शिर्डीत राष्ट्रसंत गाडगेबाबा साहित्य संमेलनाचा रंगलेला हा प्रेरणादायी सोहळा; राजेंद्र फंड.
शिर्डी
: राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त आयोजित 28 व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनात संमेलनाध्यक्ष राजेंद्र फंड यांनी आपल्या ओजस्वी आणि प्रेरणादायी भाषणातून समाजप्रबोधनाचा संदेश दिला. 26 एप्रिल 2026 रोजी शिर्डी येथील हॉटेल जे. के. पॅलेस येथे हा एकदिवसीय सोहळा उत्साहात पार पडला.
संमेलनाध्यक्ष राजेंद्र फंड यांनी आपल्या समारोपीय भाषणात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या जीवनकार्याचा सखोल आढावा घेत त्यांच्या "दशसूत्री जीवनमार्गदर्शन" या विचारसरणीचे महत्त्व अधोरेखित केले. साधेपणा, स्वच्छता, सेवा, सत्य आणि समाजोपकार ही मूल्ये आजच्या समाजासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
गाडगेबाबांनी शिक्षण, स्वच्छता, समाजसेवा आणि अंधश्रद्धा निर्मूलनासाठी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे सांगताना त्यांनी गरीब, अनाथ आणि वंचित घटकांसाठी केलेल्या त्यांच्या कार्याची विशेष दखल घेतली. “देव दगडात नाही, तो माणसात आहे” आणि “गाव स्वच्छ ठेवा, मन स्वच्छ ठेवा” या त्यांच्या संदेशांचा उल्लेख करत त्यांनी उपस्थितांना हे विचार आचरणात आणण्याचे आवाहन केले.
या संमेलनात डेबूजी प्रतिष्ठाणच्या वतीने राष्ट्रीय डेबूजी संत गाडगेबाबा पुरस्काराचे वितरण भारतीय धोबी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री एकनाथराव बोरसे व सहा भारतीय पेटंटचे मानकरी तथा संदीप विद्यापीठाचे माजी कुलसचिव डॉ. प्रसाद बाविस्कर , 28 व्या राष्ट्रसंत गाडगेबाबा मराठी साहित्य संमेलनाचे संमेलनाध्यक्ष साही. राजेंद्र फंड,व ग्रामसेवा संदेश दिवाळी अंकाचे संपादक डॉ. एकनाथराव ढाकणे यांचे हस्ते डॉ. पांडुरंग गुंजाळ, श्री. एकनाथराव बोरसे, श्री. गणेश दळवी, डॉ. मोहन गायकवाड, राष्ट्रीय भारुडकर हमीद सय्यद, चित्रकार रवी भागवत, श्री. अनिल हुपरीकर, श्री. मनोज म्हस्के, राष्ट्रीय कीर्तनकार खंडोजी गायकवाड यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला. याशिवाय डॉ. प्रसाद बाविस्कर, सुषमा अमृतकर, रजनी लुंगसे, डॉ. एकनाथराव ढाकणे, विलास रोकडे, राजेंद्र देसाई,व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करण्यात आले. साहित्य, समाजसेवा, शिक्षण, उद्योग आणि कला क्षेत्रातील पुरस्कारांद्वारे गाडगेबाबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेष म्हणजे, सन्मानार्थींना समर्पित टपाल तिकीटाचे अनावरणही करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या कार्याची नोंद समाजाच्या स्मरणात राहील.
राजेंद्र फंड यांच्या "जीवनदीप गाडगेबाबांचा" या कवितासंग्रहासह इतर आठ कवितासंग्रहाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संमेलनातून राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारांची नव्याने उजळणी झाली असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रेरणा मिळाली, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
संमेलन यशस्वी करण्यासाठी आयोजक श्री. सुनील निकम, कवी सरकार, सुधाकर वाघ, अनिल देसाई, विलास रोकडे, रोहित रोकडे, सौ . राजश्री फंड यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा