श्री गणेश विद्यालय मध्ये कर्मवीर जयंती साजरी
रयत शिक्षण संस्थेच्या श्री गणेश विद्यालय गणेशनगर शाखेमध्ये पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांची 108 वी जयंती मोठ्या उत्साहामध्ये साजरी करण्यात आली. दिनांक 22 सप्टेंबर रोजी कर्मवीर अण्णांच्या प्रतिमेची सभाद्य भव्य मिरवणूक काढण्यात आली दिनांक 4 ऑक्टोबर 2025 या दिवशी रयत शिक्षण संस्थेच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून सन 1993 - 94 बॅचमधील विद्यार्थ्यांनी बांधून दिलेल्या सायकल स्टॅंडचे उद्घाटन आणि विद्यालयाला अर्पण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे रावसाहेब नाथाजी म्हस्के पाटील यांनी रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील एक नंबरची संस्था आहे या संस्थेमध्ये ज्ञानार्जन करणारे विद्यार्थी कर्मवीर अण्णांचे खरे पाईक होण्यासाठी आपल्या ज्ञानमंदिराला भरीव अशी मदत करतात. विद्यालयाला 1993 - 94 या बॅचने भव्य असे सायकल स्टॅन्ड बांधून दिल्याबद्दल त्यांचे कौतुक केले या कार्यक्रमासाठी सन 2000 - 2001 या बॅचच्या विद्यार्थ्यांनी स्वादिष्ट भोजन दिल्याबद्दल यांचेही कौतुक केले .

.गणेशनगरचे माजी विद्यार्थी खरे कर्मवीर अण्णांचे विचार आपल्या जीवनामध्ये कृतीत आणतात याबद्दल या सर्व माजी विद्यार्थ्यांना धन्यवाद दिले पाहिजे असे कार्य यापुढेही या ज्ञानमंदिरासाठी या विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी करावे असे आव्हान केले. यावेळी गणेशनगर सहकारी साखर कारखान्याचे संचालक अनिलकाका गाढवे पाटील यांनी विद्यालयाला भविष्यातील कोणकोणत्या भौतिक सुविधा करणे गरजेचे आहे हे आम्ही सर्व माजी विद्यार्थ्यांच्या मदतीने निश्चित सर्व भौतिक सुविधा पूर्ण
करण्यासाठी कटिबद्ध आहोत असे जाहीर केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक लक्ष्मण पुंजाजी कोल्हे सर यांनी आपल्या अमोघ वाणीतून कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई भाऊराव पाटील यांचे जीवन कार्य दर्दभरीसुरात समजावून सांगितले या कार्यक्रमाच्याप्रसंगी रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाचे सहाय्यक विभागीय अधिकारी प्रमोदजी तोरणे साहेब यांनी कर्मवीर अण्णांनी खऱ्या अर्थाने ही ज्ञानगंगा दीन दलितांच्या दारापर्यंत आणण्याचे कार्य केले आणि कर्मवीरांना असल्यामुळेच आज तुम्ही आम्ही शिक्षण घेत आहोत . रयत शिक्षण संस्थेमध्ये अगदी अल्प दरात गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाते म्हणून सर्व पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना रयत शिक्षण संस्थेच्या विद्यालयामध्ये शिक्षण द्यावे असे आव्हान केले.या विद्यालयाची गुणवत्ता आणि विद्यालयांमध्ये होत असलेल्या भौतिक सुविधांचे भरभरून कौतुक केले .या कार्यक्रमाप्रसंगी डॉक्टर किशोर गाढवे यांनी जीवनातील यशस्वी होण्यासाठी परिश्रम, जिद्द, चिकाटी याचे महत्त्व सांगून या विद्यालयासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी भविष्यामध्ये भरीव मदत करू असे आश्वासन दिले. श्री शिरीष नगरकर यांनी विद्यार्थ्यांना पुढील वर्षासाठी बक्षिसे जाहीर केली. सचिन वाघे साहेब यांनी
आम्हाला या विद्यालयाला सायकल स्टॅंडच्या रूपाने मदत करून मातृ शाळेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाली. याबद्दल शाळा व्यवस्थापन समितीला धन्यवाद दिले. यावेळी कौशरताई बागवान यांनी आपले मनोगत व्यक्त केले. विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री वसावे के के सर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून मान्यवरांचे स्वागत केले. श्रीमती ऊंडे मॅडम यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी दहावीच्या परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला .गरजू विद्यार्थ्यांना सोपानकाका कासार यांच्यावतीने मोफत गणवेश वाटप करण्यात आले. 2025 या शैक्षणिक वर्षातील आदर्श शिक्षक म्हणून श्री कैलास भिका भोये सर व श्री विश्वेश्वर सोमनाथ लव्हारकर सर यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष रावसाहेब पांडुरंग गाढवे पाटील यांनी विद्यालयाला दिलेल्या भरीव मदतीबद्दल सर्व माजी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले या विद्यालयात कष्टकरी मजूर गोरगरिबांची मुलं अल्पदरात गुणवत्तापूर्ण शिक्षण घेतात त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपण पुढील काळामध्ये वेगवेगळ्या सुविधा एकत्र बसून करु असे आव्हान केले.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी किशोर चांगदेव गाढवे ,श्री सचिन अण्णासाहेब वाघे, श्री शिरीष नगरकर, दादासाहेब सूर्यभान गाढवे, संदीप ज्ञानदेव गाढवे ,अनिलकाका सोपान गाढवे ,माननीय श्री जयेंद्र विजयचंद कालेशेठ, जावेदभाई पठाण ,वाल्मीकराव गाढवे, नंदकिशोर नळे ,नानासाहेब लोंढे ,कौशलताई बागवान ,कल्पनाताई लोंढे ,मंगलताई लहारे ,सुनंदाताई शेळके ,विनोदजी गाढवे, विलासभाऊ सातव, नितीन जेजुरकर ,सतीशराव सोनवणे राहुल गाढवे, माननीय क्षीरसागर संचालक नानासाहेब नळेसर , संचालक चोळकेसर , विजय सदाफळ पुखराजशेठ पिपाडा ,पत्रकारबंधू व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षकांनी प्रयत्न केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती वराडे मॅडम यांनी केले. पसायदान घेऊन कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला सर्व विद्यार्थी व पालकांना स्वादिष्ट मिष्टान्न भोजन देण्यात आले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा