मंगळवार, ८ एप्रिल, २०२५

राहता तालुका शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन 10 एप्रिलला.

राहता तालुका शिक्षक संघाचे त्रैवार्षिक  अधिवेशन 10 एप्रिलला.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राहता उपशाखेचे त्रैवार्षिक अधिवेशन एकनाथ मंगल कार्यालय राहता येथे 10 एप्रिल 2025 रोजी सकाळी दहा वाजता शिक्षक संघाचे राज्य उपनेते रावसाहेब रोहोकले गुरुजी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे.
 सदर अधिवेशनात सकाळचे सत्रात शिक्षण परिषद, मान्यवरांचे शैक्षणिक धोरणावर चर्चासत्र ,तसेच शासन निर्णय व त्याची अंमलबजावणी, शिक्षकांच्या अडीअडचणीवर मार्गदर्शन , तसेच या शैक्षणिक वर्षात होणाऱ्या बदल्यांसंदर्भात शंकांना उत्तरे ,दुपारच्या सत्रात राहता तालुका शिक्षक संघ, संघ प्रणित मंडळ ,सांस्कृतिक मंडळ, युवा शिक्षक संघ ,महिला आघाडी ,मुख्याध्यापक संघ, केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक संघ, या कार्यकारिणी नूतन निवडी होणार आहेत.
 या अधिवेशनास प्रमुख उपस्थितीम्हणून राष्ट्रीय नेते बाळासाहेब झावरे, राष्ट्रीय अध्यक्ष आबासाहेब जगताप, राज्य संपर्कप्रमुख डॉक्टर संजय कळमकर ,राष्ट्रीय संघटक रावसाहेब सुंबे, राज्य नेते संजय शेळके ,राज्य सरचिटणीस केंद्रप्रमुख पदवीधर शिक्षक संघटना राम निकम ,शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण ठुबे, संघ प्रणित मंडळाचे जिल्हाध्यक्ष सुरेश निवडूंगे ,उच्च अधिकार समितीचे जिल्हाध्यक्ष राजकुमार साळवे , संपर्कप्रमुख बाळासाहेब सालके ,शिक्षक बँकेचे चेअरमन बाळासाहेब सरोदे ,शिक्षक बँकेचे व्हॉइसचेअरमन रमेश गोरे ,संघाचे कार्यकारी अध्यक्ष भास्कर नरसाळे ,केंद्रप्रमुख संघटनेचे अध्यक्ष सुनील नरसाळे, मुख्याध्यापक शिक्षक संघाचे अध्यक्ष संजय शिंदे ,युवा शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष शरद कोतकर, जिल्हा सरचिटणीस अमोल साळवे ,पदवीधर केंद्रप्रमुख शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष रघुनाथ झावरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष जयश्री झरेकर, उर्दू शिक्षक संघाचे अल्ताफ शहा , हारुण कुरेशी उपस्थित राहणार आहेत.
 या भव्य दिव्य अधिवेशनात शिक्षकांच्या अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे पंचप्राण श्री संभाजीराव तात्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक संघ करत आहे म्हणून राहता तालुक्यातील सर्व शिक्षक बंधू भगिनींनी मोठ्या संख्येने या अधिवेशनास उपस्थित राहावे, अशा प्रकारचे आवाहन राहता तालुक्यातील शिक्षक संघ प्रेमींनी केलेले आहे. अधिवेशन स्थळी सुरुची भोजनाची व्यवस्था केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार लेखक: डॉ. येलम कन्सल्टंट इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट Manomay ...