शनिवार, २९ मार्च, २०२५

स्व.शंकरराव कोल्हे यांना धनगरवाडी येथे अभिवादन

स्व.शंकरराव कोल्हे यांना धनगरवाडी येथे अभिवादन 

धनगरवाडी

संजीवनी उद्योग समूहाचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांची जयंती प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. 
राहाता तालुक्यातील धनगरवाडी येथे हनुमान मंदिराच्या सभा मंडपात स्व.शंकरराव कोल्हे यांच्या प्रतिमेचे पूजन करत पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रसंगी बोलताना धनगरवाडीचे माजी सरपंच व ज्येष्ठ नेते राजेंद्र नामदेव रक्टे म्हणाले, स्व. कोल्हे साहेब यांनी रुम्हन मोर्चा काढून महाराष्ट्रात तसेच या परिसरात शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. त्यांनी केलेले कार्य तुम्हा तरुण पिढीसाठी प्रेरणादायीक आहे.याप्रसंगी तंटामुक्तीचे अध्यक्ष अनिल परसराम रक्टे , तंटामुक्तीचे उपाध्यक्ष रामभाऊ रक्टे, ज्येष्ठ नेते रंगनाथ राशिनकर , दिगंबर रक्टे ,वाकडी सोसायटीचे संचालक सोपान आदमाने ,अशोक भिमराज रक्टे  इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...