शनिवार, १० ऑगस्ट, २०२४

जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर यशाच्या शिखरावर पोहोचता येते - प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ ममता पिपाडा


जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर यशाच्या शिखरावर पोहोचता येते -
  प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ ममता पिपाडा 

 राहाता=
        जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर यशाच्या शिखरावर पोहोचता येते अशी प्रतिक्रिया  प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ ममता पिपाडा यांनी नुकत्याच पोलिस उपनिरिक्षक झालेल्या कु.सोनाली काटकर व कु.ललिता सातव यांच्या सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने व्यक्त केली.
  संपूर्ण राहाता तालुक्याची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी एकरूखे येथील सुपुत्री कु.ललित विजय सातव तसेच शिर्डी येथील सुपुत्री कु.सोनाली किसन काटकर यांनी महाराष्ट्र पोलिस दलात पोलिस उपनिरीक्षक या पदावर वर्णी लावली आहे. या मुलींचा सन्मान राहाता नगरपरिषदेच्या प्रथम लोकनियुक्त नगरध्यक्षा सौ ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केला व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पांडुरंग धुमसे, बाबासाहेब काटकर, संदीप काटकर, शंकर सातव, धोंडीराम सातव व त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते. 
सर्वसामान्य कुटुंबातून शिक्षण घेऊन स्पर्धापरीक्षेच्या युगात स्वतचे एक स्थान निर्माण करणे हे मोठे संघर्षाचे काम आहे. परंतु कु. सोनाली व कु. ललिता यांनी अथक परिश्रम घेऊन अचूक ध्येय गाठले. आजच्या या स्पर्धेच्या युगामध्ये मुली या नेहमी अव्वल ठरलेल्या आहेत.  जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर यशाच्या शिखरावर पोहोचता येते हे या मुलींनी दाखवून दिले. जिल्हा परिषदेच्या शाळेत आपले माध्यमिक शिक्षण पूर्ण करून पुढे चालून आपल्याला पीएसआय व्हायचे ही खूणगाठ बांधून त्या दृष्टीने योग्य मार्गदर्शन घेऊन अभ्यास केला व आपले स्वप्न पूर्ण केले. या निमित्ताने प्रथम लोकनियुक्त नगरध्यक्षा सौ. ममता पिपाडा व डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी शुभेच्छा म्हणून कौतुकाची थाप दिली. ममता पिपाडा आपली प्रतिक्रिया देत म्हणाल्या की, सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येणाऱ्या मुलींनी असेच स्पर्धा परीक्षेत सहभागी होऊन, मोठी पदे सर करून आपल्या कुटुंबाचे व गावाचे नाव उज्ज्वल करावे. 

    कु.ललिता सातव व सोनाली काटकर या दोन्ही मुलींनी राहाता तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. महाराष्ट्र पोलिस दलात वरिष्ठ पदावर नैपुण्य मिळवले ही खरोखरिस भूषणावह बाब आहे. यादोघींच्या यशामध्ये त्यांच्या कुटुंबाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांना पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा अशी प्रतिक्रिया डॉ राजेंद्र पिपाडा यांनी दिली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...