शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

आंध्र प्रदेश येथील एका साईभक्ताने श्री साई चरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्नाचे खडे असलेला सोन्याचा हार साईबाबाच्या चरणी अर्पण

श्री साईबाबांवर देश विदेशातील लाखो भक्‍तांची श्रद्धा आहे. याच श्रद्धेपोटी भाविक श्री साईबाबांच्या झोळीत भरभरून दान देत असतात. 


आज श्री साईबाबा पुण्‍यतिथी उत्‍सवाच्‍या सांगता दिनी आंध्रप्रदेश योथिल एका श्री साईभक्‍ताने श्री साईचरणी ९५४ ग्रॅम वजनाचा आकर्षक नक्षीकाम व नवरत्‍नांचे खडे असलेला सोन्‍याचा हार श्री साईबाबांच्‍या चरणी अर्पण करुन श्री साईबाबा संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्‍याकडे सुपुर्द केला.





 याची किंमत ०१ कोटी ०२ लाख ७४ हजार ५८०  रुपये असून हा सुंदर नक्षिकाम असलेला हार श्री साईबाबांच्या चरणी अर्पण केल्‍यानंतर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी देणगीदार श्री साईभक्‍त यांचा सत्‍कार केला. श्री साईभक्‍त यांच्‍या विनंतीवरून त्‍यांचे नाव गुप्‍त ठेवण्‍यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...