राहाता (प्रतिनिधी )-
खरीप हंगामातील पिके जळाल्याने महसूल विभागामार्फत पंचनामे केले गेले. पीक विम्यातील 25 टक्के रक्कम दिली. पण उर्वरित रक्कम मिळावी म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विविध मार्गानी लढा उभारला. सरकारने अखेर उर्वरित रक्कम देण्याचे जाहीर केले. एका अर्थाने संघटनेने शेतकऱ्यांसाठी उभारलेल्या या लढ्याला यश आले आहे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके यांनी दिली.
मागील वर्षी खरीप हंगामात सोयाबीन मका बाजरी कापूस फळबागा पावसाळ्यात कमी पाऊस झाल्याने शेतीतील संपूर्ण पिके जळाली महसूल विभागाने सदर पिके यांचे पंचनामे प्रस्ताव शासकीय स्तरावर पाठवले परंतु विमा कंपनी यांनी २५ टक्केवारी अग्रीम विमा रक्कम शेतकरी बंधू यांना देण्यात आली व राहीलेली ७५ टक्के नंतर देऊ परंतु देण्यास टाळाटाळ करत असल्याचे समजले स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सतत पाठपुरावा तहसीलदार जिल्हा अधिकारी विमा कंपनी कृषी अधिकारी याच्या कडे निवेदने देऊन आंदोलन केले उशिरा का होईना आर्थिक अडचणीत शेतकरी बंधू असल्याने थोडा फार दिलासा मिळणार आहे, असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठलराव शेळके पाटील यांनी सांगितले.
पीक कापणी प्रयोग आधारित एकुण ११२९.३७ कोटी रुपये इतकी नुकसान भरपाई मंजुर झालेली असून, ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याचे सर्व अडथळे आता दुर झाले आहेत.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना उपलब्ध होणाऱ्या विमा रक्कमेचे अकोले तालुका ४७.३६७ कोटी, संगमनेर १२८.९८ कोटी, राहाता १२१.२२ कोटी, श्रीरामपूर ६९.५६ कोटी, नेवासा ८७.९४ कोटी, कोपरगाव ७९.५९ कोटी, राहुली १०३.३५ कोटी, पाथर्डी ७५.६४ कोटी, पारनेर १२३.०१ कोटी, नगर ६५.५३ कोटी, शेवगाव ९.७७ कोटी, श्रीगोंदा ४८.७८ कोटी, कर्जत ९३.८५ कोटी, जामखेड ७४.५१ कोटी रुपये इतकी भरपाई मंजुर झाली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा