शनिवार, ७ जून, २०२५

काॅग्रेस नेते राहूल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशात जात असल्याने, देशातील राजकीय परीस्थीती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल - जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

काॅग्रेस नेते राहूल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशात  जात असल्याने, देशातील राजकीय परीस्थीती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल - जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील

लोणी - 
काॅग्रेस नेते राहूल गांधी यांचा सर्वाधिक वेळ परदेशात  जात असल्याने, देशातील राजकीय परीस्थीती समजून घ्यायला त्यांना वेळ लागेल असा टोला जलसंपदा मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला. निवडणुक प्रक्रीये विरोधातील त्यांची विधान म्हणजे मतदारांचा अपमान असल्याची प्रतिक्रीया माध्यमांशी बोलतांना त्यांनी व्यक्त केली.

काॅग्रेस नेते राहूल गांधी यांच्या विधानाचा समाचार घेताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,केवळ निवडणूक प्रक्रीयेला  बदनाम करण्याचा त्यांचा  प्रयत्न आहे. मागील दोन लोकसभा निवडणुकीत काॅगेस पक्ष जेमतेत चाळीस जागांपर्यत मजल मारू  शकला होता.यंदा चाळीसच्या शंभर झाल्या मग ते फिक्सिंग होत काॽ आंध्र आणि हिमाचल राज्यात तुमच्या पक्षाचे सरकार आले ते सुध्दा फिक्सिंगमुळे आले का या प्रश्नांची उतर सुध्दा राहूल गांधीनी दिली पाहीजेत.

निवडणूक प्रक्रीये विरोधात विधान करून राहूल गांधी स्वताची बदनामी करून घेत आहेत.लोकसभेची निवडणूक खोटे नॅरेटिव्ह पसरवून केली गेली.काही ठिकाणी त्याचा परीणाम पाहायला मिळाला.विधानसभा निवडणुकीची राजकीय परीस्थीती मात्र वेगळी होती.महायुतीला राज्यातील  मतदारांनी कौल दिला.मात्र  मतदारांचा सातत्याने अपमान करण्याचे काम राहूल गांधी यांच्याकडून होत आहे.त्यांनी देशात वेळ दिला तर, राजकीय परीस्थीतीची माहीती होईल.

उध्दव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत आणि खा.सुप्रिया सुळे यांनी राहूल गांधीच्या वक्तव्याच्या केलेल्या समर्थनाची  खिल्ली उडवून,विखे पाटील म्हणाले की,त्यांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणे योग्य ठरेल.खा.सुप्रिया सुळे यांना स्वताचे कोणतेच मत राहीलेले नाही.लोकसभेत मांडण्यात आलेल्या विधेयकाला ते  कधी पाठींबा देतात,कधी चर्चेच्या वेळी गैरहजर राहाता.त्यांचे पिताश्री मोदीचे कौतुक करतात याकडे  लक्ष वेधून त्यांनी खरच एकदा निर्णय घेतला पाहीजे की,आघाडीसोबत राहायचे की मोदींच्या बरोबर काम करायचे.त्यांच्या पक्षातील लोकांचा सुध्दा त्यांच्यावर विश्वास राहीलेला नाही.

उध्दव आणि राज ठाकरे यांच्या एकत्रित येण्याच्या मुद्द्यावर  भाष्य करताना मंत्री विखे म्हणाले की,महाराष्ट्रातील जनतेच्या मनात  फक्त महायुती आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही तेच चित्र पाहायला मिळेल,निवडणुका महायुती म्हणूनच आम्ही लढणार असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...