रविवार, १६ मार्च, २०२५

शिंगवे येथे महाआरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

शिंगवे येथे महाआरोग्य शिबीर उत्साहात संपन्न 



शिंगवे 

राहाता तालुक्यातील शिंगवे येथे पी‌.एम.श्री. जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था व साईबाबा संस्थान रुग्णालय,  महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान महाआरोग्य शिबीर व खगोल शास्त्रीय प्रयोग शाळेचे उद्घाटन जिल्हा सहकारी बँकेच्या माजी संचालिका चैताली ताई काळे यांच्या शुभहस्ते करण्यात आले, यावेळी लेझीम नृत्य सादर करुन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले प्रथम मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून थोर महापुरुष यांना अभिवादन करण्यात आले याप्रसंगी डॉ संदिप देवरे, डॉ मुकुंद चौधरी, डॉ संजय खुराणा, डॉ अजिंक्य पानगव्हाणे, डॉ पुजा सिंग, डॉ अनंत भांगे, डॉ अजित पाटील , माजी उपसरपंच ज्ञानदेव चौधरी, बाळासाहेब बाभुळके ग्रामसेवक कतार नवरे , ग्रामपंचायत सदस्य राजाराम काळे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद चौधरी, मुख्याध्यापक कर्पे, आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते सौ. काळे यांनी आपल्या भाषणात म्हटले की ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मोफत उपचार मिळावा म्हणून महाशिबीर आयोजित करण्यात आलं आहे  तेव्हा पालकांनी आपल्या पाल्याला केस पेपर काढून तज्ज्ञ डाक्टरांकडून चेक करून घेतले पाहिजे विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले असेल तर पुढील काळात ते निरोगी राहतील डॉक्टर नेहमी रुग्णांची सेवा करतात रुग्ण सेवा हिच ईश्वर सेवा आहे आज आपल्या गावांमध्ये हृदयरोग तज्ज्ञ, न्यूरोसर्जन, आर्थो सर्जन, जनरल सर्जन, स्त्री रोग, तज्ञ बालरोग तज्ज्ञ, असे खूप खूप मोठें डॉक्टर आज उपस्थित आहेत हे तुमचे भाग्य आहे नाहीतर डॉक्टर वेळेला उपलब्ध नसतात  याचीही आठवण करून दिली तसेच आपल्या
 शाळेत खगोल शास्त्रीय 

या प्रयोग शाळेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करावा लागतो तेव्हा शिक्षकांनी साहित्यांची देखरेख ठेवली पाहिजे, तसेच
 विद्यार्थ्यांना त्यांचे ज्ञान प्राप्त झाले पाहिजे भविष्यात विद्यार्थ्यांना या प्रयोग शाळेचा फायदा होईल व उच्च पदावर जातील अशी अपेक्षा व्यक्त करतो आजकाल मुलांच्या अपेक्षा खूप महागडी झाले आहेतच यांत शंका नाहीं तेव्हां पालकांनी आपल्या पाल्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे यावेळी प्रमोद चौधरी, मुख्याध्यापक कर्पे यांनी प्रास्ताविक भाषणे झाली 
याप्रसंगी डॉ सोनवणे, आशा सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत सदस्य , कर्मचारी वर्ग, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य,शिक्षक ,शिक्षिका, जेष्ठ नागरिक, विद्यार्थी, पालक शैक्षणिक ,व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थांसह महीला मोठ्या संख्येने उपस्थित होते सुत्रसंचलन माने यांनी केले तर आभार भोसले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...