सोमवार, ८ जुलै, २०२४

राहाता लायन्स क्लबच्या इंस्टॉलेशन व इंडकशन सेरेमनी सिद्धसंकलप लॉन्स साकुरी येथे मोठ्या दिमाखात साजरा

राहाता लायन्स क्लबच्या इंस्टॉलेशन व इंडकशन सेरेमनी सिद्धसंकलप लॉन्स साकुरी येथे मोठ्या दिमाखात साजरा

राहता=
राहाता लायन्स क्लबच्या इंस्टॉलेशन व इंडकशन सेरेमनी सिद्धसंकलप लॉन्स साकुरी येथे मोठ्या दिमाखात साजरा झाला 
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी लायन गीरीशजी मालपाणी डायरेक्टर मालपाणी ग्रुप संगमनेर हे इंस्टॉलेशन ऑफिसर म्हणून लाभले त्यांच्या शुभहस्ते राहता क्लब चे इंस्टालेशन करण्यात आले ,
 मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, त्याच बरोबर इंडक्शन ऑफिसर ला. सुधीरजी डागा यांनी क्लबचे नवीन सदस्य यांना आपले् कर्तव्य व जबाबदारी याची जाणीव करून दिली 
या प्रसंगी सामाजिक संघटना व सामजिक कार्यकर्ते यांचा सन्मान करण्यात आला, त्याचबरोबर प्रकाश सदाफल यांची निवड  करण्यात आले. सिद्धसंकलप लॉन्स चे प्रमुख श्री.दिलीपभाऊ रोहम, समस्त माळी पंच कमिटी चे प्रमुख पदाधिकारी श्री मच्छिंद्र बनकर,श्री.बाबासाहेब गाडेकर यांचा व ,डॉ बापूसाहेब पांनगव्हणे , भानुदास गाडेकर , दशरथ भाऊ तुपे यांनी केलेल्या सामाजिक कामाबद्दल या सर्वांचा लायन्स क्लब मार्फत विशेष सन्मान करण्यात आला 
झोन चे झोन चेअरपर्सन लायन आशिष बोरावके यांनी डिस्ट्रिक्ट कडून आलेल्या सुचना व त्याचे अनुकरण करून काम करावे ,तसेच सभासद जास्तीजास्त करणेबाबत मार्गदर्शन केले.
लायन गिरीष भाऊ व लायन सुधीरजी डागा यांनी क्लब ने मागील वर्षी केलेल्या कामाचे कौतुक करून ,एक उत्तम प्रकारे सेवा देत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले,या पुढे कुठली ही अडचण आली की आम्हाला फोन करा नेहमीच क्लब ला मदत करू असे आश्वासन दिले मागील वर्षी जास्तीजास्त ॲक्टिव्हिटी , समाजकार्य केले म्हणून प्रेसिडेंट अंजली उबाळे यांचा मानाची पिन देवून गौरव करण्यात आला
तसेच नवीन नियुक्त प्रेसिडेंट प्रकाश सदाफळ यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छ देवून मानाची पिन देवून सन्मानित करण्यात आले. डॉ.संजय उबाळे यांनी कॅन्सर व आरोग्य विषयक उत्तम काम करून डिस्ट्रिक्ट मध्ये नाव केले .असे गिरीश मालपाणी म्हणाले
या कार्यक्रमासाठी झोन चेअरमन लायन सुमित बट्टड,लायन एकनाथ गोंदकर,लायन संदीप गोंदकर,लायन बाबा खुबानी,लायन सुनील साठे, लायन प्रवीण गुलाटी,डॉ. बापुसाहेब पानगव्हाणे, दशरथ तुपे,किरण वाबळे, उपस्थित होते 
लायन्स क्लब चे नवीन प्रेसिडेंट प्रकाश सदाफळ, सेक्रेटरी लायन ऍड.दिनेश कारले. ट्रेजरेर लायन व्यंकटेश आहिरे, उपाध्यक्ष लायन डॉ.संजय गायकवाड लायन राजेंद्र बांगर लायन सचिन मुरादे,लायन गोरखभाऊ दंडवते ,अध्यक्ष प्रकाश सदाफल , डॉ संजय उबाळे, लायन  रतन चौधरी,लायन विजय धनवटे,लायन दिपक दंडवते,लायन डॉ .शर्वरी कुलकर्णी लायन सरला तायडे, लायन ऍड.संतोष घोडके, लायन श्वेता कारले ,लायन आसावरी बेंद्रे,लायन लता जाधव डॉ.मानली उबाळे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले ,पत्रकार ज्ञानेश्वर जोरे 
ॲड.विकास सदाफळ , डॉ.अनिल काळे 
साईयोग फाऊंडेशन चे दिलीप सातव, गाडेकर बाळासाहेब, बबलू फतांगरे,रवींद्र धस,संजय वाघमारे हे उपस्थित होते आभार लायन दीपक दंडवते यांनी आभार मानले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी

शिर्डीत आयुर्वेद महाशिबिर यशस्वी शिर्डी :  श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था यांच्या वतीने श्री साईनाथ रुग्णालय येथे दि. 21...