शारदा संकुलाने सुसंस्कृत विद्यार्थी घडविले
राहाता=
राहता - येथील सामाजिक कार्यकर्ते रामनाथ भाऊसाहेब सदाफळ यांनी वयाच्या ४० व्या वर्षी नुकतेच बी. ए. एल. एल. बी यशस्वी उत्तीर्ण झालेने तसेच शारदा संकुलातील विद्यार्थीनी आकाशवाणी वर उत्कृष्ट गायन सादर केलेने बाल कलाकारांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी चेअरमन रमेश जी शिंदे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका विद्या ब्राह्मणे पत्रकार नवनाथ सदाफळ नाद ब्रम्ह वारकरी संस्थेचे संतोष महाराज दीक्षित हे यावेळी रामनाथ सदाफळ म्हणाले की शाळा ही जिवनात सुंदर अशी जागा आहे शाळा आपल्या ला जिवनाचा मार्ग दाखविते. शाळा आपल्यात एकीची भावना निर्माण करते. म्हणुन माझेवर शालेचे अनंत उपकार आहेत. मला मिळालेले यश हे शालेचे यश आहे. यावेळी शारदा शैक्षणिक संकुल हे सुसंस्कृत विद्यार्थी घडविणारे संस्था असुन अनेक विद्यार्थी जिवनात यशस्वी झालेले आहे. विद्यार्थी हे शालेला कधीही विसरत नाही तसे संस्कार आम्ही घडवित आहोत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. राजेंद्र पठारे यांनी केले प्रास्ताविक रमेश आहेर आभार शरद गमे यांनी केले. याप्रसंगी उप प्राचार्य अशोक बोरसे जेष्ठ शिक्षक विजय जेजुरकर राजकुमार सालवे हे उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा