शिंगवे येथे स्व शंकरराव कोल्हे यांनाअभिवादन
शिंगवे वार्ताहर
संजिवनी उद्योग समूहाचे संस्थापक, माजी मंत्री स्व शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला
येथील ग्रामपंचायत कार्यालयात स्व शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात
आले
यावेळी भाजपा कार्यकर्ते राजेंद्र बाभुळके यांनी म्हटले की अभ्यासु, कर्तबगार साहेबांची उत्तुंग कार्य पद्धती, सेवा हाच धर्म या उक्तीप्रमाणे स्व शंकरराव कोल्हे यांनी रूम्हणं मोर्चा काढून महाराष्ट्रात तसेच या परिसरात शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले आहे हे आपल्याला ज्ञात आहे त्यांनी केलेलें कार्य आम्हा तरूण पिढीसाठी प्रेरणादायी आहे , तसेच आम्हाला यातून प्रेरणा मिळते, तालुक्यातील ठिकठिकाणी स्व शंकरराव कोल्हे यांच्या जयंतीनिमित्त प्रेरणा दिन म्हणून साजरा होत आहे
याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, भाजपा कार्यकर्ते रावसाहेब काळे, दत्तात्रय बाभुळके, मच्छिंद्र काळे, शिवाजी फाटे, सर्वोत्तम गायकवाड, रविंद्र चौधरी, राजाराम काळे, लक्ष्मण नरोडे, बाबासाहेब लासुरे, योगेश पगारे, चेतन काळवाघे, दिपक ठोंबरे, आदी मान्यवरांसह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा