बुधवार, १० जुलै, २०२४

नवीन शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी एम कॉम सुरू करावे - प्रसिद्धी प्रमुख तुषार महाजन

नवीन शैक्षणिक संकुल विद्यार्थ्यांसाठी एम कॉम सुरू करावे - प्रसिद्धी प्रमुख तुषार महाजन
श्री साईबाबा महाविद्यालय येथे पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू करावे यासाठी कार्यकारी अधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी

नगर प्रतिनिधी :
         आज श्री साईबाबा संस्‍थान निर्मित नवीन शैक्षणिक संकुलात श्री साईबाबा वरिष्‍ठ महाविद्यालय येथे विद्यार्थ्यांसाठी पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू करावी यासाठी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर सर व प्राचार्य संतोष औताडे सर यांना भारतीय जनता युवा मोर्चा प्रसिद्धप्रमुख तुषार संजय महाजन यांच्या वतीने निवेदन देण्यात आले. याप्रसंगी त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर पोस्ट ग्रॅज्युएशन (एम कॉम) सुरू करण्यात येईल असे सांगितले. 
        कारण विद्यार्थ्यांना पोस्ट ग्रॅज्युएशन करण्यासाठी लांब जावे लागते व त्यांचे धावपळ होते. श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍थेच्‍या माध्‍यमातून शिर्डी व परिसरातील गरीब विद्यार्थ्‍यांना अल्‍पदरात शिक्षण दिले जाते. या विद्यार्थ्‍यांना उच्‍च प्रतीचे शिक्षण देणेच्‍या उद्देशाने संस्‍थानने नवीन शैक्षणिक संकुलाची निर्मिती केल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त करून दाखवला आहे. तरी विद्यार्थ्यांचे गैरसोय होऊ नये म्हणून लवकरात लवकर एम कॉम सुरू करण्यात यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
        भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष योगेश गोंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली निवेदन देण्यात आले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तरनगर जिल्हा प्रसिद्धप्रमुख तुषार महाजन, रितेश भोसले, आकाश आडंगळे, विशाल बेलदार, सागर जेजुरकर, संदीप थोरात, शुभम भोर, आदित्य वाणी, प्रफुल्ल खपके, नरेश पवार, प्रणव कंक्राले, संकेत जोशी, प्रवीण मेचे, प्रेम त्रिभुवन, दर्शन जाधव आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन

डॉ. सुजय विखे पाटील यांचा जनता दरबार गाजला; तक्रारींवर तात्काळ कारवाईचे आश्वासन   राहाता  भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे प...