मंगळवार, ९ जुलै, २०२४

संत सावता माळी एकता मंडळाने 15 पैकी 13 जागा जिंकत सावता माळी ट्रस्ट मध्ये एकहाती सत्ता मिळवली

संत सावता माळी एकता मंडळाने 15 पैकी 13 जागा जिंकत सावता माळी ट्रस्ट मध्ये एकहाती सत्ता मिळवली

राहाता =
येथील संत सावता माळी पंच कमिटीच्या विश्वस्त मंडळ निवडीसाठी झालेल्या निवडणुकीत संत सावता एकता मंडळाने १५ पैकी १३ जागा जिंकत सावता माळी ट्रस्ट मध्ये एकहाती सत्ता मिळवली तर त्यांच्या प्रतिस्पर्धी असलेल्या स्वाभिमानी पॅनलला केवळ दोन जागा मिळाल्या आहेत.  
     राहाता येथील संत सावता माळी पंच कमिटीच्या विश्वस्त मंडळ निवड प्रक्रियेसाठी रविवारी ७ जूलै रोजी संत सावता माळी मंगल कार्यालय येथे मतदान झाले. १५ जागेसाठी श्री संत सावता एकता पॅनल कडून १५ तर स्वाभिमानी पॅनल कडून १५ असे एकूण ३० व्यक्तींनी यात उमेदवारी अर्ज दाखल केले होते त्यात २८ पुरुष व २ महिलांनी या निवडणुकीत सहभाग घेतला . संत सावता माळी ट्रस्टची सन १९५३ ची स्थापना आहे.. . रविवारी संत सावता माळी मंगल कार्यालयात मतदान प्रक्रिया अत्यंत शांतपणे पार पडली.एकुण ५८३ सभासदांपैकी ५४८ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला. मतदान झाल्यानंतर लगेचच मतमोजणी प्रक्रिया संपन्न झाली . या निवडणूकीत नवीन विश्वस्त म्हणून निवडून आलेले विश्वस्त आहेत संदीप तुकाराम गाडेकर, सौ .शालिनी सुरेश जेजुरकर, मच्छिंद्र गंगाधर निधाने, मच्छिंद्र नामदेव बनकर, सचिन गोरख बनकर, दौलत खंडू घोडेकर, आप्पासाहेब तुळशीराम मेहेत्रे, प्रशांत विलास टिळेकर, संदीप रावसाहेब भुजबळ, सौ. अनिता रमेश आनप, भिवसेन नामदेव गाडेकर, राधाकिसन सोपान भुजबळ, प्रदीप भागवत बनकर, विशाल भागुनाथ गाडेकर, अशोक वामन गाडेकर, या १५ उमेदवारांनी या निवडणुकीत विजय संपादन केला. त्यांच्या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे . निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड बाबासाहेब बागडे यांनी कामकाज पाहिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

डॉ. संजय दिघे यांनी पशु वैद्यकीय सेवेत मुक्या प्राण्यांवर माया बरोबरच माणसं जोडली-डॉ.दशरथ दिघे

पानेगांव   राज्य शासनाच्या पशुवैद्यकीय सेवेत ३३ वर्ष अविरत सेवेत मुक्या प्राण्यांवर माया त्याच बरोबर गोड मितभाषी स्वभावतुन माणसं...