या दुरावस्था दिसत नाही का? एखादा रुग्ण जर नगरला दवाखान्यात न्यायला आता दिड तास लागतो. तो वाटेतच जातो का अशी भिती कायम असते देसरडा यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे वाभाडे काढून लवकरात लवकर रस्त्याचे काम पुर्ण न झाल्यास यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलनचा इशारा दिला. 



   शिवसेना नेवासा विधानसभा संघटक पंकज लांभाते यांनी सा बां विभाग अधिकारी निगरगट्ट आहेत. नागरिकांच्या समस्या त्यांना समजत नाही. देखभाल दुरुस्ती साठी  लाखो रुपये खर्च केले. कायम स्वरुपी टिकाऊ काम करा.वाहनांच्या अपघातात जीव जाणार नाही याची काळजी घ्या. तातडीने कामास सुरुवात करा.तरच आम्ही आंदोलन मागे घेऊ. कायद्याचा धाक दाखवु नका .नागरिकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर आलो. फक्त घोडेगाव करांचा प्रश्न नाही .ठोस कार्यवाही करा तरच येथुन ऊठु. अन्यथा गुन्हे दाखल झाले तरी हरकत नाही .


आमच्यासाठी येथे आलो नाही. जनतेत.या भावना लक्षात घ्याव्यात असे म्हणाले.
   माजी सरपंच बाळासाहेब सोनवणे यांनी थातुर मातुर काम नको.तातडीने कायम स्वरुपी दुरुस्ती करा गोड बोलुन वेळ मारुन‌ नेऊ नका. काम कधी सुरु करणार हे जनतेला सांगा अशी भूमिका घेतली.
   यावेळी सा बां विभाग चे अकोलकर यांनी अभियंता पाटील यांच्याशी भ्रमणध्वनी वर बोलणे करुन दिले तेव्हा पाटील म्हणाले सेक्रेटरी साहेबांचा दोन दिवस दौरा असल्याने मी आलो नाही. दहा दिवसांच्या अवधीत निविदा काढुन ठेकेदाराकडुन खडी ,डांबरांने खड्डे बुजवले जातील ,पावसात काम करणे शक्य होत नाही. दहा दिवसांच्या आत कामास सुरुवात केली जाईल असे आश्वासन दिले तसे आशयाचे पत्र ही अकोलकर यांनी आंदोलनकर्त्यांना दिले आहे.
घोडेगांव तालुका चळवळीचे नेते सुधिर वैरागर यांनी तीव्र शब्दात भावना व्यक्त केल्या. आंदोलन शांततेत पार पडले. जवळपास तीनशेच्या वर 
  

आंदोलनात  नागरिक सहभागी झाले.रस्त्याच्या दुतर्फा दिड किमी पर्यंत वाहनांचा रांगा लागल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली.आंदोलनात युवकांनी स्वयं स्फुर्तीने सहभाग नोंदवला. 
पोलिस प्रशासनाच्या वतीने शेवगांव उपविभागीय पोलिस उपाधिक्षक निरजकुमार राजगुरू यांचा मागदर्शनाखाली सोनई पोलीस ठाण्याचे स.पो.नि. विजयकुमार माळी उपनिरीक्षक सुरज मेढे सह पोलिस कर्मचारी यांनी आंदोलन वेळी चोख बंदोबस्त ठेवला.

प्रतिक्रिया - नगर मनमाड रस्त्यावरची वाहतूक अहिल्यानगर -छत्रपती संभाजीनगर मार्गी वळवल्यामुळे रस्त्यावर रोजचं अपघात होत असून रस्त्यावर मोठ मोठी खड्डे पडले आहे लवकरात लवकर सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याची दुरुस्ती हाथी घेवून नगर संभाजीनगर वळवलेली वाहतूक बंद करण्यात यावी अन्यथा पुन्हा रास्ता रोको आंदोलनचा इशारा कांगोणी सरपंच सोमनाथ कराळे यांनी दिला.

शुक्रवार, २६ सप्टेंबर, २०२५

त्र्यंबकेश्वर घटनेचा निषेध; पत्रकार बांधवांच्या पाठीशी ठाम – सौ. प्रभावती घोगरे

त्र्यंबकेश्वर घटनेचा निषेध; पत्रकार बांधवांच्या पाठीशी ठाम – सौ. प्रभावती घोगरे

शिर्डी 
त्र्यंबकेश्वर येथे पत्रकार बांधवांवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, या घटनेचा महाविकास आघाडीच्या वतीने निषेध करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस सौ. प्रभावती घोगरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी शिर्डी येथील मा. पोलीस उपअधीक्षक श्री. अमोल भारती यांना निवेदन सादर केले.

या वेळी बोलताना सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या की, पत्रकार हा समाजाचा चौथा स्तंभ असून लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. पत्रकारांवर होणारे हल्ले हे थेट लोकशाहीवर हल्ले आहेत. अशा घटना कोणत्याही परिस्थितीत सहन केल्या जाणार नाहीत. सरकारने तात्काळ हस्तक्षेप करून दोषींवर कठोर कारवाई करावी तसेच पत्रकार बांधवांच्या सुरक्षेसाठी ठोस यंत्रणा उभी करणे ही काळाची गरज आहे.

महाविकास आघाडीच्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, त्र्यंबकेश्वर प्रकरणातील दोषींवर तातडीने व कठोर कारवाई करण्यात यावी. पत्रकारांचे स्वातंत्र्य अबाधित राहण्यासाठी ठोस कायदे व उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी सरकारने कठोर धोरण आखावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली.

सौ. प्रभावती घोगरे यांनी पुढे सांगितले की, पत्रकार समाजातील वंचित, दुर्लक्षित व शोषित घटकांचा आवाज बनतात. त्यांच्यावर होणारे हल्ले हे फक्त व्यक्तीवरचे नाहीत तर संपूर्ण समाजाच्या स्वातंत्र्यावरचे आहेत. जर अशा घटना घडत राहिल्या तर लोकशाही धोक्यात येईल. म्हणूनच पत्रकारांचे संरक्षण करणे ही राज्य सरकारची प्रथम जबाबदारी आहे.

या प्रसंगी महाविकास आघाडीचे सचिन चौगुले, सचिन कोते, ॲड. पंकज लोंढे, संजय आप्पा शिंदे, अमृत गायके, गणेश सोमवंशी, उत्तमराव मते, सचिन गाडेकर, किरण जपे, शरद भदे, संजय पगारे, सचिन उर्फ मुन्ना आहेर, शरद घोगरे तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने अभिनेता प्रमोद पंडीत यांना उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर

सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने अभिनेता प्रमोद पंडीत यांना उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर


पाथरे ता राहाता येथिल कलावंत व अभिनय आवड असणारे, त्यांनी राजा नंबर वन मराठी चित्रपट,कंदुरी ,बाबो, कहानी आईच्या प्रेमाची सासूच्या घरात जावयाची वरात, घोटाळ्यात घोटाळा ताराराणी द फार्म हाऊस बायको केली फजिती झाली रणरागिनी हिंदी चित्रपट एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का व बऱ्याच वेब सिरीज केल्या मराठी अल्बम सॉंग ही खूप लोकप्रिय झाले त्यांना अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले आहे कल्याणी महिला उद्योग पुरस्कार सिंधुताई सामाजिक कलावंत पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार रणरागिणी  कलावंत पुरस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ सन्मानपत्र देऊन पुरस्कार अनेक पुरस्कारने सन्मानीत अभिनेते प्रमोद पंडीत, यांना नुकताच सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने  उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर झाला ,
सुवर्ण भरारी संस्थेचा संस्थापक अध्यक्षा सारीका ताई नागरे यांनी हा पुरस्कार जाहीर केला असुन, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख रवी माळवे ,अहिल्या नगर जिल्हा कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे ,राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे ,सदस्य- श्री गोकुळ शेठ चिंतामणी, श्री पांडुरंग शेवंती ,मेजर सोमनाथ आहेर पा. श्रीपाद बोकंद , गुरुनाथ बोराडे, यांनी अभिनेते दिर्गदर्शक प्रमोद पंडित यांना फोन द्वारे शुभेच्छा दिल्या लोणी सोनगाव पाथरे पंचक्रोशीतून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे,

R. शिर्डी (प्रतिनिधी) 
साबळे ज्ञानेश्वर

सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने अभिनेता प्रमोद पंडीत यांना उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर

सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने अभिनेता प्रमोद पंडीत यांना उत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर



पाथरे ता राहाता येथिल कलावंत व अभिनय आवड असणारे, त्यांनी राजा नंबर वन मराठी चित्रपट,कंदुरी ,बाबो, कहानी आईच्या प्रेमाची सासूच्या घरात जावयाची वरात, घोटाळ्यात घोटाळा ताराराणी द फार्म हाऊस बायको केली फजिती झाली रणरागिनी हिंदी चित्रपट एक रुपया चांदी का देश हमारा गांधी का व बऱ्याच वेब सिरीज केल्या मराठी अल्बम सॉंग ही खूप लोकप्रिय झाले 

त्यांना अनेक मोठमोठे पुरस्कार मिळाले आहे कल्याणी महिला उद्योग पुरस्कार सिंधुताई सामाजिक कलावंत पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार रणरागिणी  कलावंत पुरस्कार महात्मा फुले कृषी विद्यापीठ सन्मानपत्र देऊन पुरस्कार अनेक पुरस्कारने सन्मानीत अभिनेते प्रमोद पंडीत, यांना नुकताच सुवर्ण भरारी संस्थेचा वतीने  उत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार जाहीर झाला ,


सुवर्ण भरारी संस्थेचा संस्थापक अध्यक्षा सारीका ताई नागरे यांनी हा पुरस्कार जाहीर केला असुन, राष्ट्रीय प्रसिद्धीप्रमुख रवी माळवे ,अहिल्या नगर जिल्हा 



कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर साबळे ,राहता तालुका प्रसिद्धीप्रमुख शंकर सोनवणे ,सदस्य- श्री गोकुळ शेठ चिंतामणी, श्री पांडुरंग शेवंती ,मेजर सोमनाथ आहेर पा. श्रीपाद बोकंद , गुरुनाथ बोराडे, यांनी अभिनेते दिर्गदर्शक प्रमोद पंडित यांना फोन द्वारे शुभेच्छा दिल्या लोणी सोनगाव पाथरे पंचक्रोशीतून शुभेच्छाचा वर्षाव होत आहे,

R. शिर्डी (प्रतिनिधी) 
साबळे ज्ञानेश्वर

Featured post

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील

आदन मदन बाबा यात्रा ही सर्व धर्मांना जोडणारी परंपरा; डॉ. सुजय विखे पाटील  दाढ बुद्रुक  आदन मदन बाबा यात्रा ही केवळ एका समाजाची म...