पिंपळनेर प्रतिनिधी :
ग्रामीण रुग्णालयातील पिंपळनेर व परिसरात आपत्कालीन 108 रुग्णवायकेवर वैद्यकीय अधिकारी नसल्याने रुग्णांचे हाल होत असुन पी व्ही जी कंपनीच्या मनमानी कारभारामुळे रुग्णांना हाल सहन करावे लागत आहे सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने पिंपळनेर व परिसरात नेहमी काही ना काही घटना असतात यामुळे रुग्णवाहिकेवर कायम स्वरूपी वैद्यकीय अधिकारी असणेेचे गरजेचे आहे यात आपत्कालीन वैद्यकीय सेवा अतिशय महत्त्वाचे आहे परंतु 108 रुग्णवाहिकेवर वैद्यकीय अधिकारीच नसल्याने रुग्णांना सेवा मिळत नाही या कामी वरिष्ठांनी लक्ष घालून जनतेच्या मागणीचा त्वरित विचार करून पिंपळनेर परिसरातील जनतेचा सहनशीलतेचा अंत पाहू नये यात पी व्ही जीं कंपनीने त्वरित लक्ष घालून वैद्यकीय अधिकारी 108 रुग्णवाहिकेवर नेमणूक करावी पिंपळनेर व परिसरातील जनतेची हाल अपेक्षा होणार नाही यासाठी वरिष्ठांनी लक्ष घालावे.तसेच 108 चे जिल्हा व्यवस्थापक व उपव्यवस्थापक यांनी वरील मागणी चा त्वरित विचार करावा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा