नाशिक जिल्हा प्रतिनिधीपदी देवरे सर
शिर्डी प्रतिनिधी : (संजय महाजन)
महाराष्ट्र राज्य टंकलेखन, लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटनेच्या सन 2024 ते 2029 पंचवार्षिक निवडणुकीत नाशिक जिल्ह्यात जिल्हा प्रतिनिधीसाठीच्या निवडणुकीत श्री. सुरेश केशवराव देवरे सर यांनी बहुमतांनी विजय मिळविला. रविवारी झालेल्या निवडणुकीसाठी दोन उमेदवार रिंगणात उभे होते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संस्था संघटनेची निवडणूक पाच वर्षात होते. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातून जिल्हा प्रतिनिधी निवडला जातो आणि सर्व 36 जिल्ह्यांतील प्रतिनिधीतून राज्यपातळीवर अध्यक्ष ठरवला जातो. नाशिक जिल्ह्यात जिल्हा प्रतिनिधीसाठीच्या निवडणुकीत श्री. सुरेश देवरे, श्री. सुभाष बागड, असे दोन उमेदवार रिंगणात होते. 165 मतदारांपैकी 124 मतदारांनी मतदान केले. यात श्री. सुरेश देवरे यांना सर्वाधिक 74 मते पडली.
श्री. सुभाष बागड यांना 47 मते पडली. आणि 3 मते ही अवैध ठरविण्यात आली. नाशिक येथील शासकीय कन्या विद्यालय, जिल्हा कोर्टासमोर, नाशिक मध्ये प्रतिनिधी निवडण्यासाठी सकाळी 10 ते सायंकाळी 04 वाजेपर्यंत मतदान घेण्यात आले. सायंकाळी निकाल जाहीर करण्यात आला. जिल्ह्यात सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून श्री. संतोष झंझाड, श्री. समीर म्हात्रे यांची नियुक्ती करण्यात आली होती. राज्यातील काही जिल्ह्यातील निवडणूक बिनविरोध झाली. नाशिकसह 16 जिल्ह्यात रविवारी निवडणूक घेण्यात आली, असे सूत्रांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा