भारतीय जनता पार्टी पिंपळनेर मंडलाची बैठक संपन्न
पिंपळनेर :
भारतीय जनता पार्टी पिंपळनेर मंडलाची बैठक आज दि.०७-०७-२०२४.रविवार रोजी दुपारी २-०० वाजता स्वामी विवेकानंद सार्वजनिक वाचनालय पिंपळनेर येथे साक्री विधानसभा प्रमुख मा.रावसाहेब श्री.मोहन सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष मा.श्री.प्रदिपआबा कोठावदे, नंदुरबार लोकसभा विस्तारक मा.श्री.रावजीभाऊ चौरे,
भाजपा जिल्हा सरचिटणीस मा.श्री.शैलेंद्रभाऊ आजगे,मा.रावसाहेब श्री.के.टी.सुर्यवंशी साहेब, मा.आण्णासाहेब श्री.साहेबराव गांगुर्डे, मा.श्री.प्रमोदभैय्या गांगुर्डे,मा.सौ.लिलाताई सुर्यवंशी, मा.सौ.सुवर्णाताई आजगे,मा.श्री.मोतीलालजी पोतदार,मा.श्री.देवेंद्रभाऊ कोठावदे,पिंपळनेर मंडल अध्यक्ष मा.श्री.विक्कीदादा कोकणी,भाजयुवा मोर्चा पिंपळनेर मंडल अध्यक्ष.मा. श्री.पंकजदादा भावसार, इ. मान्यवर व पिंपळनेर मंडलाचे उपाध्यक्ष, सरचिटणीस,व पदाधिकारी, पिंपळनेर शहर उपाध्यक्ष,सरचिटणीस,प्रसिद्धी प्रमुख व सर्व मोर्चा वआघाड्यांचे अध्यक्ष व पदाधिकारी ,युवा मोर्चा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले.य़ावेळी काही ठराव करुन उपस्थितांनी ठरावांना एकमुखी पाठिंबा देऊन मान्यता दिली. सुत्र संचालन पिंपळनेर शहर अध्यक्ष डॉ. राजेंद्र पगारे यांनी केले व शेवटी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त करुन बैठक संपली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा