बुधवार, २९ मे, २०२४

श्री . ग. र . औताडे पाटील विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम


श्री . ग. र . औताडे पाटील विद्यालयाची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम

पोहेगाव :- 
येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री श्री . ग. र . औताडे पाटील विद्यालयाने नुकत्याच जाहीर झालेल्या मार्च २०२४ च्या माध्यमिक शालांत परीक्षेत आपली उत्कृष्ट निकालाची परंपरा या वर्षी देखील कायम ठेवली आहे. माध्यमिक शालांत परीक्षा मार्च २०२४ साठी विद्यालयातील एकूण १७७ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते त्यापैकी ५३ विद्यार्थी विशेष प्राविण्यासह उत्तीर्ण झाले आहेत तर प्रथम श्रेणी मध्ये ७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून द्वितीय श्रेणी मध्ये ३२ विद्यार्थी व पास श्रेणी मध्ये १३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 
         विद्यालयातील कु. सायली अजित पाचोरे व श्रुतिका अनिल गवळी यांनी ९४.०० % गुण प्राप्त करून विद्यालयात संयुक्तपणे प्रथम क्रमांकाचा मान पटकावला आहे तर द्वितीय क्रमांक कु. श्रेया नानासाहेब औताडे हिस ९१.४० % व तृतीय क्रमांक थोरात सार्थक विठ्ठल, कु. सदाफळ श्वेता अमोल आणि कु.घोरपडे प्रणाली रमेश या तीन विद्यार्थ्यांनी ९१.०० % गुण प्राप्त करून संयुक्तपणे तृतीय क्रमांक पटकावला आहे. पुणे बोर्डाचा निकाल ९६.४४ % तर श्री ग. र . औताडे पाटील विद्यालयाचा निकाल ९७.१७%असून पोहेगाव  पंचक्रोशीतील इतर विद्यालयांपेक्षा श्री ग. र . औताडे पाटील विद्यालयाची निकालाची टक्केवारी व विद्यार्थ्यांनी प्राप्त केलेले भरघोस यश यामुळे आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी रयत शिक्षण संस्थेच्या श्री ग. र . औताडे पाटील विद्यालयात प्रवेश घ्यावा असे आवाहन देखील विद्यालयाचे प्राचार्य श्री संजय शिंदे, शालेय स्कूल कमिटीचे चेअरमन , सदस्य, यांनी केले आहे.
विद्यालयाच्या या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी , मुख्याध्यापक , सर्व शिक्षक यांचे , विभागीय अध्यक्ष आशुतोष दादा काळे,  विभागीय अधिकारी श्री. नवनाथ बोडखे, सहाय्यक विभागीय अधिकारी श्री.प्रमोद तोरणे, श्री. बाबासाहेब नाईक वाडी, स्कूल कमिटी , स्थानिक सल्लागार समिती, शाळा व्यवस्थापन समिती, पालक शिक्षक संघ , सर्व पालक, सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरवशब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय

महिला सामाजिक कार्यकर्ती व साहित्यिकांचा होणार विशेष गौरव शब्दगंध च्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय अहिल्यानगर  शब्दगंध साहित्यिक ...