गुरुवार, १६ जानेवारी, २०२५

विश्वस्तरीय ऑनलाईन लेखनस्पर्धेत " ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक" चे 15 साहित्यिक विजेते घोषित

विश्वस्तरीय ऑनलाईन लेखनस्पर्धेत "  ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक" चे 15 साहित्यिक  विजेते घोषित
              अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेच्या वतीने चालवल्या जाणाऱ्या विश्वस्तरीय ऑनलाईन लेखन स्पर्धा 2025 मध्ये  " ग्रामसेवा संदेश दिवाळी अंक " साहित्यिक परिवारातील 15 साहित्यिक यांना   शेतमालाचे भाव या विषयावरील विविध प्रकारात क्रमांक मिळाले आहेत.
                एकूण साहित्याच्या 14 प्रकारात एकंदर 37 पुरस्कार विजेते घोषित झाले असून त्यात   ग्रामसेवा संदेश साहित्य परिवारातीलआहेत प्रथम क्रमांकाचे 7 साहित्यिक आहेत तर द्वितीय क्रमांकाचे 3 ,तृतीय क्रमांकाचे  3 तर चतुर्थ क्रमांकाचे  2 साहित्यिक आहेत.
                     प्रथम क्रमांक
1) श्री. राजेंद्र फंड   राहाता ( अहिल्या नगर)- कवितेचे रसग्रहण- शेतमालाचे भाव एक स्वप्न 
2) श्री. सुनील बावणे  चंद्रपूर - गझल - पुरेसा भाव द्या.
3) श्री. गंगाधर मुटे - छोटी आर्वी ( वर्धा ) - दुःखद अनुभव - पार्टी द्या कर्ज घ्या, कोंबडी द्या वसुली थांबवा.
4) श्री. रवींद्र दळवी , नाशिक - मागोवा - उद्योग तंत्रज्ञानातून चतुरंग शेतीस संजीवनी.
5) श्री. आदिनाथ ताकटे, राहुरी विद्यापीठ, - वैचारिक - बदल तर झालाच पाहिजे.
6) डॉ. दिग्विजय जाधव, मुंबई - प्रेरक लेख -  शेतमालाचा भाव एक शोधनिबंध. 
7) कुमारी वैष्णवी निर्मळ पिंपरी निर्मळ ( अहिल्यानगर )
सुखद अनुभव - पुढचे पाऊल.
                द्वितीय क्रमांक
1)  विशाल मोहोड अमरावती -  दुःखद अनुभव - लिलाव.
2) श्रीम. भारती सावंत मुंबई,-  मागोवा -  मिळेल का बळीला न्याय. 
3) श्री. विनायक अंगाइतकर - अमरावती -  प्रेरक लेख -  शेतमालाचे भाव.

             तृतीय क्रमांक
1) श्री.  खुशाल गुल्हाने अमरावती, - गीतरचना -   शेत माला नाही भाव.
2) श्री. दत्ता वालेकर , बीड - छंदोबध्द कविता -  हाल शेतकऱ्याचे.
3)  श्रीमती उज्वला ढमढेरे, पुणे - पद्य कविता - नको नको विकू राजा.

                    चतुर्थ क्रमांक
1)  श्री. नरेंद्र गंधारे  वर्धा - गेय  रचना -  भाव देत नाही... ती 
2) श्री. अंकुश शिंगाडे , नागपूर - वैचारिक लेख - शेतमालाला भाव द्या.
                    या स्पर्धेचे परीक्षण साही. रिता जाधव पोलिस उपनिरीक्षक मुंबई, प्राध्या. डॉ. संजय दवंगे कोपरगाव, डॉ. मनीषा रिठे वर्धा, श्री. इरफान शेख चंद्रपूर, श्री. शंकरराव घोरसे, नागपूर., लक्ष्मीकांत कोटकर, श्री. बिंधास्त किनगावकर लातूर, श्री. सुभाष बखरे वर्धा, श्री. संजय कावरे अकोला, रेखा जुगनाके, वर्धा , बालाजी मुंढे यांनी काम पाहिले.
                    विजेत्या साहित्यिकांचे, अखिल भारतीय मराठी शेतकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष श्री. गंगाधर मुटे, ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकचे  संपादक तथा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रीय जयंती उत्सव समिती  वंजारी समाज श्री. एकनाथराव ढाकणे,सहसंपादक तथा  विश्वस्तरीय ऑनलाईन  लेखनस्पर्धा 2024 चे स्पर्धाप्रमुख श्री. राजेंद्र फंड, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे अध्यक्ष श्री. राजेंद्र उदागे, सचिव श्री. सुनील गोसावी , लायन्स क्लब राहाता सह्याद्रीचे संस्था
पक श्री. विनोद गाडेकर यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...