शिर्डी प्रतिनिधी :
शिर्डी:-शिर्डी येथे विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर व आदिवासी जन आंदोलन समन्वय महाराष्ट्र समिती व यांच्या आयोजनाने आदिवासींच्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक व्यावसायिक विषयावर महत्वाची बैठक घेण्यात आली. भिल्ल समाजाचे मुलभुत प्रश्न अनेक वर्षापासून रखडले असताना देखील सुद्धा कोणतेही सरकार आदिवासींची बाजु मांडण्यास तयार नाही . भिल्ल समाजाच्या विकासासाठी लवकर राज्याचे मुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे.पुढील काळात कोणत्याही राजकीय पक्ष असतिल त्यांनी जर आदिवासी समाजाला विस्वासात घेतले नाही तर आदिवासी जन आंदोलन महाराष्ट्र भर केले जाईल. या बैठकीचे अध्यक्ष:-श्री.शंकर बर्डे ,मा.नगरसेवक श्री.किरण भाऊ बर्डे ,विर एकलव्य प्रतिष्ठाण शिर्डी शहर अध्यक्ष:-श्री विजय पवार ,राजेंद्र बर्डे,आदिवासी जन आंदोलन समिती महाराष्ट्र कैलास दादा माळी साहेब,अशोक माळी साहेब, कृष्णाजी सोलेसर, सतिषभाऊ पवार, राजु माळी, मच्छिंद्र मोरे,अनिल सोनवणे ,सोन्याबापू गायकवाड, सुनिल आलोट ,नगरसेवक सूरेश आरणे, गेनुतात्या माळी बाळासाहेब सोनवणे आदिसह राज्यातील प्रमुख सामाजिक संघटना व कार्यकर्ते हजर होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा