भयमुक्त शिर्डीसाठी ग्रामसभेत सहभागी व्हा.
सोमवारी झालेल्या दुहेरी हत्याकांडातील दुर्दैवी मृत्यू झालेले साई संस्थांनचे कर्मचारी कै.नितीन कृष्णा शेजूळ व कै.सुभाष साहेबराव घोडे यांना भावपुर्ण श्रद्धांजली...
शिर्डी व पंचक्रोशीतील साईबाबा संस्थानमध्ये सेवेतील सर्व कायम, कंत्राटी,संस्थान सेवेतील महिला कर्मचारी,आऊटसोर्स कामगारांना विनंती करतो की शिर्डीतील सर्व सन्मानीय ग्रामस्थ व साई संस्थान कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन साईबाबांच्या पुण्यनगरीत अशा घटना घडु नये व शिर्डीची बदनामी होवु नये. शिर्डीतील नागरिक साईभक्त कामगार सुरक्षित राहिला पाहिजे यासाठी उपाययोजना करणेकामी ग्रामसभा आयोजित केली असून शिर्डी येथील ग्रामसभेतील निर्णय प्रक्रियेत सहभाग नोंदवावा व शिर्डीकरांची एकजूट दाखवावी
श्री साई संस्थान प्रशासन या कामगारांच्या कुटुंबातील वारसाला नियमानुसार अनुकंपा तत्त्वावर नोकरी देतील तसेच आर्थिक मदत देतील परंतु साईबाबा संस्थानातील कामगारांना नेहमीच वेगवेगळ्या रोषाला सामोरे जावे लागते कधी शिवीगाळ करणारे टवाळखोर तसेच कर्तव्य बजावत असताना येणार्या अडचणी,डयुटी संपल्यानंतर होणारी मारहाण यामुळे सुरक्षेचा विषय ऐरणीवर असतांना संस्थान कामगार भयमुक्त झाला पाहिजे. कामगारांची भुमिका मांडण्यासाठी आपणही शिर्डी व पंचक्रोशीत सुजाण नागरिक म्हणून उपस्थित रहावे व कामगारांना न्याय मिळवून देणे कामी सहकार्य करावे. हीच अपेक्षा..
ग्रामसभा ठिकाण -.नाट्यगृह व्दारकामाई समोर शिर्डी
दिनांक १० फेब्रुवारी २०२५
वेळ - सायंकाळी ५ वाजता
चेअरमन
श्री विठ्ठल पवार
( श्री साई संस्थान एम्प्लॉईज सोसायटी शिर्डी. )
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा