बुधवार, १ जानेवारी, २०२५

मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा हृद्य सत्कार

मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा हृद्य सत्कार



नव वर्षाच्या प्रारंभी राहाता नगरपालिकेमध्ये  राहाता शहरातील स्वछता व वृक्षारोपण याचं ज्यांनी काम अविरतपणे चालविले आहे अशा साईयोग फाउंडेशनच्या वतीने राहाता नगरपालिकेला राज्य शासनाचा दीड कोटीचा पुरस्कार मिळाल्याबद्दल सर्व सदस्यांच्या उपस्थितीत जेष्ठ पत्रकारांच्या हस्ते नगरपालिकेचे मुख्याधिकारी वैभव लोंढे यांचा सत्कार करण्यात आला.
सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे यांनी सर्वांचे स्वागत करत प्रस्तावना करून सूत्रसंचालन केले.
रामभाऊ लोंढे यांनी आपल्या मनोगतात स्वच्छ सुंदर नगरीं करण्यासाठी जे कर्मचारी काम करतात ते खरे गौरवास पात्र आहे.त्यांच्या मुळे गावाला गावपण आलेले आहे. हेच संस्कार आपल्या मुलात जपले तर ही स्वच्छतेची परंपरा कायम टिकेल.त्याच बरोबर अरुण मोकळ यांनी आपल्या मनोगतात सांगितले की 'स्वभाव स्वच्छता ,संस्कार स्वच्छता' हे ब्रीद घेऊन आपली नगरपालिका काम करते.सन्मा.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून लोकविकासाचा रथ अश्व गतीने पुढे चाललेला आहे.त्यास सर्व नागरिकांची साथ आपणास हवी असते.त्याचं बरोबर राहाता नगरीत अनेक उल्लेखनीय कामे करणारे व्यक्तिमत्व आहेत.त्यांचाही आदर्श आपण सर्वांनी घेतला पाहिजे.माजी सैनिक भानुदास गाडेकर यांनीही स्वच्छतेविषयी मार्गदर्शन केले.शेवटी डॉ बापूसाहेब पानगव्हाणे यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी जेष्ठ पत्रकार सतिश वैजापुरकर,दिलीप खरात,बाळासाहेब सोनवणे,दिलीप चोखर,ज्ञानेश्वर जोरे,किरण वाबळे,समीर बेग तसेच ॲड गोरख दंडवते,रवींद्र बोठे,संदीप डांगे,भाऊसाहेब बनकर,दीपक दंडवते,रवींद्र धस,राजू वायकर,व्यंकटेश अहिरे,पांडुरंगज् गायकवाड,नामदेव गवते,सुदेश गाडेकर,अनिल कुंभकर्ण,बाळासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार

गुन्हा त्याचा… पण संशयाच्या सावलीत तीच का? — जखमी मनावर समाजाच्या नजरेचे आणखी वार लेखक: डॉ. येलम कन्सल्टंट इंडस्ट्रियल सायकॉलॉजिस्ट Manomay ...