कविता ही केवळ शब्दांची रचना नसून ती माती आणि माणसांच्या जगण्याची साक्ष असते : राजेंद्र फंड
कविता ही केवळ शब्दांची रचना नसून ती काळ, माती आणि माणसांच्या जगण्याची साक्ष असते. कवी सरकार यांचा " पैंजणाचा नाद प्रस्तुत कविता-संग्रह हा अशाच साक्षीभावातून जन्माला आलेला आहे.असे प्रतिपादन कोल्हापूर येथील 26 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या कवी सरकार यांच्या पैंजणाचा नाद,मनास झोंबतो गारवा,कवी प्रकाश भोंगाळे यांच्या अपूर्वाई व कवयत्री निशा खरात/ शिंदे यांच्या मी भावनेला शब्द दिले या चार कवितासंग्रह व 26 वे मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या विशेषांक प्रकाशन प्रसंगी साहित्यिक राजेंद्र फंड यांनी काढले.
कवी सरकार यांच्या कविता शहराच्या कोलाहलात घडलेल्या नसून, त्या पहाटेच्या धुक्यात, तांबड्या मातीत रुतलेल्या पावलांत, रानावनात घुमणाऱ्या पैंजणांच्या नादात आणि श्रमाने थकलेल्या देहांच्या श्वासात आकाराला आल्या आहेत.त्यांच्या प्रत्येक कवितासंग्रहातील कवितांचा केंद्रबिंदू म्हणजे ग्रामीण जीवन. शेत, शिवार, पानंद, नदीकाठ, बांध, वावर, झाडांची सावली, पाखरांचे थवे, सकाळचे किरण आणि सांजवेळचा गारवा या सर्व प्रतिमा त्यांच्या विविध कवितेतून दिसून येतात. त्याचप्रमाणे कवी प्रकाश भोंगाळे यांच्या अपूर्वाई व कवयत्री निशा खरात/ शिंदे यांच्या मी भावनेला शब्द दिले या कवितासंग्रहातील कविताही मनाला भुरळ घालतात. या प्रकाशन समारंभास इतर मान्यवरांमध्ये संमेलनाचे अध्यक्ष कवी गोविंद लहाने परभणी, उद्घाटक प्रसिद्ध साहित्यिका (चिकोडी कर्नाटक), सौ डॉ रोहिणी दीक्षित ,प्रसिद्ध कांदबरीकर डॉ श्रीकांत पाटील , टीव्ही मालिका व अभिनेत्री .जीवीका सोनार , स्वागताध्यक्ष प्रा अमरनाथ कांबळे व आयोजक कवी सरकार व इतर अनेक साहित्यिक उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा