शनिवार, ४ ऑक्टोबर, २०२५

कोल्हार राजुरी रोड संदर्भात पालक मंत्र्याची भेट घेणार. कॉ. ऍड. सुभाष लांडे

कोल्हार राजुरी रोड संदर्भात पालक मंत्र्याची भेट घेणार. कॉ. ऍड. सुभाष लांडे

 कोल्हार राजुरी रोड वरील पश्चिमे कडिल शेतकऱ्यांच्या जमीनी नापिक होण्याच्या अवस्थेत आहे. याच पार्श्वभुमीवर आज भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी ऍड. कॉ. सुभाष लांडे यांनी कोल्हार मध्ये अतिवृष्टी झालेल्या शेतजमीनीची पाहनी केली. त्यांच्या बरोबर भाकप चे जिल्हा सेक्रेटरी कॉ . ऍड बन्सी सातपुते हे देखील होते.
गेले अनेक वर्षा पासुन कोल्हार राजुरी रस्ता निवासी वापरासाठी झालेल्या बिगर शेती प्लॉटमुळे नैसर्गीक स्त्रोत न राहील्या मुळे पावसाळ्यात सदर पाणी गोर गरीब शेतकरी अल्पभुधारक शेतमजुर यांच्या शेतात व घरात जाते आहे हा परीसर शिर्डी विधान सभा मतदार संघात येतो अनेक वर्षा पासुन पुर्वेकडील चर अतिक्रमण करून बद करण्यात आलेला आहे त्यामुळे पश्चिमे कडिल एकाच चरातून पाणी जात आहे तेथे निवासी वापरासाठी लोकानी प्लॉट घेतले व तेथे तिन फुटी सिमेंटचे पाईप टाकले परंतु सदर पाईप चोकअप झाल्यामुळे सर्व पाणी पश्चिमे कडिल शेतकऱ्याच्या शेतात व घरात शिरले अनेक शेतकऱ्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले हि बाब कॉ. सुरेश पानसरे यांनी कॉ. लांडे यांच्या निदर्शनास आनुन दिली.
त्या वेळेस कॉ . ऍड. सुभाष लांडे यांनी सदर प्रकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या कानावर घालण्याचे आश्वासन दिले आहे.
वेळ पडली तर जिल्हा अधिकारी कार्यालय येथे आंदोलन करण्याचे त्यांनी सांगीतले
सदर प्रश्नाबाबत युनाटेड कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सेक्रेटरी कॉ. प्रा. एल एम डांगे यांनी हा प्रश्न भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राष्टीय सेक्रेटरी डॉ. भालचंद्र कांगो यांना भ्रमणध्वनीवरून कळवीले होते डॉ. कांगो यांनी तातडीने राज्य सेक्रेटरी ऍड. सुभाष लांडे यांना सांगुन तातडीने कोल्हारला पाठवीले व सदर परीसरातील शेतकऱ्यांच्या जमीनीची व शेतातील उभ्या पिकाची पाहणी केली व लवकरच नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटलांची भेट घेऊन सदर प्रश्न कायम स्वरूपी सोडवण्यासाठी त्यांना सांगनार आहे.
नुकताच ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटलांनी देखील या भागात येऊन प्रत्यक्ष शेत जमीनीची पाहनी करून अधिकाऱ्यांना अतिक्रमण काढण्याच्या सुचना दिल्या होत्या.
सदर प्रसंगी या प्रश्नावर जर लवकर तोडगा निघाला नाही तर या भागातील बाधीत शेतकरी घेऊन जिल्हाअधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा ईशारा कॉ. ऍड. सुभाष लांडे यांनी दिला आहे.
या प्रसंगी त्यांच्या समवेत कॉ. ऍड बन्सी सातपुते भारतीय महिला फेडरेशनच्या राज्य उपाध्यक्ष कॉ. प्रा. स्मिता पानसरे कॉ. बेबीनंदा लांडे आदि पदाधीकारी उपस्थीत होते

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Featured post

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

भारत संरक्षण उत्पादनाचा सर्वात मोठा निर्यातदार बनेल!" - शिर्डीत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह   शिर्डी,  संरक्षण क्षेत्रात खास...