गंगागिरीजी महाराज यांचा 179 वा सप्ताह मागणीसाठी धनगरवाडी व पंचक्रोशीतील गावांचे महंत रामगिरीजी महाराज यांना साकडे
धनगरवाडी (वार्ताहर )
राहता तालुक्यातील धनगरवाडी येथील ग्रामस्थ,भजनी मंडळ व महिला मंडळ यांच्या वतीने 179 वा सप्ताह मागणीसाठी पंचक्रोशीतील 22 गावांनी आज एकादशी निमित्त गोदावरी धाम सराला बेटचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज यांची भेट घेऊन सप्ताहाला पाठिंबा दर्शवला आहे. पूर्ण आठ दिवस सप्ताहाला मदत करू,असेही या 22 गावांनी महाराजांच्या समक्ष सांगितले.तेव्हा महाराजांनी असे सांगितले की, मला जसे गंगागिरीजी महाराज बुद्धी देतील त्या पद्धतीने मी तुम्हाला कळवीन आणि बेटाची परंपरा सगळ्यांना माहित आहे की, आम्ही नारळ पुणतांबा येथे देत असतो. त्या पद्धतीने मी आज काही सांगू शकत नाही. ज्या 22 गावांनी पाठिंबा दिला, त्या 22 गावांची नावे
रांजणखोल, दत्तनगर, वाकडी, जळगाव, चितळी, खैरी निमगाव, खंडाळा, नांदूर, राजुरी, ममदापूर, बाबळेश्वर, रांजणगाव, एकरुखे, गणेशनगर ,गोंडेगाव , शिरसगाव, नायगाव, गोंदवणी , हनुमान वाडी, विठ्ठलवाडी, श्रीरामपूर, दिघी ,
त्या गावांमध्ये जवळजवळ सप्ताह झालेले आहे.त्यांना चांगला अनुभव आहे . आज धनगरवाडी गावासमवेत या 22 गावातील हजारो महिला, पुरुष सामिल झाले होते .
सप्ताहाची मागणी झाल्यानंतर सर्वांना फराळाची पंगत देण्यात आली .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा