गावासाठी अभिमानाचा क्षण – सौ. प्रभावती घोगरे यांचा लोणी खुर्द ग्रामपंचायत व सहकारी सोसायटीतर्फे सन्मान!
लोणी खुर्द
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीसपदी नुकतीच नियुक्ती झालेल्या सौ. प्रभावती जनार्दन घोगरे यांचा लोणी खुर्द ग्रामपंचायत व विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला.
या गौरव प्रसंगी संपूर्ण गावात अभिमान, आनंद आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
एक शेतकरी कन्या… संघर्षातून नेतृत्वाकडे यशस्वी वाटचाल करत राज्य पातळीवर पोहोचलेली सौ. प्रभावती घोगरे यांचा हा क्षण लोणी खुर्दसाठी अभिमानाचा ठरला.
सत्कार प्रसंगी ग्रामपंचायत उपसरपंच सौ. अर्चना आहेर, श्री. विलास घोगरे, सौ. ललिता आहेर, सौ. आशाताई आहेर, सौ. सुनीता कोरडे यांच्यासह ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यांनी सौ. प्रभावती घोगरे यांचा पुष्पगुच्छ, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.
तसेच, सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री. भास्करराव आहेर, उपाध्यक्ष मंगेश घोगरे, अशोक आहेर, आप्पासाहेब घोगरे (यात्रा कमिटी), बाळासाहेब आहेर, अमोल घोगरे, विनायक घोगरे, चांगदेव घोगरे, महेश आहेर, शंकर राऊत, अण्णा तुपे, पेटकर सर, दिलीप घोगरे, बाळासाहेब गाडगे तसेच इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते व त्यांनी उत्स्फूर्तपणे सौ. प्रभावती घोगरे यांचे अभिनंदन केले.
या प्रसंगी आपल्या मनोगतात सौ. प्रभावती घोगरे म्हणाल्या,
"हे पद मला मिळाले ते आपल्या सर्वांच्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळेच! शेतकरी, महिला, कामगार, वंचित घटकांचे प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रामाणिक आणि निष्ठेने कार्य करेन. आपल्या सर्वांच्या सहकार्याची मला अपेक्षा आहे."
लोणी खुर्द गावाच्या वतीने सौ. प्रभावती घोगरे यांना पुन्हा एकदा मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
"शक्ती, श्रद्धा आणि समाजकार्याच्या मार्गावर ठामपणे चालणाऱ्या आपल्या प्रभावतीताई घोगरे यांना पुढील वाटचालीसाठी अनंत शुभेच्छा!"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा