शहापुरात गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न .
.
राहाता=
उत्कर्ष पत्रकार संघ व छावा ब्रिगेड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा शहापूर येथील आगरी समाज हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी छावा ब्रिगेडचे संस्थापक विश्वनाथ वाघ, प्रदेश महासचिव राहुल रेळे, स्टार महाराष्ट्र न्यूजचे संपादक अशोक घावटे, आजचा महाराष्ट्र न्यूजचे संपादक तथा माजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य कैलास जाधव, आरोग्य आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शांताराम गायकवाड, रमाबाई महिला ब्रिगेड संघटनेच्या ज्योती गायकवाड, सत्यकाम पवार, ज्येष्ठ पत्रकार अनिल घोडविंदे, स्वाती महाडिक पुणेकर, डॉ. राम यादव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशिनाथ तिवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान भूषविले. सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य सेवा, प्रशासकीय कार्यात त्याच बरोबर पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावनाऱ्या गुणवंतांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील तसेच शहापूरातील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.
छावा ब्रिगेड संघटनेच्या काही नियुक्ती करण्यात आल्या संभाजी निकम मराठवाडा अध्यक्ष सचिन रेवगडे सोशल मिडीया अध्यक्ष तथा संपर्क प्रमुख आहिल्यानगर शहाजी डांगे उत्तर मध्य मुंबई उपाध्यक्ष सुरेश वाळींबे जिल्हा सचिव ठाणे जिल्हा भगवान खाडे शहापुर तालुका सचिव निलेश पंडीत जिल्हा उपाध्यक्ष ठाणे जिल्हा यांना पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेंच्छा
कार्यक्रमादरम्यान गायन सम्राज्ञी म्हणून सन्मानित झालेल्या यांनी गायलेल्या छत्रपती शिवरायांचे गीत व माहुली किल्ले परिसरात दुर्लक्षित असलेले गायक कडवं यांनी स्व. सुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे पाऊले चालती पंढरीची वाट या अभंगाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. उत्कर्ष पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर पाटोळे, सचिव अविनाश कापडणे, खजिनदार सुरेश वाळिंबे, महिला कार्याध्यक्षा रंजिताताई दुपारे, उपाध्यक्ष सुनिल आगिवले, सदस्य योगेश चव्हाण, सदस्य रवींद्र सोमवते, रुपेश जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा